Identify fake or original Pancard,असे ओळखा बनावट पॅनकार्ड,तुम्ही बनावट पॅन कार्ड तर वापरत नाही ना?भारतासह संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल होत आहे.संपूर्ण जग डिजिटलायझेशन कडे वाटचाल करत आहे,परंतु हे सर्व करत असताना यामध्ये बनावटगिरी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.डिजिटल गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावटगिरी आढळते.डिजिटल पासपोर्ट ओळखपत्र अशा प्रकारचे कागदपत्रे आपल्या खूप गरजेचे असतात,परंतु हीच कागदपत्रे आपल्याला कुणीतरी बनावट काढून दिल्यास आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते.बनावट पॅनकार्ड कसे ओळखायचे हे आज आपण या लेखात पाहूयात.

Technology, टेक्नॉलॉजी, PAN, digital id

पॅनकार्ड,आधारकार्ड आपल्याला आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात. परंतु हे आपल्याला ऑनलाइन काढताना कोणीतरी बनावट काढून दिल्यास आपल्याला खूप मोठे नुकसान सोसायला लागू शकते.सर्व आर्थिक व्यवहारात पॅनकार्ड हे खूप गरजेचे मानले जाते.पॅनकार्ड शिवाय कोणतेही आर्थिक व्यवहाराचे काम पूर्ण होत नाही.पॅनकार्ड आता  ला लिंक केले जात आहे.यावरूनच पॅनकार्ड चे महत्व अधोरेखित होते.पॅनकार्ड आपल्याला कोणीतरी बनावट काढून दिल्यास आपण ते कसे ओळखायचे? बनावट पॅनकार्ड आणि सरकारी पॅनकार्ड यांच्यामध्ये काय फरक असतो ते आपण आत्ता पाहुयात.

असे ओळखा बनावट पॅनकार्ड

  • सर्वप्रथम तुम्ही आयकर विभागाच्या पोर्टलवर जावे.
  • नंतर आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट वर जावे.येथे क्लिक करा.
  • तुम्हाला एक पिन कोड येईल तो टाका आणि व्हेरिफकेशन करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यापुढे ओपन होईल.
  • येथे तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड चा संपूर्ण तपशील विचारला जाईल तो तुम्ही व्यवस्थित भरा. 
  • येथे पॅनकार्ड नंबर,नाव,मोबाईल नंबर अशी सर्व माहिती भरा.
  • ही माहिती भरल्यानंतर ok करा.
  • त्यानंतर तुम्हाला एका मेसेज द्वारे सर्व माहिती कामवाली जाईल.तुमची सर्व माहिती योग्य आहे की नाही याचा मेसेज येईल.
  • या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे पॅनकार्ड खरे आहे की बनावट आहे हे सहज ओळखू शकता.

निष्कर्ष -

पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात मोठा पुरावा मानले जाते.आता आधारकार्ड सोबत सुद्धा पॅनकार्ड लिंक केले जात आहे.पॅनकार्ड हे खूप महत्त्वाचे आहे.आर्थिक व्यवहार करताना 50 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल तर पॅनकार्ड शिवाय तो होत नाही.शिवाय ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड सर्वत्र वापरले जाते.बँक,शिक्षण,इतर सरकारी योजना यांसाठी पॅनकार्ड खूप महत्त्वाचे असते.सर्व सरकारी कामांसाठी पॅनकार्ड असावे लागते. आजकाल मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन कामे केली जातात.पॅनकार्ड सुद्धा आता ऑनलाईनच काढून मिळते परंतु अशा वेळेस काही लोकांकडून बनावट पॅनकार्ड सुद्धा वाटले जातात म्हणून आपल्याला आपले पॅनकार्ड खरे आहे की खोटे याची माहिती असायलाच हवी.सरकारने आता पॅनकार्ड सोबत बारकोड देणे सुरू केले आहे.जे स्कॅन करताच तुम्हाला सर्व माहिती समजते तरी आपण आपल्या पॅनकार्ड बाबत सावध असलेच पाहिजे.तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड बाबत कोणतीही शंका आल्यास आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे पॅनकार्ड वरील सांगितल्याप्रमाणे व्हेरिफाय करून घ्या.

असे ओळखा बनावट पॅनकार्ड हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post