Moon eclipse,चंद्रग्रहण 2021, या वर्षातील शेवटचे आणि सर्वात प्रदीर्घ चालणारे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर,शुक्रवार रोजी होत असल्याने भारतासह जगभरातील खगोलप्रेमींच या घटनेकडे लक्ष वेधले आहे.

Moon eclipse,चंद्रग्रहण2021

शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून या वर्षातील हे शेवटचे आणि खूप वेळ दिसणारे चंद्रग्रहण असणार आहे.सर्व खागोलप्रेमिंसाठी ही खूप मोठी संधी असणार आहे.Moon eclipse,चंद्रग्रहण 2021 यासाठी सर्व लोक आतुर झाले आहे कारण अशा प्रकारे प्रदीर्घ दिसणारे ग्रहण सुमारे 600 वर्षाने येत असते,म्हणून ही खूप मोठी पर्वणी आहे.


का होते चंद्रग्रहण?
Why a lunar eclipse?

जेंव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते, तेंव्हा पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीने झाकला जातो या घटनेला आपण चंद्रग्रहण म्हणून ओळखले जाते.ही घटना संपूर्ण वैज्ञानिक असून तिला विज्ञानाचा आधार आहे.ही घटना पौर्णिमेला घडत असते.

खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?
What is partial lunar eclipse?

खंडग्रास चंद्रग्रहण

पृथ्वीवरून चंद्राकडे पाहिले असता चंद्राचा काही भाग हा पृथ्वीच्या सावलीने झाकला गेलेला दिसतो आणि याच स्थितीस आपण खंडग्रास चंद्रग्रहण म्हणून
ओळखले जाते.

चंद्रग्रहण वेळ आणि कालावधी
Lunar eclipse time and date

19 नोव्हेंबर रोजी भारतात तसेच विदेशातही खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे.हे ग्रहण कार्तिक पौर्णिमा या दिवशी होणार असून ते भारतातील खूप कमी म्हणजेच पूर्वेकडील बाजूस दिसण्याची शक्यता आहे.दुपारी 12 वाजून 48 मिनिटापासून ते 04 वाजून 17 मिनिटांपर्यंत या ग्रहणाची वेळ आहे.तर म्हटल्याप्रमाणे सर्वात प्रदीर्घ दिसणारे हे ग्रहण तब्बल 03 तास 29 मिनिटे ते दिसणार आहे.म्हणजेच हे खंडग्रास चंद्रग्रहण खूप वेळ आपण पाहू शकणार आहोत.


तब्बल 580 वर्षांनी असे चंद्रग्रहण होते
Such a lunar eclipse occurs after 580 years

खगोलशास्त्रज्ञ म्हणतात की असे चंद्रग्रहण तब्बल 580 वर्षाने होत असते.त्यामुळे असे ग्रहण आपल्याला पाहायला मिळणे हे आपले भाग्यच म्हणायला हवे.असे ग्रहण 1440 या सालात दिसले होते तर परत ते 2669 रोजी दिसणार आहे आणि तोपर्यंत आपण असणार नाही.म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत आणि सर्वांनी अनुभवावे असे हे चंद्रग्रहण आहे.

चंद्रग्रहण आणि ज्योतिष
Lunar eclipse and Jyotish

भारतात हे ग्रहण दिसण्याची शक्यता कमीच आहे म्हणून भारतात कोणतेही नियम पाळू नये.तसेच हे चंद्रग्रहण उपप्रकरातील असून याचे सुतक पाळण्याची सुद्धा आवश्यकता नाही.ज्या भागात चंद्रग्रहण दिसणार आहे त्या भागात नियम पाळू शकता,पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेने पाळू शकता.

चंद्रग्रहण ही कामे करा...
Do lunar eclipse ...

  • गर्भवती स्त्रियांनी नियम पाळावेत.
  • ग्रहण काळात दान करणे खूप शुभदाई असते.
  • ग्रहण काळात मंत्र उजळणी करावी 
  • ग्रहण काळात मंत्र पठण हजारो पटीने लाभ देते.
  • ग्रहण काळात ज्योतिषांनी सांगितलेले उपाय करावेत.

चंद्रग्रहण ही कामे करू नका...
Don't do lunar eclipses ...
  • ग्रहण काळात कठोर भाषा वापरू नये.
  • ग्रहण काळात भांडणे करू नये.
  • ग्रहण काळात उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये.
  • ग्रहण काळात वाईट विचार करू नये.
  • ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी कोणतेही काम करू नये.

ग्रहण ही जरी नैसर्गिक घटना असली तरी भारतीय संस्कृतीत ग्रहण या घटनेला खूप महत्व आहे.ग्रहण ही घटना भारतीय संस्कृतीत खूप महत्वाची मानली जाते.एखाद्या व्यक्तीच्या मागे संकटे लागली तरी लोक त्या व्यक्तीच्या मागे ग्रहण लागले असे बोलतात.म्हणून ग्रहण कोणतेही असू आपल्या मनातील कोणतीही शंका येऊ नये म्हणून आपण ज्योतिषांनी किंवा आपल्या पूर्वजांनी सांगितलेले उपाय करण्यास हरकत नाही.

Computerguru वरील आजचा Moon eclipse,चंद्रग्रहण 2021 हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि फॉलो कारण्यास विसरू नका.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post