आरोग्य विमा कोणता निवडावा,health insurance आज कोरोनाच्या काळात health insurance विषयी सर्वजण सजग झालेले दिसून येत आहे.कारण कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला आरोग्य विम्याचे महत्व पटले आहे.आरोग्य विमा पॉलिसी ही सामान्य तसेच श्रीमंत लोकांसाठी पण फायद्याची योजना आहे.health insurance विषयी आज आपण सर्व माहिती पाहणार आहोत.

Health insurance,जीवन विमा,आरोग्य विमा पॉलिसी,PM आरोग्य विमा योजना,claim settlement,

कोरोना महामारीमुळे लोक आरोग्य विमा कोणता निवडावा,health insurance कोणता घ्यावा याचा विचार करताना दिसून येतात.कारण बाजारात फसवणूक करणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत.आरोग्य विमा पॉलिसी घेताना कुणाचीही फसवणूक होऊ द्यायची नसेल तर खालील गोष्टी लक्षात घेऊन मगच आपण त्या पॉलिसी ला होकार दिला पाहिजे.

आरोग्य विमा कोणता निवडावा,health insurance घेताना या गोष्टी नक्की बघा..

1. प्रतीक्षा काळ (Waiting period)

Health insurance,जीवन विमा,आरोग्य विमा पॉलिसी,PM आरोग्य विमा योजना,claim settlement,


समजा तुम्ही आजारी पडले तर कंपनी तुमचे बिल लगेच देत नाही,त्यासाठी काही कालावधी असतो आणि त्या कालावधी नंतर तुमचा claim मंजूर केला जातो.या काळाला प्रतीक्षा काळ किंवा waiting period असे म्हटले जाते.waiting period हा 15 दिवसांपासून 90 दिवसांपर्यंत असतो.ज्या कंपनीचा waiting period कमीत कमी दिवस असेल त्या कंपनीच्या विम्याला प्राधान्य देण्यात यावे.कारण प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज असते आणि ती गरज वेळेवर पूर्ण न झाल्यास नुकसान होऊ शकते.म्हणून health insurance policy घेताना या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.

2.विमा पास करण्याचे प्रमाण ( claim settlement resho)

Health insurance,जीवन विमा,आरोग्य विमा पॉलिसी,PM आरोग्य विमा योजना,claim settlement,


कोणत्याही कंपनीची पॉलिसी घेताना त्या कंपनीचा विमा पास करण्याचे प्रमाण म्हणजेच claim settlement resho पाहिला पाहिजे.ज्या कंपनीचे विमा पास करण्याचे प्रमाण अधिक असेल त्याच कंपनीचा विमा योजना घेण्याचा प्रयत्न करावा.
कारण जी कंपनी जास्त प्रमाणात विमा पास करते तिचा claim settlement resho हा सर्वात जास्त असतो.म्हणजेच त्या कंपनीच्या नियम व अटी जास्त कठोर नाहीत.असे म्हटले जाते.विमा कंपन्या दरवर्षी आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध करतात.त्यामध्ये हे प्रमाण दिलेले असते.त्यामुळे विमा पॉलिसी घेताना हा नियम सर्वांनीच पाळला पाहिजे.कंपनीच्या मागील पाच वर्षाच्या अहवालाचा अभ्यास करूनच आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी.


3. समाविष्ट खर्च ( Cost included)

Health insurance,जीवन विमा,आरोग्य विमा पॉलिसी,PM आरोग्य विमा योजना,claim settlement,


कोणत्याही कंपनीची पॉलिसी घेताना नियम व अटी पाहून घ्याव्यात.सर्व कंपन्या सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार च काम करतात तरी पण खूप पळवाटा शोधल्या जातात.जस की वैद्यकीय चाचणी खर्च,ambulance service, याचा समावेश करता नाही.मग हे सर्व खर्च आपल्याला करावे लागतात आणि नाममात्र खर्च पॉलिसी वाले करतात.बाजारात अशा खूप कंपन्या आहेत ज्या की ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आहेत.ग्राहक भरमसाठ नियम व अटी वाचत बसत नाही आणि तेथेच फसतो.म्हणूनच कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी घेताना नियम व अटी पाहून घ्याव्यात,जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि आपला बहुमूल्य पैसा वाया जाणार नाही.

4. को पे सेवा ( custumer pay)..

आपण health insurance घेताना जास्त primium किंवा जास्त रकमेचा हप्ता भरावा लागू नये म्हणून को पे सेवा निवडतो.या सेवेत एकूण बिलाच्या 10 टक्के ते कंपनीच्या नियमानुसार बिल आपल्याला भरावे लागते.कमी हप्ता असल्या कारणाने लोक ही सेवा निवडतात पण आजार जर गंभीर असेल तर खर्च पण जास्तच होतो आणि त्यातील काही हिस्सा आपला जातो म्हणजेच पॉलिसी च्या हप्त्यापेक्षा आपले कितीतरी पटीने पैसे जास्त खर्च होतात.म्हणून पॉलिसी घेताना संपूर्ण हप्ता भरा जेणेकरून आपल्याला कोणतीही रक्कम भरण्याची वेळ येत कामा नये.

हॉस्पिटल संख्या ( hospital network)

Health insurance,जीवन विमा,आरोग्य विमा पॉलिसी,PM आरोग्य विमा योजना,claim settlement,

पॉलिसी घेताना हा त्या कंपनीच्या हॉस्पिटल ची संख्या किती आहे हे पहा.ज्या पॉलिसीत हॉस्पिटल संख्या अधिक असेल तीच पॉलिसी घेण्याचा प्रयत्न करा.भले ती थोडी महाग का असेना.हॉस्पिटल संख्या अधिक याचाच अर्थ त्या कंपनीच्या रेपुटेशन वर असतो.जी कंपनी सेवा चांगली देत असेल त्याच कंपनीला हॉस्पिटल पण जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात.जर हॉस्पिटल संख्या अधिक असेल तर रुग्णाला पण हॉस्पिटल निवडण्याचा अधिकार मिळतो,यामुळे रुग्णाचा इतर खर्च वाचतो,होणारी गैरसोय होत नाही.विमा पॉलिसी घेताना या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये नाहीतर नंतर खूप निराश व्हावे लागते.

आरोग्य विमा,health insurance या गोष्टी कराच

विमा पॉलिसी वेळेवर रेन्यू करा.
सर्व माहिती वाचूनच पॉलिसी घ्या.
ईतर लोकांचा अनुभव विचारा मगच पॉलिसी निवडा.
विमा कंपनीचे हॉस्पिटल्स कसे आहेत त्यांची सेवा कशी आहे याचा विचार करा.
विमा पॉलिसी घेताना घाई गडबडीत निर्णय घेऊ नये.
विमा प्रतिनिधी पेक्षा विमा ग्राहकाचा अनुभव विचारात घ्या.

 या प्रकारे आरोग्य विमा निवडताना तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करावाच लागेल अन्यथा नंतर खूप निराशा हातात येऊ शकते.कारण कोणतीही कंपनी तिची सेवा सर्वोत्तम आहे अशीच जाहिरातबाजी करते आणि येथेच ग्राहकाची फसवणूक होण्याची शक्यता असते.कारण आजच्या काळात जाहिराती शिवाय पर्याय नाही.म्हणून कंपनीची जाहिरात कितीही आकर्षक असुद्यात पॉलिसी निवडताना वरील सर्व गोष्टींचा अभ्यास,ग्राहकांचा अभिप्राय विचारात नक्कीच घ्यावा.

Computerguru वरील आजचा आरोग्य विमा कोणता निवडावा,health insurance हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.
Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post