WhatsApp वर मिळवा corona vaccine certificate अगदी 2 मिनिटांत आपण आजकाल कोठेही प्रवास करताना corona vaccine certificate असणे बंधनकारक करण्यात आले आहे.corona च्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.आपल्याला certificate ची मागणी केल्यास आपल्याकडे ते उपलब्ध नसते किंवा corona वेबसाइट वर जाऊन ते डाउनलोड करावे लागते.पण आत्ता तुम्ही तुमच्या WhatsApp वरून अगदी 2 मिनिटांत तुमचे corona vaccine certificate मिळऊ शकता अगदी निःशुल्क आणि सोप्या पद्धतीने मिळते.

Corona vaccine certificate,corona vaccine, corona vaccine certificate free download,corona vaccine certificate on WhatsApp

Corona च्या अनुषंगाने केंद्र सरकारने विविध सरकारी ॲप्लिकेशन सुरू केली आहेत.ज्यात लस घेण्यासाठी नोंदणी,आपल्या परिसरातील covid रुग्णांची माहिती देणारे ॲप,लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र देणारे ॲप अशी विविध ॲप्स सरकारने लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू केली आहेत.

आपण प्रवासात किंवा ईतर ठिकाणी कुठल्याही महत्वाच्या कामाला गेलो असता आपणास corona vaccine certificate ची गरज भासते.काही वेळा आपल्याजवळ उपलब्ध असते किंवा मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असते.घाईगडबडीत आपणास ते मिळत नाही किंवा ते शोधण्यास आपला बहुमूल्य वेळ वाया जात असतो शिवाय मनस्तापही होत असतो.या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने corona help desk म्हणून WhatsApp वरून वापरता येणारा एक नंबर दिला आहे आणि त्या नंबर वर आपण फक्त 2 मिनिटांत आपले corona vaccine certificate डाउनलोड करू शकतो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने व अगदी मोफत.

Corona help desk number ..

सरकारने लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि corona काळात लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रिय मेसेजिंग ॲप WhatsApp चा आधार घेऊन एक नंबर दिला आहे,ज्यावरून आपण आपले corona vaccine certificate डाउनलोड करू शकतो.9013151515 हा नंबर तुम्ही तुमच्या WhatsApp मध्ये सेव्ह करून तुम्ही तुमचे certificate अगदी सहज डाउनलोड करू शकता.त्याच बरोबर या हेल्प डेस्क वरून आपल्याला corona संबंधी माहिती,सुरक्षा कशी करावी,corona च्या नवनवीन बातम्या,आहार,प्रतिकारशक्ती कशी वाढवावी,याप्रमाणे इतर अनेक मोलाची माहिती मिळते,म्हणून हा नंबर आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायलाच हवा.WhatsApp वर या नंबर चा वापर करून corona vaccine certificate कसे मिळवायचे हे आपण आत्ता पाहू.

असे मिळवा corona vaccine certificate

  • 9013151515 हा नंबर आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्या.
  • WhatsApp ओपन करून या नंबर वर Certificate असे टाईप करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल वर सहा अंकी OTP येईल.
  • लस घेण्यासाठी जो मोबाईल नंबर दिला होता त्यावरच OTP येईल.
Corona vaccine certificate,corona vaccine, corona vaccine certificate free download,corona vaccine certificate on WhatsApp

  • सहा अंकी OTP येथे टाका.
  • त्यानंतर तुम्ही एका मोबाईल नंबर वर किती सदस्यांनी लस घेतली त्या सर्वांची नावे असलेला मेसेज येतो.
  • तुम्हाला ज्या नावाचे corona vaccine certificate हवे आहे तो नंबर खाली टाका..
Corona vaccine certificate,corona vaccine, corona vaccine certificate free download,corona vaccine certificate on WhatsApp

  • जो पर्याय तुम्ही टाकला आहे त्या व्यक्तीचे certificate तुम्हाला pdf file मध्ये प्राप्त होईल.
  • तुम्ही लगेच ते आपल्याला ज्या ठिकाणी गरज आहे तेथे दाखऊ शकता.
  • ही प्रक्रिया अगदी 2 मिनिटांत होते..
Corona vaccine certificate,corona vaccine, corona vaccine certificate free download,corona vaccine certificate on WhatsApp

त्यामुळे आत्ता तुम्ही कोठेही बाहेर प्रवासात किंवा ईतर खाजगी कामासाठी गेल्यास आणि corona vaccine certificate साठी अडवल्यास घाबरून जायचे कारण नाही किंवा आपला बहुमूल्य वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करण्याची गरज नाही.फक्त हा सरकारचा हेल्प डेस्क नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्या आणि तुम्हाला गरज भासेल तेव्हा अगदी 2 मिनिटांत तुमचे corona vaccine certificate डाउनलोड करुन हवे तेथे दाखऊ शकता.

Computerguru वरील आजचा WhatsApp वर मिळवा corona vaccine certificate अगदी 2 मिनिटांत हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post