WhatsApp वापरा आता आपल्या मातृभाषेत, WhatsApp हे जगातील तसेच भारतातील सर्वात मोठे सोशल मीडिया ॲप आहे.WhatsApp वेळोवेळी ग्राहकांच्या मदतीसाठी आणि मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिचर्स घेऊन येत असते.भारत हा विविधतेने नटलेला देश आहे तसेच भारतात वेगवेगळ्या बोली भाषा बोलल्या जातात परंतु WhatsApp वर जास्त प्रमाणात भारतीय भाषा उपलब्ध नव्हत्या.WhatsApp ने आता बहुतांश भारतीय भाषांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मातृभाषेत आता WhatsApp चा आनंद घेऊ शकता.


व्हॉट्सॲप,Technology,सेटिंग,Setting,टेक्नॉलॉजी,WhatsApp

WhatsApp नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे घेऊन येत असते. भारतामध्ये पूर्वी WhatsApp वर केवळ English भाषेचा पर्याय उपलब्ध होता.भारतात विविध राज्यांमध्ये विविध मातृ भाषा बोलल्या जातात म्हणून WhatsApp ने भारतात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांचा समावेश WhatsApp मध्ये केलेला आहे.WhatsApp आता प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत वापरता येणार आहे यामध्ये मराठी हिंदी अशा विविध प्रमुख भाषांमध्ये WhatsApp उपलब्ध करून देण्यात आले आहे.आता भारतातील प्रत्येक नागरिक ज्याला इंग्रजी कळत नसेल असा व्यक्ती त्यांचे WhatsApp त्यांच्या मातृभाषेत करू शकतात.

WhatsApp ने भारतीय ग्राहकांसाठी विविध भाषा उपलब्ध करून दिल्या आहेत परंतु ग्राहकांना भाषेची सेटिंग कशी बदलायची आहे माहित नसते.ते आज आपण या लेखामध्ये पाहू यात. 1) स्मार्ट फोनची भाषा सेटिंग बदलून आपण Whatsapp ची भाषा बदलू शकतो. 2) WhatsApp चे सेटिंग बदलून आपण भाषा बदलू शकतो.काही लोकांना स्मार्टफोन आणि WhatsApp ची भाषा वेगळी हवी असते म्हणून आपण दोन्ही पद्धतीने WhatsApp ची भाषा कशी बदलावी हे पाहुयात.

WhatsApp ची भाषा कशी बदलाव

पद्धत -
1) स्मार्टफोन सेटिंग बदल (Smartphone Setting Change)
तुमच्या स्मार्टफोन मध्ये Setting पर्याय निवडून Language पर्याय सिलेक्ट करून आपल्याला हवी ती भाषा निवडावी.स्मार्टफोनची भाषा असेल त्या प्रमाणे तुमचे WhatsApp कार्य करेल.
उदा. स्मार्टफोनची भाषा मराठी निवडली असेल तर तुमचे WhatsApp देखील मराठी भाषेत चालू होईल.

2) व्हॉट्सॲप सेटिंग बदल (WhatsApp Settings Change)


1) Android Smartphone 

सेटिंग - सिस्टम - भाषा आणि इनपुट - भाषा

Setting - System - Language and Input - Language
अशा प्रकारे सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमच्या WhatsApp मध्ये तुमच्या आवडीची मातृभाषा निवडू शकता आणि WhatsApp चा त्या मातृभाषेत आनंद घेऊ शकता.

व्हॉट्सॲप,Technology,सेटिंग,Setting,टेक्नॉलॉजी,WhatsApp

2) आयफोन (iPhone)

Iphone Setting - Genral - Language and Countries - iPhone Language - अशा प्रकारे सोप्या स्टेप फॉलो करून iPhone मधील WhatsApp ची भाषा तुम्ही बदलू शकता.

या प्रकारच्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे WhatsApp आता आपल्या मातृभाषेत वापरू शकता.WhatsApp ने ग्राहकांसाठी त्यांच्या भाषेविषयी समस्या लक्षात घेऊन हे सर्व बदल केले आहेत.WhatsApp हे संपूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया ॲप आहे.जगातील खूप लोक Whatsapp चा मनोरंजन किंवा त्यांच्या कामात वापर करतात.मनोरंजना शिवाय महत्त्वाच्या कामांचे संदेशवहन करण्याचे काम सुद्धा WhatsApp करते म्हणून ते जगात लोकप्रिय झाले आहे.ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते.ग्राहकांच्या भाषेची समस्या लक्षात घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या भाषा WhatsApp मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.ग्राहकांना या गोष्टींची माहिती असावी म्हणून हा लेख लिहिण्यात आला आहे.

WhatsApp वापरा आता आपल्या मातृभाषेत हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post