देशाच्या ग्रामीण भागात महिला जास्त प्रमाणात इंधन म्हणून लाकडे वापरतात,त्यातील विषारी घटकांमुळे,धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.म्हणून केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना सुरू करून ग्रामीण भागातील गरीब महिलांसाठी,कुटुंबासाठी मोफत गॅस कनेक्शन देणे सुरू केले आहे.या योजनेला ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.या योजनेत पाहिले पाच गॅस सिलेंडर मोफत मिळतात. सबसिडी थेट बँकेत जमा होते,पण आत्ता या उज्वला गॅस योजनेत मोठा बदल होऊ शकतो.

उज्वला गॅस योजना,PM उज्वला गॅस योजना,Ujwala Gas Yojana,मोफत गॅस सिलेंडर,

ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेल्या उज्वला गॅस योजनेत मोठा बदल होऊ शकतो,ही योजना ग्रामीण भागातील सर्व महिलांसाठी नवसंजीवनी ठरलेली योजना आहे.म्हणून तिची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे,म्हणून तिच्यात काही बदलही होऊ शकतात.


काय होणार बदल?

आगाऊ पैसे देण्याची पद्धत - आगाऊ पैसे देण्याची पद्धत बदल होऊ शकते.या पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो.तसेच सबसिडी ही योजना चालू राहू शकते. सबसिडीत किरकोळ बदल होऊ शकतो.

LPG सिलिंडर मोफत मिळतो - या योजनेत ग्राहकांना 14.2 kg. चा LPG सिलिंडर स्टोव्ह मोफत मिळतो.त्याची किंमत सुमारे 3200 असते.याची 1600 रू.रक्कम सरकार तर 1600 रू.ऑईल कंपन्या अनुदान म्हणून ग्राहकांना देत असतात.या प्रकारे ग्राहकांना मोफत कनेक्शन मिळत असते.


उज्वला गॅस योजना रजिस्ट्रेशन असे कर

  • उज्वला गॅस योजनेत सहभागी होणे खूप सोपे आहे.
  • दारिद्र् BPL रेषेखालील महिला उज्वला गॅस योजनेत सहभागी होऊ शकतात.
  • PM उज्वला गॅस योजना https://www.pmuy.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन माहिती बघा आणि रजिस्ट्रेशन करावे.
  • Ragistration साठी एक फॉर्म लागतो तो जवळच्या LPG वितराकडून घेऊन ती पूर्णपणे भरावा.व वितरकाकडे जमा करावा.
  • या फॉर्म मध्ये महिलेचे नाव,जनधन बँक खाते नंबर,आधार नंबर,कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती आणि आधार नंबर देणे.
  • सर्व माहिती,फॉर्म भरून दिल्यानंतर सर्व माहितीची पडताळणी होऊन त्या महिलेला गॅस सिलेंडर मिळतो.
या प्रकारे जगातील सर्वात मोठी मोफत गॅस योजना म्हटली तरी चालेल अशी ही उज्वला गॅस योजना केंद्र सरकारने आर्थिक मागास प्रवर्गातील महिलांसाठी सुरू केली आहे आणि खूप महिलांनी आत्तापर्यंत या योजनेसाठी नाव नोंदवले आहे.बऱ्याच महिलांना गॅस सिलेंडर मिळाले देखील आहे.ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांची चुलीपासून सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली उज्वला गॅस योजना आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी नक्की घ्यावा अशीच ही योजना आहे.

Computerguru वरील आजचा उज्वला गॅस योजनेत मोठा बदल हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि संगणक गुरू या आमच्या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने