मकर संक्रांमहत्व ची माहिती makar sankranti information in marathi, मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,मकर सक्रांतीच्या शुभेच्छा

भारतीय सण,festival,Makar Sankranti,मकर संक्रात,तिळगुळ

मकर संक्रांतीची माहिती,मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा : नमस्कार मित्रांनो थंडीत येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण होय.दरवर्षी जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 तारखेला मकर संक्रात हा सण येतो.सूर्याचे धनू राशीतून मकर राशीत ज्यावेळेस आगमन होते त्यावेळी मकर संक्राती हा सण येतो.जुन्या लोकांच्या समजुतीनुसार या या दिवसापासून दिवस रात्रीपेक्षा कणाकणाने मोठा होत जातो.या दिवशी तिळगुळाचे खूप महत्व असते मोठी माणसं आपल्यापेक्षा लहानांना तिळगुळ देतात.तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हटले जाते.

ठळक मुद्दे -

मकर संक्रांत म्हणजे काय

मकर संक्रात महत्व

तिळगुळाचे महत्व

मकर संक्रात पूजा कशी करावी

मकर संक्रांत कशी साजरी करावी

मकर संक्रात आणि आहाराचे महत्व

समारोप


मकर संक्रांतीची माहिती makar sankranti information in marathi


मकर संक्रांत म्हणजे काय? ( What is Makar Sankranti in Marathi)

भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून चालत आलेल्या सणांना खूप महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी भारतातील सर्व सण हे विशिष्ट दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून साजरे केलेले असतात.म्हणून भारतीय संस्कृती जगात आदर्श संस्कृती मानली जाते.मकर संक्राती हा सण ज्या वेळेस सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्राती हा सण साजरा केला जातो.या दिवसापासून सूर्याचे उत्तरायान चालू होते असे मानले जाते.मकर संक्रात हा सण कडाक्याच्या थंडीत येत असतो.म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळ वाटला जातो.तिळगुळ वाटल्याने माणसांच्या अंगात ऊब तयार होते थंडी विरुद्ध लढण्यास गुळ खूप मदत करतो.म्हणून मकर संक्रातीला तिळगुळ वाटतात.

ज्योतिषीय भाषेतून पाहिले तर सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रात येते.मकर संक्रांति ही देवी मानली गेली आहे.दरवर्षी मकर संक्रातीला या देवीची पूजा करावी असे ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे. तसेच मकरसंक्रातीच्या दिवशी व्रत करावे,पूजा अर्चा करावी असेही सांगितले जाते.

मकर संक्रात महत्व ( Importance of Makar Sankranti)

भारतीय संस्कृतीत मकर संक्रात या सणाचे खूप महत्त्व आहे.दरवर्षी पौष महिन्यात येणार मकर संक्रात हा सण होय.सूर्य ज्या वेळेस मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्राती हा सण साजरा केला जातो.दरवर्षी जानेवारी महिन्यात येणारा हा सण कडाक्याच्या थंडीत साजरा केला जातो.सूर्याचे उत्तरायण या दिवसापासून चालू होते असे मानले जातेसर्व शेतकरी वर्ग हा या काळात शेतीमधील कामात रममाण झालेला असतो.थंडीही पिकांसाठी चांगली असते आणि येणारा मकर संक्रात हा सण सर्व शेतकरी वर्गासाठी आनंद घेऊन येत असतो.सर्व लोक मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात.लहान मुलांसाठी तर मकर संक्रांत हा सण आनंदाची पर्वणीच असते.लहान मुले या दिवशी पतंग उडवण्याचा खेळ खेळतात.संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे  खूप लोकप्रिय झाले आहे म्हणूनच लहान-मोठ्या अशा सर्वच लोकांना हा सण खूप हवाहवासा वाटतो.

तिळगुळाचे महत्व ( Importance of Til-Gul)

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!

भारतीय संस्कृतीत कोणताही सण खूप विचार करून साजरा केला जात असतो.मकर संक्रात हा देखील महत्त्वाचा सण आहे.कडाक्याच्या थंडीमध्ये हा सण येत असतो.मानवी शरीराला थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी गूळ हा महत्त्वाचा घटक असतो म्हणून मकर संक्रातीला तीळ आणि गूळ एकत्र करून तिळगुळ म्हणून वाटला जातो.तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं प्रत्येक जण या दिवशी बोलत असतो.
समाजात असलेले मतभेद तिळगुळ च्या निमित्ताने दूर व्हावेत म्हणून देखील तिळगुळ वाटला जातो.दोघांमधील वाद तिळगूळ देऊन सोडवला जातो. घरातील मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा तिळगुळाचा वापर केला जातो.अशा पद्धतीने तिळगुळ हा सर्व समाजाला एकत्र आणून आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरित करत असतो.तिळगुळाच्या निमित्ताने सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने गुण्यागोविंदाने एकत्र गप्पा मारतात.
अगदी शाळा,कॉलेज,नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तिळगुळ वाटला जातो. तिळगुळ वाटण्यामागे फक्त सर्व लोक एकत्रित गुण्यागोविंदाने राहावेत हाच उद्देश आणि संदेश आहे.तुम्हीही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.

