WhatsApp 2022 मध्ये घेऊन येणार जबरदस्त फीचर्स. WhatsApp Messenger ॲप 2022 मध्ये आपल्या युजर्स साठी खूप फायदेशीर फीचर्स उपलब्ध करून देणार आहे.मल्टी डिव्हाईस सपोर्ट(multi device support) सारखी खूप नवीन प्रकारची फीचर्स Whatsapp घेऊन येत आहे.

Multi linked device support, Auto Delete Account, WhatsApp 2022 featuresWhatsApp अपडेट करा मिळतील हे जबरदस्त फीचर्स, WhatsApp multi linked device support, WhatsApp auto account delete features,WhatsApp 2022 new features

आज आपण social media app म्हणून मोठ्या प्रमाणावर WhatsApp Messenger चा वापर करत असतो.जगभरात WhatsApp Messenger वापरणारे असंख्य लोक आहेत.आपल्या युजर्स साठी काहीतरी खास करण्याच्या हेतूने 2022 या वर्षात WhatsApp खूप जबरदस्त आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विवध फीचर्स उपलब्ध करून देणार आहे. WhatsApp 2022 मध्ये कोणती नवीन फीचर्स उपलब्ध करून देणार आहे ते आपण पाहू.

थीम्स सपोर्ट (Themes Support)

नविन वर्षात WhatsApp आपल्या युजर्स साठी themes support हे नवीन फीचर घेऊन येणार आहे.themes support आणि custom wallpaper हे दोन फीचर WhatsApp चॅटिंग अधिक आकर्षक आणि युजर्स साठी आनंद देणारी असेल.Themes संबंधी अधिक माहिती जाहीर केली नसली तरी WhatsApp interface अधिक आकर्षक बनवण्यासाठी हे फीचर घेऊन येणार आहे.

मल्टी लिंक्ड डिव्हाईस (Multi Linked Device)

या फीचर्स मुळे आपले WhatsApp Messenger आपण एकाच वेळेस चार डिव्हाईस बरोबर कनेक्ट करू शकतो.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच कामात आपले डिव्हाईस बऱ्याच ठिकाणी जोडले जाते.एक डिव्हाईस चार ते पाच ठिकाणी जोडून काम केले जाते.म्हणून WhatsApp ने हे डिव्हाईस फीचर लॉन्च केले आहे याद्वारे आपले मेसेंजर चार डिव्हाईसशी जोडता येई.


ऑटो डिलीट अकाउंट (Auto Delete Account)

ऑटो डिलीट अकाउंट म्हणजे युजर्स आपले अकाउंट कधी डिलीट करायचे आहे याचा टायमिंग सेट करून ठेवतो आणि त्या टाइमिंग नुसार ऑटोमॅटिक अकाउंट डिलीट होत.WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी हे फीचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे परंतु या फीचर बाबत कंपनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही.

व्हॉट्सॲप डिलीट मेसेज (WhatsApp Delete Message)

WhatsApp वर आपण पाठवलेला मेसेज 68 मिनिटांच्या आत आपल्याला डिलीट करता येतो.परंतु या नव्या फीचर द्वारे कंपनी हा वेळ काढून टाकायच्या विचारात आहे.म्हणजेच आपण पाठवलेला मेसेज आपण कधीही डिलीट करू शकतो.या फिचर वर सध्या काम सुरू आहे 2022 वर्षात हे फीचर नक्की येईल असा विश्वास ग्राहकांना आहे.

परत परत नोटिफिकेशन देणे (Repeat Notification)

कधीकधी मोबाईल तुमच्याजवळ नसतो त्यावेळी खूप सारे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येत असतात.काही नोटिफिकेशन कामाच्या असतात तर काही नोटिफिकेशन बिनकामाचे असतात.परंतु अशा वेळेस आपल्याला महत्त्वाचे असलेले नोटिफिकेशन विसरू शकतात.परंतु WhatsApp च्या या फिचर द्वारे आपल्याला महत्त्वाचे नोटिफिकेशन चुकवता येणार नाही.म्हणजेच महत्त्वाचे मेसेजेस आपल्याला आचूक मिळतील.या फिचर द्वारे महत्वाचे मेसेज आल्यास परत परत नोटिफिकेशन देऊन अलर्ट करतात.

Google Pay चे भन्नाट फीचर पहा काय आहे

इंस्टाग्राम रील टॅब मिळू शकतो (Instagram Reel Tab)

मीडिया रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार WhatsApp वर इंस्टाग्राम चे व्हिडिओ बघण्यासाठी इंस्टाग्राम रील टॅब दिला जाऊ शकतो.याद्वारे युजर्स डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरील व्हिडिओ पाहू शकतात परंतु या फिचरचे अजून माहिती देण्यात आली नाही.

निष्कर्ष -

WhatsApp हे जगप्रसिद्ध मेसेंजर ॲप आहे.आपल्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवीन काहीतरी घेऊन येण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो.युजर सुद्धा नवीन गोष्टींसाठी अनुकूल असतात.म्हणून WhatsApp नेहमीच ग्राहकांच्या आवडीचे आणि ग्राहकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स घेऊन येत असते.ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांच्यासाठी वेगवेगळे फिचर्स घेऊन येणे हे व्हाट्सअप साठी महत्त्वाचे काम असते.


WhatsApp 2022 मध्ये घेऊन येणार जबरदस्त फीचर्स हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post