पॅनकार्ड वरील खराब फोटो बदला घरबसल्या स्मार्टफोनवर होय ही बातमी अगदी खरी आहे.आजकाल सर्व प्रकारच्या बँकेच्या,सरकारी व्यवहार यासाठी पॅनकार्ड हे खूप महत्त्वाचे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.पॅनकार्ड शिवाय हे कोणतेही व्यवहार पूर्ण होत नाही.खरेदी - विक्री ईतर कोणत्याही प्रकारचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी पॅनकार्ड लागतेच.बँक खाते उघडणे,पीएफ खात्यावरील पैसे काढणे या सर्वांसाठी पॅनकार्ड खूप महत्वाचे असते.

pancard,पॅनकार्ड,pancard correction,PAN Card photo correction,

पॅनकार्ड वरील खराब फोटो बदला घरबसल्या स्मार्टफोनवर आज काल सर्वच ठिकाणी आधार कार्ड प्रमाणे पॅनकार्ड देखील सक्तीचे करण्यात आले आहे.50 हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी देखील पॅनकार्ड लागते.आज सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवहारांत पॅनकार्ड महत्वाचे आहे.पॅनकार्ड वरील 10 अकडी नंबरच्या आधारे सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद ही ऑनलाईन राहते.सरकारसाठी ही नोंद खूप महत्वाची असते.पॅनकार्ड वरील सर्व नोंद ही तुम्हाला आयकर भरण्याच्या वेळेस फायदेशीर असते.या नोंदीवरच सर्व व्यवहार तपासले जातात.पण काही वेळेस पॅनकार्ड चा खूप वापर केल्याने त्यावरील फोटो खराब होऊ शकतो.मग मोठी अडचण होत असते.सर्व व्यवहारात अडचण भासत असते.म्हणून आज आम्ही तुम्हाला अगदी स्मार्टफोन वर घरीच बसून पॅनकार्ड वरील खराब फोटो कसा बदलावा याची माहिती देणार आहोत.


असा बदला तुमचा खराब फोटो

 • प्रथम पॅनकार्ड ची अधिकृत वेबसाईट NSDL वर जा.
 • येथे apply online आणि register असे दोन प्रकारचे पर्याय दिसतील.
 • ज्यातून तुम्ही नवीन पॅनकार्ड साठी applyonline आणि माहिती बदलण्यासाठी register user हा पर्याय वापरू शकता.
 • फोटो बदलण्यासाठी सध्याच्या पॅनकार्ड मध्ये बदल (correction in exciting PAN) हा पर्याय निवडायचा आहे.
 • त्यानंतर कॅटेगरी हा पर्याय येईल.त्यावर self किंवा वैयक्तिक हा पर्याय तुम्ही निवडू शकता.
 • त्यानंतर तुम्हाला सर्व विचारलेली माहिती भरावी लागेल.
 • नंतर CAPTCHA कोड टाकून भरलेली माहिती सबमिट करा.
 • त्यानंतर KYC हा पर्याय निवडायचा आहे.
 • यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील 1.फोटो 2.स्वाक्षरी न जुळणे यामध्ये फोटो बदला हा पर्याय निवडायचा आहे.
 • तुम्हाला तुमच्या पालकांची संपूर्ण विचारलेली माहिती भरायची आहे.
 • सर्व माहिती भरल्यानंतर,ओळखपत्र आणि ईतर कागदपत्रे माहिती भरायची आहे.
 • त्यानंतर एक घोषणापत्र येईल,त्यावर टिक करून मान्य आहे असे समजून सबमिट करावे.
 • त्यानंतर तुम्हाला एक नवीन नोंदणी क्रमांक दिला जाईल,त्या क्रमांकावर जाऊन तुम्ही तुमच्या सर्व अपडेट तपासू शकता.
 • अशा प्रकारे अगदी घरबसल्या सहज आणि सोप्या पद्धतीने पॅनकार्ड वरील खराब फोटो बदला. 
पॅनकार्ड चा वापर कोठे कोठे होतो -  

बँक - नवीन खात खोलने,50 पेक्षा जास्त व्यवहार,कर्ज काढणे,बँकेची एखादी योजना या ठिकाणी पॅनकार्ड गरजेचे असते.

खरेदी - विक्री - नवीन जागा खरेदी,जागा विक्री,वाहन खरेदी,वाहन विक्री,जमीन खरेदी - विक्री,

आयकर - आयकर भरणे यासाठी पॅनकार्ड गरजेचे आहे.

आधार कार्ड - आत्ता ज्या व्यक्तीकडे पॅनकार्ड असेल त्या व्यक्तीने पॅनकार्ड हे त्याच्या आधार कार्ड ला लिंक करावे लागते.सरकारतर्फे हे सर्व पॅनकार्ड धारकांसाठी लागू केले गेले आहे..
 
अशाप्रकारे पैशांच्या सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड हे खूप महत्त्वाचे  असते.पॅनकार्ड शिवाय या प्रकारचे सर्व व्यवहार अडकून बसतात.म्हणून पॅनकार्ड हे खूप जपून वापरणे गरजेचे असते.महसूल संबंधीच्या सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी सुद्धा पॅनकार्ड गरजेचे असते.म्हणून ते खूप जपून वापरा.तसेच सरकारने पण या संबंधीच्या दुरुस्तीसाठी खूप नवनवीन सुधारणा केल्या आहेत.त्या सुधारणांचा अवश्य लाभ घ्यावा.

पॅनकार्ड वरील खराब फोटो बदला घरबसल्या स्मार्टफोनवर हा computerguru वरील लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post