मकर संक्रात पूजा कशी करावी (Makar Sankranti Puja vidhi in Marathi)

  • मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेवाची पूजा विधी केला जातो.
  • चार काळे आणि चार पांढऱ्या लाडू एका प्लेटमध्ये ठेवून त्यामध्ये काही पैसे ठेवून द्यावेत.
  • यानंतर फ्लॅटमध्ये तांदूळ आणि हळदीचे पीठ एकत्र करून सर्व पूजेचे साहित्य घ्यावे. धूप,दीप,अगरबत्ती ई.
  • यानंतर लाडू,मिठाई आणि काही पैसे सूर्य देवाला अर्पण केले जातात.
  • सूर्य देवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याची आरती करावी.
  • यानंतर सूर्य मंत्राचे पठण करावे.
अशा प्रकारे भगवान सूर्य देवाची पूजा या दिवशी केली जाते तसेच या दिवशी स्त्रीया देवी-देवतांना तसेच एकमेकींना ओवसत असतात.सर्व सुवासिनी स्त्रिया एकमेकांना ओवसत हा सण आनंदात साजरा करतात.

मकर संक्रांत कशी साजरी करावी (How celebrate Makar Sankranti)

मकर संक्रांति हा सण संपूर्ण भारतात कमी-जास्त प्रमाणात साजरा केला जातो.काही राज्यांमध्ये या सणाला वेगवेगळी नावे असतात.परंतु याच दिवशी हा सण साजरा केला जातो.महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण सर्व लहान मोठे एकत्रित मिळून साजरा करतात.लहान-मोठी मुले या दिवशी पतंग उडवून मकर संक्रांति हा सण साजरा करतात.मोठी माणसे लहान मुलांना तीळगुळ देऊन हा सण साजरा करतात.स्त्रीया देवी-देवतांना आणि एकमेकींना ओवसत हा सण साजरा करतात.महाराष्ट्रात या दिवशी पुरण पोळी केली जाते.तसेच एकमेकांना तिळगुळ देखील वाटला जातो.या दिवशी अत्यंत उत्साहात सर्व लोक मकर संक्रात हा सण साजरा करतात.
या दिवशी सूर्यदेव आणि संक्रात देवीची पूजा केली जाते.सर्व पूजा विधी करून नैवद्य अर्पण करून सर्व लोक पुरणपोळी चे जेवण करतात.संध्याकाळी एकमेकांना तीळ-गूळ वाटून मकर संक्रांत हा सण साजरा करतात.शाळा किंवा कॉलेजमध्ये सुट्टी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी तिळगुळ वाटून मकर संक्रात हा सण साजरा केला जातो.

मकर संक्रात आणि आहाराचे महत्व (Makar Sankranti and Food importance)

मकर संक्रातीच्या दिवशी स्त्रिया एकमेकींना सुगडयांचे वान देत असतात. सुगडी म्हणजे माती पासून तयार केलेली लहान-लहान मडकी होय.या वानांमध्ये प्रामुख्याने हरभरा,गहू,शेंगदाणे,ऊस,ज्वारी,गाजर,वाल यांचे वान असतात.ही पिके या काळात शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात तसेच थंडी मध्ये येणारी हे सर्व पिके आहेत.आपल्या शेतामध्ये जे उपलब्ध आहे ते इतरांना पण द्यावे हे महत्त्व किंवा संदेश याद्वारे दिला जातो.
थंडीच्या ऋतू मध्ये येणारी सर्व पिके ही मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात म्हणून या पिकांचा मानवी आहारात अवश्य समावेश करावा.हा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो.

समारोप

मकर संक्रांतीची माहिती makar sankranti information in marathi,भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला मकर संक्रात हा सण आहे. भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. परंतु मकर संक्रात हा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जात असला तरी त्याचा उद्देश हा सर्व ठिकाणी सारखाच असतो संक्रातीचे महत्त्व म्हणज सर्व लोकांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने एकमेकांचे गुणदोष विसरून एकत्र येऊन आनंदाने राहणे होय. तसेच आपल्याला ऊर्जा देणारा सूर्यदेव या देवाची या दिवशी पूजा करणे म्हणजेच आपण त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय मकर संक्रात असं सर्व थोरामोठ्यांना तिळगुळ द्वारे एकत्र घेऊन येत असतो. मकर संक्रातीच्या दिवशी सर्व श्रेया एकमेकांचे गुणदोष विसरून एकत्र येऊन एकमेकींना एकमेकींना आनंदाने ओवास असतात.
          भारतीय संस्कृतीतील कोणताही सण हा एक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून साजरा केला जात असतो कोणत्याही सणाच्या निमित्ताने सर्व लोक एकमेकांचे हेवेदावे विसरून दुःख विसरून आनंदाने एकत्रित यावेत हा या सणामागील खरा उद्देश असतो.

मकर संक्रांतीची माहिती makar sankranti information in marathi हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post