Indian post, पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना भारतीय पोस्ट भारतातील मध्यम वर्गातील नागरिकांसाठी एक छानशी योजना घेऊन आले आहे.नागरिकांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप आधार मिळणार आहे.भारतीय पोस्ट आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन आणि ग्राहकांच्या फायद्याच्या योजना घेऊन येत असते.आत्ताही भारतीय पोस्ट ने मासिक उत्पन्न म्हणून एक योजना आणली आहे.तिचा लाभ सर्व नागरिक घेऊ शकतात.


भारतीय पोस्ट, इंडियन पोस्ट, पोस्ट ऑफिस योजना, मासिक उत्पन्न योजना, भारतीय डाक

Indian post, पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना या मासिक उत्पन्न असून मध्यम उत्पन्न गट असणाऱ्या अनेक लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.कमीत कमी 1000 रू.पासून या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करावी लागेल.आत्ता केलेली कोणतीही गुंतवणूक आपल्याला भविष्यात लाभ देते.

मासिक उत्पन्न योजनेचे फायदे


भारतीय पोस्ट, इंडियन पोस्ट, पोस्ट ऑफिस योजना, मासिक उत्पन्न योजना, भारतीय डाक


विश्वसनीय - भारतीय पोस्ट ची कोणतीही योजना असुद्यात ती पूर्णपणे विश्वसनीय असते.कारण भारतीय पोस्ट पूर्णपणे सरकारी अधिपत्याखाली असणारी संस्था आहे.ज्यामध्ये गुंतवणूक ही कधीच वाया जात नाही.सरकार या गुंतवणुकीची जबाबदारी घेत असते.

इन्कम टॅक्समध्ये सवलत - पोस्टची मासिक उत्पन्न योजनेत सहभागी झाल्यास त्या व्यक्तीला इन्कम टॅक्समध्ये ही गुंतवणूक दाखऊन सवलत मिळवता येते.म्हणजेच तुम्ही जी रक्कम या योजनेत गुंतवणूक करणार आहात त्यावर तुम्ही इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळवू शकता

कमीत कमी हप्ता - पोस्टाच्या सर्व योजना या भारतातील सामान्य नागरिक डोळ्यासमोर धरून राबवल्या जातात.म्हणजेच अगदी 100 रू.महिन्यापासून आपण या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो.म्हणजेच सामान्य नागरिक त्याच्या मिळकतीप्रमाने या योजनांत गुंतवणूक करू शकतो.

सुलभता - अगदी अडाणी माणूस पोस्टाच्या योजनात गुंतवणूक करू शकतो.कारण त्या सुलभ असतात.फक्त पोस्टऑफिस मध्ये पैसे जमा केले तरी कार्डवर लिहून देतात.अशी सुविधा दुसऱ्या कोणत्याही योजनेत नाही.कारण पोस्टाच्या सर्व योजना मुळात देशातील सामान्य,अडाणी माणूस समोर ठेऊन राबवल्या जातात.


काय आहे मासिक उत्पन्न योजना
 • हि योजना पाच वर्षाच्या कालावधित राबवली जाते.
 • किमान 1000 रू. पासून 4.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
 • तुमचे जर संयुक्त खाते असेल तर 09 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
 • या योजनेत 6.60 दराने व्याज मिळते.
 • या योजनेत गुंतवणूकी दरम्यान किंवा जेंव्हा हवे तेंव्हा दर महिन्याला पैसे दिले जातात.
 • व्याज सुरू झाल्यापासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर किंवा मॅच्यूरीटी पर्यंत देत असेल तर त्यासाठी दावा करावा लागतो.
 • ही एक गॅरंटेड योजना असून गुंतवणूकदाराला त्याच्या रकमेवर 6.60 व्याज मिळते.आणि त्याची रक्कम मिळते.
 • जर खातेदाराचा मध्येच मृत्यू झाला तर त्याला मागील महिन्यापर्यंत चे व्याज आणि रक्कम त्याच्या वारसांच्या खात्यात जमा केली जाते.

मासिक उत्पन्न योजनेत कोण सहभागी होऊ शकतो


भारतीय पोस्ट, इंडियन पोस्ट, पोस्ट ऑफिस योजना, मासिक उत्पन्न योजना, भारतीय डाक


 • या योजनेत भाग घेणारी व्यक्ती भारतीय रहिवाशी असावी.
 • वयाची अट नाही फक्त अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांची कागदपत्रे जमा करावी लागतील.
 • तुमच्या जवळच्या पोस्टऑफिस मध्ये जाऊन तुम्ही या योजनेत भाग घेऊ शकता.

कसे आणि केव्हा मिळतील 1.50 लाख रुपये..

जर तुम्ही पोस्टच्या या योजनेत साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.तर तुम्हाला दर महिन्याला साडेसहा टक्के व्याजाने 2475 रू.मिळतील.आणि पाच वर्षाच्या नंतर 1,48,500 रू. मिळतील.या प्रकारे तुम्ही पोस्टात केलेली कोणतीही गुंतवणुक तुम्हाला पुरेपूर नफा मिळवून देणारी आहे.

Indian post, पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना या सर्व योजना पोस्टखात्याने भारतीय नागरिकांना त्यांची गुंतवणूक वाढावी,भारतीय नागरिकांना अधिक अधिक या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी या सर्व योजना राबवल्या जातात.त्यामुळेच सामान्य जनमानसात भारतीय पोस्ट खूप लोकप्रिय आहे.

Computerguru या ब्लॉगचा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा, आणि फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने