अनेकदा आपण बातम्या ऐकतो ती कुणाच्या तरी सिम कार्ड वरून धमकीचा फोन आला किंवा गैर वापर करण्यात आला.आपले ओळखपत्र घेऊन कोणीही आपल्या नावावर सिमकार्ड घेऊ शकतो पण त्याचा आपल्याला पत्ताच नसतो. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या सिम कार्ड वरून काही गैर कृत्य केल्यास त्याची सजा आपणास भोगायला लागू शकते.अशा कितीतरी बातमी आपल्या वाचनात येतात.आता सरकारने या त्रुटी दूर करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या नावावर किती सिम कार्ड आहे याची माहिती मिळणार आहे.

दूरसंचार विभाग,ओळखपत्र,TRI,सिम कार्ड,कोणाच्या नावावर आहे सिम कार्ड, जाणून घ्या फक्त 5 मिनिटांत


टेलिकॉम विभाग (TRI) च्या निर्देशानुसार एका व्यक्तीस आपल्या नावावर जास्तीत जास्त नवीन सिमकार्ड घेता येतात.जम्मू काश्मीर आणि पूर्वेकडील राज्य यासाठी ही मर्यादा एका व्यक्तीस सहा सिम कार्ड ची आहे. टेलिकॉम विभागाने सात डिसेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की,ज्या व्यक्तीकडे नऊ पेक्षा जास्त सिमकार्ड असतील त्या व्यक्तीवर कारवाई होईल म्हणजेच,त्या व्यक्तीने आपल्याकडील जास्तीच्या सिम कार्डची केवायसी करायचे आहे यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.तर इंटरनॅशनल रोमिंग असणाऱ्या ग्राहकांसाठी ही मुदत 30 दिवसांसाठी वाढवून देण्यात येईल तर आता आपण पाहुया की आपल्या नावावर किती सिम कार्ड आहे हे कसे पहायचे.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे का माहिती घ्यावी?

असे घ्या जाणून तुमच्या नावावरील सिम कार्ड


तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे का माहिती घ्यावी?

आजच्या तंत्रज्ञान युगात खूप विकसित झालेले तंत्रज्ञान लोक वापरत आहे. जेवढे तंत्रज्ञान प्रगत झाले तेवढेच ऑनलाईन चोऱ्या करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.ग्राहकांना थोडाही थांगपत्ता लागू देता ऑनलाइन चोर ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करत असतात.शिवाय ग्राहकांना मनस्ताप होतो.सिम कार्ड चा देखील असंच आहे समजा तुमचे ओळखपत्र चोरून कोणी तुमच्या नावावर सीम घेतला असेल तर याचे तुम्हाला काही माहीत नसते.समजा अशाप्रकारच्या तुमच्या सिम कार्ड वरून कुणी वाईट काम,धमकी देणे किंवा देश विघातक कृती केल्यास तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. कोणी ऑनलाईन चोरी किंवा इतर कृत्य केल्यास त्याचे परिणाम तुम्हास भोगावे लागू शकतात.यासाठी तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे हे माहिती असणे गरजेचे आहे.जर तुमच्या नावावर दुसरा कोणी सिम कार्ड वापरत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे याची पहिली माहिती असायला हवी.

असे घ्या जाणून तुमच्या नावावरील सिम कार्

दूरसंचार विभागाने ग्राहकांना त्यांच्या नावावर किती सिम कार्ड आहे याची माहिती मिळावी यासाठी एक वेबसाईट तयार केली आहे.या वेबसाईटवर देशातील आत्ताचे चालू स्थितीत असणारे सर्व मोबाईल रेकॉर्ड अपलोड केले आहे.येथे क्लिक करा या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड आहे हे अवघ्या तीस सेकंदात माहिती करून घेऊ शकतो तसेच आपल्या नावावर इतर कोणी सिम कार्ड वापरत  असल्यास त्याची देखील तक्रार करू शकतो.

फॉलो करा या सोप्या स्टेप्स
  • प्रथम येथे क्लिक करा ही टेलिकॉम विभागाची वेबसाईट ओपन करावी.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर तेथे आपला मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय करून घ्यावे.
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर अवघ्या तीस सेकंदात तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे.याचा डेटा तुम्हाला लगेच दाखवला जाईल.
  • सुचित दाखवलेला एखादा नंबर जर तुमचा नसेल तर तुम्ही रिपोर्ट या पर्यायाचा वापर करून रिपोर्ट करू शकता.
  • त्यानंतर This is not my number हा पर्याय निवडा.
  • आता वरती दिलेल्या एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आयडी दिसेल यानंतर तुम्ही रिपोर्ट पर्याय निवडून रिपोर्ट करायचा आहे.
  • रिपोर्ट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल.
अशाप्रकारे वरील सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमच्या नावावर खरच कोणी सिम कार्ड वापरत नाही ना याची माहिती घेऊन जर कोण सिम कार्ड वापरत असेल तर त्याची तक्रार देखील ऑनलाइन अगदी घरबसल्या आपल्या स्मार्टफोनवर करू शकतो.आपल्या देशाचे सुरक्षितता राखण्यासाठी एक सुज्ञ नागरिक म्हणून हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.आपण अगदी सोप्या पद्धतीने या गोष्टी वरील वेबसाइटवरून जाणून घेऊ शकतो.सरकारने नागरिकांना त्यांच्या ओळखपत्राचा कुणीही गैरवापर करू नये म्हणून ही ही सोय उपलब्ध करून दिली आहे तरी,सर्व नागरिकांनी या वेबसाईटचा वापर करून या सेवेचा लाभ घ्यावा.

 तुमच्या सिम कार्ड चा गैरवापर तर होत नाही ना अस करा चेक हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा,लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post