epf ने केला मोठा बदल ,नोकरी सोडल्यानंतरही मिळणार pf आणि पेन्शन खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी epf हा खूप महत्वाचा असतो. आपल्या नोकरीची संपूर्ण बचत म्हणजेच epf होय.यामध्ये नोकरदार व्यक्तीस पेन्शन पण मिळते.खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी epf ही खूप लोकप्रिय अशी योजना आहे.या योजनेत केंदरसरकर व्याज पण चांगले देत असते म्हणून ही योजना सर्व कामगारवर्गात लोकप्रिय झाली आहे.

इपिएफओ, ईपीएफ, provident Fund, epf, epfo

epf ने केला मोठा बदल ,नोकरी सोडल्यानंतरही मिळणार pf आणि पेन्शन अलीकडेच कोरोना महामारीमुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.या सर्व कामगारांसाठी epf एक खास योजना आणण्याच्या दृष्टीने विचार करत आहे,जर ही योजना epfo ने अमलात आणली तर नोकरी सोडल्यानंतरही मिळणार pf आणि पेन्शन मिळणार आहे.म्हणून जर हा निर्णय अमलात आणला गेला तर लाखो कामगारांच्या भवितव्याची काळजी मिटली जाणार आहे.

काय आहे ही योजना..

Epfo (Employees provident Fund organization)  ही एक योजना आणण्याच्या तयारीत आहे,जर ही योजना पास झाली तर ज्या कामगारांची काही ना काही कारणाने नोकरी गेली आहे त्या कामगारांना epf हे अनौपचारिक (informal) गटात सामील करून घेणार आहे.या वर्गाला या योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त 500 रुपये किंवा 12 टक्के इन्कम देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतील.पण सध्या ही योजना केवळ विचाराधीन आहे,epfo ने ती पास केल्यास नक्कीच या योजनेचा लाभ लाखो कामगारांना होणार आहे.

लाखो कामगारांना फायदा होईल

इपिएफओ, ईपीएफ, provident Fund, epf, epfo


कोरोना महामरिमुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.epf च्या म्हणण्यानुसार 2018 ते 2020 या काळात सुमारे 48 लाख कामगारांच्या नोकऱ्या या ना त्या कारणाने गेल्या आहेत.जर epf चा हा प्रस्ताव मान्य झाला तर लाखो कामगारांना फायदा होईल. कोरोना मुळे अजुन कामगार नोकरी सोडू शकतात.म्हणून या निर्णयाचा लाखो कामगारांना फायदा होणार आहे.

असा मिळणार फायदा..
  • या योजनेत कामगारांना बँक किंवा पोस्ट आणि ईतर खाजगी संस्थांकडून मिळणाऱ्या व्याजपेक्षा जास्त व्याज मिळू शकते.
  • या योजनेत कामगारांना पीएफ आणि पेन्शन देखील मिळणार आहे.
  • या योजनेत या बरोबरच कामगारांना 07 लाखांपर्यंत विमा संरक्षण देखील मिळणार आहे.
  • आत्ताच्या काळात epfo कामगारांना 8.5 टक्के व्याज देते कोणत्याही ईतर संस्थेपेक्षा हा व्याजदर अधिक आहे.
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वरदान

इपिएफओ, ईपीएफ, provident Fund, epf, epfo


पीएफ योजना ही देशातील असंघटित कामगार वर्गासाठी एक वरदान आहे,कारण -
  • कामगारांना महिन्याला त्याच्या पगारातून पैसे कापून जाऊन त्याच्या एवढेच पैसे कंपनी टाकते त्यावर केंद्र सरकार वार्षिक 8.5 टक्के व्याज दर देते,हा व्याजदर खूप जास्त आहे.
  • कामगाराची बचत होते.बचत टिकून आणि सुरक्षित राहते.
  • भविष्यात कामगार कामातून निवृत्त झाल्यास त्याला पेन्शन देखील मिळू शकते.
  • कामगाराला त्याच्या सेवेत असताना एकूण पीएफ च्या 90 टक्के pf काही अचानक काम आल्यास काढू शकतो.
  • असंघटित कामगार वर्गासाठी ही सरकारी आणि सुरक्षित अशी योजना आहे.
  • कामगारांना ईपीएफ च्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात.

EPFO ही एक सरकारी संस्था असून खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक प्रकारच्या नवनवीन योजना घेऊन येत असते.अशाच प्रकारच्या नवनवीन योजना कामगारांच्या भवितव्याची काळजी घेऊन आणल्या जातात.ही योजना ही एक महत्व कांक्षी योजना असून या योजनेस epfo ची मंजुरी मिळाल्यास लाखो कामगारांच्या भवितव्याची चिंता मिटणार आहे.खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी नोकरी ही कायमची आज आहे उद्या नाही म्हणजेच नोकरीची कायमस्वरूपी राहील याची खात्री नसते.म्हणून सरकारतर्फे या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक प्रकारच्या नवनवीन योजना राबवल्या जातात.

आजचा epf ने केला मोठा बदल ,नोकरी सोडल्यानंतरही मिळणार pf आणि पेन्शन हा computerguru वरील लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा Computerguru या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post