WhatsApp चे सुरक्षा फीचर, WhatsApp web कंपनी नेहमीच ग्राहकांच्या डेटा तसेच प्रायव्हसी संबंधी सुरक्षेची काळजी घेत आली आहे. WhatsApp वरील ग्राहकांचा डेटा किंवा प्रायव्हसी संबंधी कोणतीही माहिती कोठेही लीक होऊ नये म्हणून सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले जाते.

व्हॉट्सॲप सुरक्षा फीचर,WhatsApp privacy fichar,WhatsApp,


WhatsApp चे सुरक्षा फीचर, WhatsApp web वरील ग्राहकांचा डेटा किंवा ईतर माहिती कोठेही लीक होऊ नये याची काळजी WhatsApp पूर्णपणे घेताना दिसून येते.आत्ता त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेसंबंधी नवीन फीचर आणली आहे त्यांनी ग्राहकांना अजुन सुरक्षेची हमी मिळणार आहे. WhatsApp flash call आणि multi leval reporting feature हि दोन खास फीचर WhatsApp ने त्यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.


WhatsApp चे नवीन फीचर्सचे महत्व

Chat लिकिंग चा धोका राहणार नाही - या नवीन फीचर द्वारे chat लिकिंग चा धोका राहणार नाही असे WhatsApp मार्फत सांगण्यात आले आहे.म्हणजेच हे फीचर युजर्स साठी खास आणि सुरक्षित असेच म्हणावे लागेल.प्रत्येक युजर ला 
प्रायव्हसी हवी असते आणि या फीचर द्वारे ती नक्कीच मिळणार आहे.

नको असलेल्या मेसेज ची तक्रार करता येणार - WhatsApp किंवा ईतर सोशल मीडिया ॲप वर खूप स्पॅम मेसेज येत राहतात.ते आपल्याला नको असते.म्हणून WhatsApp ने आपल्या नवीन फीचर मध्ये या मेसेज ची तक्रार करण्याची सोय केली आहे.म्हणजेच आपण नको असलेल्या मेसेज ना प्रतिबंध करू शकतो.युजर्स साठी हे फीचर देखील महत्वाचे आहे.

काय आहे WhatsApp चे नवीन फीचर्स

Whatsapp च्या म्हणण्यानुसार या दोन्ही फीचर्स ने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा कवच मिळणार आहे.तसेच chat लिकिंग सारख्या गोष्टींना आळा बसला जाईल.या फीचर्स द्वारे ग्राहकाचे सुरक्षा हित जपले जाणार आहे.

1.फ्लॅश कॉल 

आत्तापर्यंत WhatsApp वर अकाउंट सुरू करण्यासाठी सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड पाठवला जात असे पण आत्ता पासून फ्लॅश कॉल द्वारे ग्राहकाची माहिती मिळवली जाणार असून,हा फ्लॅश कॉल एक स्वयंचलित कॉल असून त्याद्वारे ग्राहकांची सत्यता पडताळून पाहिली जाईल. आत्ता ही सेवा अँड्रॉइड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे पण लवकरच आयओएस ग्राहकांसाठी ती उपलब्ध होणार आहे.फ्लॅश कॉल द्वारे whatsapp लॉगिन होण्यास वेळ देखील कमी लागणार आहे.तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसंबंधी हे फीचर खूप महत्वाचे आणि सुरक्षित आहे.

2. Multi leval reporting feature

WhatsApp च्या या फीचर द्वारे ग्राहक नको असलेल्या मेसेज ची तक्रार करू शकतो.युजर ग्रूपवर पाठवलेल्या मेसेज ची पण तक्रार करू शकतो.म्हणजेच आपल्याला नको असलेल्या मेसेज पासून आपली सुटका होणार आहे.हे फीचर aअँड्रॉइड तसेच आयओएस ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.तुम्हाला जो मेसेज नको आहे त्यावर एक बोट ठेऊन दाबून धरावे त्यानंतर रिपोर्ट म्हणून नाव येईल त्यावर क्लिक करा.त्यानंतर त्या नंबरचा रिपोर्ट होईल.याशिवाय नंबर ब्लॉक करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अँड्रॉइड ग्राहकांसाठी ही सुविधा पहिलीच उपलब्ध आहे,पण त्यात अजुन सोपेपणा करून देण्यात आला आहे.

अशा प्रकारे WhatsApp चे सुरक्षा फीचर, WhatsApp web याद्वारे आपल्या युजर्स साठी त्यांची खात्याची सुरक्षितता लक्षात घेऊन ही नवीन फीचर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.कोणतीही सोशल मीडिया साईट असूद्या ती ग्राहक हिताला प्राधान्य देत असते. मग WhatsApp यात कशी मागे राहील? आशा करूयात WhatsApp ची ही दोन्ही फीचर्स युजर्स साठी खूप उपयोगी ठरतील.

Computerguru वरील आजचा WhatsApp चे सुरक्षा फीचर, WhatsApp web हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने