surya grahan 2021 माहिती मराठी,solar eclipse,या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण,सूर्यग्रहण काय काळजी घ्यावी?2021 या सालातील अखेरचे सूर्यग्रहण डिसेंबर महिन्यात होत आहे.सूर्यग्रहण काळात काय काळजी घ्यावी?कोणते नियम पाळावेत?या सर्वांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.


सूर्यग्रहण काळात सुतक पाळण्याची प्रथा असते. वेद लागल्यापासून ते ग्रहण संपेपर्यंत सर्व नियम पाळावेत.भारतीय संस्कृतीत या गोष्टींना विशेष महत्व देण्यात आले आहे.ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी लागते.ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे पण धोकादायक असते.आजच्या लेखात आपण या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत.

का होते सूर्यग्रहण?(Why a solar eclipse?)वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केल्यास जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो आणि त्याची सावली सूर्यावर पडते आणि सुरू झोकळला जातो तेव्हा या स्थितीस सूर्यग्रहण लागले असे म्हणतात.भारतीय संस्कृतीत पण ग्रहण खूप महत्वाचे मानले गेले आहे.चंद्राची सावली सूर्यावर पडून सूर्यग्रहण घडून येते आणि ही घटना साधारण अमावस्या या तिथीस घडते.म्हणून सूर्यग्रहण अमावस्येला घडून येते तर चंद्रग्रहण पौर्णिमेस घडून येते.

सूर्यग्रहण दिवस व वेळ ( solar eclipse time and date)

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण डिसेंबर महिन्यात होत आहे.04 डिसेंबर रोजी हे सूर्यग्रहण होत आहे.शनिवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण घडून येत आहे.

ग्रहण प्रारंभ - 10 वाजून 59 मिनिटांनी

खग्रास प्रारंभ - 12 वाजून 33 मिनिटांनी

सूर्यग्रहण मध्य काळ - दुपारी 01 वाजून 04 मिनिटांनी

खग्रास समाप्ती - 01 वाजून 35 मिनिटांनी

ग्रहण समाप्ती - 03 वाजून 07 मिनिटांनी

कोणत्या प्रकारचे ग्रहण आहे? ( What kind of eclipse is this)

ग्रहण हे साधारण खग्रास,खंडग्रास आणि कंकणाकृती या तीन प्रकारची असतात.खग्रास ग्रहण म्हणजे चंद्र किंवा सूर्याचा काही भाग झाकला जातो.खंडग्रास ग्रहणात पूर्ण भाग झाकला जातो तर कंकणाकृती ग्रहणात चंद्र किंवा सूर्याचा मधील भाग झाकला जाऊन कडेचा भाग झाकला जात नाही,हा भाग गोल बांगडी म्हणजेच कंकणासारखा दिसतो म्हणून याला कंकणाकृती ग्रहण म्हणतात.या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण हे खग्रास सूर्यग्रहण या प्रकारातील आहे.

कोणत्या भागात दिसेल हे सूर्यग्रहण?(The eclipse will be visible in which area)


या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण जगातील काही भागांपूरतेच मर्यादित आहे.भारतामध्ये हे खग्रास सूर्यग्रहण दिसणार नाही.म्हणून भारतात ग्रहण काळातील कोणतेही नियम पाळू नये.हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया,आफ्रिकेचा दक्षिण भाग,प्रशांत,अटलांटिक,हिंद, अर्टिक या महासागर क्षेत्रांत पाहू शकता. ऑस्ट्रेलियाच्या ही केवळ दक्षिण भागातच हे
 सूर्यग्रहण दिसणार आहे.भारतात हे ग्रहण दिसणार नाही.म्हणून सर्व खगोलप्रेमिंची निराशा झाली आहे.

सूर्यग्रहण आणि ज्योतिष ( solar eclipse and Jyotish)

भारतामध्ये तसेच विदेशातही ग्रहण काळात ज्योतिष शास्त्रानुसार खूप महत्व दिले जाते.ग्रहण काळात पाळावयाचे नियम,व्रत,शुभ अशुभ अशा गोष्टींना विशेष महत्व असते.या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण हे मार्गशीर्ष अमावशेस 04 डिसेंबर रोजी घडून येत असून वृश्चिक राशीत लागत असून हे सूर्यग्रहण या राशीसाठी महत्वाचे आहे.तसेच अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्रावर देखील या सूर्यग्रहण प्रभाव पडणार आहे.म्हणून ग्रहणात ज्योतिष शास्त्राला खूप महत्व असते.

सूर्यग्रहण ही कामे करू नका

 • ज्योतिषांच्या मते ग्रहण काळात अन्न वर्ज्य मानले गेले आहे म्हणून या काळात अन्न सेवन करू नये.
 • ग्रहण काळात कोणतेही नवीन कार्य किंवा शुभ कार्य सुरू करू नये.
 • ग्रहण काळात केस,नखे कापू नये.
 • ग्रहण काळात झोपू नये.
 • चाकू किंवा धारदार वस्तू या काळात वापरू नका.
 • ग्रहण काळात घरातील मंदिराचे दरवाजे बंद ठेवावेत.
सूर्यग्रहण ही कामे करा
 • ग्रहण काळात देवतांची पूजा करा,मंत्रजप करावा.
 • ग्रहण काळात दानाचे खूप महत्व आहे,म्हणून या काळात दान करणे खूप शुभ आहे.
 • ग्रहण संपल्यानंतर स्नान करून कपडे बदलून टाका.
 • ग्रहण संपल्यानंतर सर्व घरदार स्वच्छ करावे.
 • घरामध्ये गंगेचे पाणी शिंपडावे.घर पवित्र करून घ्यावे.
वरील दिलेल्या सर्व मान्यता या ज्योतिष शास्त्राला अनुसरून आहे.ज्याच्या त्याच्या श्रद्धेने या मान्यता पाळाव्यात.आजच्या आधुनिक काळात या मान्यता फारशा महत्वाच्या मानल्या जात नाही.पण भारतात काही प्रमाणात या मान्यता पाळल्या जातात.ग्रहण ही भारतातील खूप महत्वाची घटना मानली जाते.म्हणून सूर्यग्रहण सर्व नियम पाळून पहावे.सूर्यग्रहण ही अवकाशात घडणारी एक अत्यंत महत्वपूर्ण घटना मानली जाते.

surya grahan 2021 माहिती मराठी,solar eclipse हा computerguru वरील आजचा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेअर करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post