जनधन खात्यात बॅलन्स नसतानाही काढा 10 हजार रुपये हो हे अगदी खरं आहे.आपण सर्वजण बँकेत खाते खोलत असतो.बँकेत खाते खोलल्यानंतर त्यात काहीतरी पैसे कायमचे ठेवावे लागतात.असे न केल्यास आपल्याला दंड म्हणून काही रक्कम भरावी लागते.पण काही खाती अशी आहेत की ज्यामध्ये पैसे नसले तरी चालतात.सरकारच्या विशेष योजनेमधून ही खाती खोलली जातात.केंद्र सरकारने सुरू केलेली जनधन बचत खाते(PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana) सुद्धा असेच आहे.हे खाते शून्य बॅलन्स ठेऊन खोलता येते.या जनधन बचत खात्यामधून खूप साऱ्या योजना लाभार्थीना मिळतात.

Overdraft,(PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana),PMJDY,जनधन बचत खाते,

खरेतर भारतातील बहुतांशी गरीब लोक बँकेत खाते उघडता नाही.कारण त्यांच्याजवळ पैसे नसतात.म्हणून केंद्र सरकारने अशा गरीब लोकांसाठी त्यांनी बँकिंग प्रवाहात येण्यासाठी शून्य बॅलन्स खाते म्हणजेच त्या जनधन बचत (PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana) खाते उघडणे सुरू केले.आज करोडो लाभार्थी या खात्यांचे आहेत.जगातील बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठी ही योजना आहे.या मध्ये अपघात विमा, ओव्हर ड्राफ्ट, चेकबुक यासारख्या सुविधा जनधन बचत खात्यात मिळतात.आज या जनधन बचत खात्यामध्ये तुम्हाला 10 हजार रुपये कसे मिळतात ते सांगणार आहोत.

जनधन बचत(PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana) खाते कसे उघडायचे

  • खाते उघडणे साठी वय 10 वर्ष पूर्ण असावे.
  • ती व्यक्ती भारतीय रहिवाशी असावी.
  • एखाद्या व्यक्तीचे दुसरे खाते असल्यास ते जनधन बचत खात्यात बदलता येते.
  • खाजगी किंवा सरकारी बँकेत जनधन बचत खाते उघडता येते.
  • आपल्या जवळील बँकेत जाऊन जनधन बचत खाते साठी असणारा अर्ज भरून द्यावा.
  • अर्ज भरून दिल्यानंतर सर्व माहिती योग्य भरावी त्यानंतर बँक तुमचे खाते सुरू करून देईल.
जनधन बचत(PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana) म्हणजे काय ?

हा केंद्र सरकारचा एक महत्वकांक्षी कार्यक्रम असून भारतातील आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी बँकिंग व्यवहार माहिती व्हावी,बँकेचे नागरिकांसाठी असलेले फायदे त्यांना मिळावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.आज सर्वात जास्त खाती असणारी ही योजना झाली असून बँकिंग,सेविंग,कर्ज, योजना या सर्व गोष्टींचा यात लाभ घेता येतो.भारतातील आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना खूप फायद्याची ठरली आहे.अनेक लोक,शाळकरी मुले,कामगार या योजनेचा लाभ घेत आहेत.हे बँक खाते जवळील बँकेत,व्यवसाय प्रतिनिधी यांच्यामार्फत झिरो बॅलन्स ठेऊन खाते उघडून दिले जाते.

कसे मिळवाल 10 हजार रुपये

Overdraft,(PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana),PMJDY,जनधन बचत खाते,

(PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana) जनधन बचत खात्यात पैसे नसले तरीही 10 हजार रुपये तुम्ही ओव्हरड्राफ्ट ची सुविधा वापरून काढू शकता.
ओव्हरड्राफ्ट - एखाद्या खातेधारकाला पैशांची अत्यंत गरज भासते.परंतु त्याच्या बँक खात्यात पैसे नसतात.अशा वेळेस बँक त्या खातेधारकला पैसे देऊन 1 टक्का processing fee घेत असते.या सुविधेचा ओव्हरड्राफ्ट सुविधा असे म्हटले जाते.जनधन बचत खात्यातून देखील तुम्ही या पद्धतीने 10 हजार रुपये काढून आपले महत्वाचे काम करू शकता.आपण ज्याप्रकारे कमी कालावधीचे कर्ज घेतो तशीच ही योजना आहे.पूर्वी या सुविधेत 5 हजार रुपये मिळत होते,आत्ता 10 रुपये काढू शकता.याप्रकारे एखाद्या खातेधारकाची अडचण दूर होण्यास मदत होते.

पैसे काढण्यासाठी नियम काय आहे?
  • खाते धारकाचे वय 65 पेक्षा जास्त नसावे.
  • जनधन बचत खाते किमान 6 महिने जुने असावे.
  • खात्यास 6 महिने पूर्ण नसल्यास 2 हजार रुपये मिळतात.

अशाप्रकारे देशातील गरीब लोक बँकिंग क्षेत्रात येण्यासाठी जनधन बचत(PMJDY- Pradhanmantri Jan Dhan Yojana) ही योजना सरकारतर्फे सुरू करण्यात आली असून आज बहुतांशी सर्वच लोकांनी या प्रकाराची खाती उघडली आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थींना विविध प्रकारचे लाभ,योजना सरकारतर्फे देण्यात येतात.आजच्या काळात बँक खाते सर्वच प्रकारच्या व्यवहारांसाठी आवश्यक झाले आहे,म्हणून सरकारने आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी ही परवडणारी योजना सुरू केली आहे.

जनधन खात्यात बॅलन्स नसतानाही काढा 10 हजार रुपये हा computerguru वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post