आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे.संगणक हा आज माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे.अगदी पहिली दुसरीची लहान मुले पण संगणक हाताळू लागलो आहे.आज संगणकाविषयी संगणक माहिती मराठी या आजच्या लेखात आपण संगणकाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

computer parts,संगणक माहिती,Computer,संगणक पार्ट,संगणक,


संगणक म्हणजे काय?

What is Computer?


संगणक एक यंत्र असून सर्व प्रकारच्या तांत्रिक क्र्या करण्याचे काम संगणक करतो.संगणक त्याला दिल्या जाणाऱ्या अज्ञावलीच्या आधारे मानवी जीवनातील इतर अवघड कामेही संगणक पूर्ण करतो.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर,संगणक हे यंत्र तांत्रिक, गणन,यांत्रिक कार्य करू शकतो.आज आपण विविध रोबोट पाहतो,त्याला अज्ञा देण्याचे काम देखील एक संगणकच करत असतो.
अगदी छोट्याशा लॅपटॉप पासून तर अगदी अगडबंब मशिनरी असणारे संगणक,एखाद्या खोलीत बसेल इतका संगणक इतकी व्याप्ती संगणकाची आहे.संगणक हा ज्या त्या क्षेत्राच्या वापरानुसार त्याची व्याप्ती बदलत असते.

संगणक कसा हाताळावा?

How to handle computer?

संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र असून त्याचा वापर हा सुरक्षित करावा.संगणक हाताळणी पण व्यवस्थित असावी.संगणक हाताळताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
  • संगणक हा स्वच्छ हवा येईल अशा खोलीत ठेवावा,त्या खोलीत जास्त धूळ येता कामा नये.
  • संगणकाला वीज अर्थिंग बसवून घ्यावी जेणेकरून शॉक बसणार नाही.
  • संगणक वापरून झाल्यावर त्यावर कपडा घालावा,जेणेकरून धुळीपासून संरक्षण होईल.
  • संगणकाचा सी.पी. यू. दर पंधरा दिवसांनी खोलून पुसून घ्या,हवेच्या प्रेशर ने जाळ्या झाल्या असतील तर दूर करा.
  • मॉनिटर ला स्पर्श करू नका,फक्त कोरड्या फडक्याने पुसून काढा.
  • संगणकाला UPS जोडा म्हणजे वीज गेली तरी तुमचा संगणक थोडा वेळ सुरू राहील.
  • संगणकाचा कीबोर्ड आठवड्याला साफ करत जा 
अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात,जेणेकरून या द्वारे आपण आपल्या संगणकाची लाईफ वाढवू शकतो.

संगणकाचे भाग

Parts of Computer

हार्डवेअर पार्ट - संगणकाच्या ज्या भागांना आपण स्पर्श करू शकतो त्या भागांना आपण हार्डवेअर पार्ट म्हणून ओळखतो.
उदा.मॉनिटर,CPU,कीबोर्ड,माऊस 

मॉनिटर - संगणकाचे टेलिव्हिजन सारखे दिसणारे साधन म्हणजे मॉनिटर होय,संगणकाच्या सर्व अज्ञांचे परिणाम दाखवण्याचे काम मॉनिटर करत असतो.उदा.आपण बेरीज केल्यास मॉनिटर वर सर्व दिसते.
computer parts,संगणक माहिती,Computer,संगणक पार्ट,संगणक,


प्रकार - CRT monitor - पूर्वी जे मोठ्या टेलिव्हिजन सारखे जाड दिसणारे मॉनिटर होते त्यांना CRT monitor असे म्हणतात.
LCD monitor - आजच्या काळात एलसीडी टीव्ही प्रमाणे मॉनिटर पण स्लिम आलेत त्यांना एलसीडी मॉनिटर असे म्हणतात.

C.P.U. - माणसाला ज्या प्रमाणे मेंदू असतो त्या प्रमाणे संगणकाला पण सर्व काम करण्यासाठी मेंदूचा वापर करावा लागतो आणि CPU ला संगणकाचा मेंदू म्हणून ओळखला जातो.
computer parts,संगणक माहिती,Computer,संगणक पार्ट,संगणक,


CPU - सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे म्हटले जाते.संगणकाला दिल्या जाणाऱ्या सर्व आज्ञा प्रथम CPU कडे जातात आणि मग त्या नुसार सर्व आज्ञांवर कार्य करण्याची जबाबदारी CPU पार पाडत असतो.

कीबोर्ड - संगणकाला आपण आज्ञा देतो,म्हणजे नेमके काय करतो? हा प्रश्न सर्वांना पडतो,आज्ञा देणे म्हणजे आपल्याला हवे असलेले काम किवा उत्तर आपण विविध बटणे असलेल्या कीबोर्ड वर टाईप करून आपले म्हणणे किबा आज्ञा आपण संगणकाला देऊ शकतो.म्हणून संगणकाला आणि मानवाला जोडणारा दुवा म्हणून कीबोर्ड ओळखला जातो.
computer parts,संगणक माहिती,Computer,संगणक पार्ट,संगणक,


कीबोर्ड वर न्युमरिक किज - 1 ते 9,फंक्शन किज - F1 ते F12, अल्फाबेटिकल किज a ते z,त्याचप्रमाणे विविध उपयोगी पडणारी बटणे असतात.

माऊस - संगणकावर कीबोर्ड बरोबर विविध कार्य करायला उंदरासारखे छोटेसे एक साधन असते त्याला आपण माऊस म्हणून ओळखले जाते.संगणकावर टायपिंग,चित्रे,आज्ञा देताना खूप उपयोगी पडणारे साधन म्हणजे माऊस होय. माऊसला तीन बटणे असतात.एक उजवे बटन,एक डावे बटन,एक मधील बटन ,मूर्ती छोटी पण कीर्ती महान असे कार्य या माऊस चे आहे.
computer parts,संगणक माहिती,Computer,संगणक पार्ट,संगणक,


सॉफ्टवेअर पार्ट - संगणकाच्या जे भाग त्यांना आपण प्रत्यक्ष हात लावू शकत नाही,अशा संगणकाच्या भागांना सॉफ्टवेअर पार्ट असे म्हणतात.
उदा.RAM,ROM

RAM - Random access memory या मेमरी चे कार्य संगणाकमधील माहिती तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवण्याचे असते.
ROM - Read only memory या मेमरी चे कार्य संगणकमधील माहिती कायमस्वरूपी साठवून ठेवण्याचे असते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • संगणकाचा शोध कोणी लावला? - चार्ल्स बॅबेज
  • भारताचा पहिला सुपर संगणक कोणी बनवला? - विजय भाटकर
  • भारताचा पहिला सुपर संगणक नाव काय? - परम
संगणक मेमरी माहित

1 kb - 1024 byte

1 mb - 1024 kb

1 gb - 1024 mb

1 tb - 1024 gb 

1 pb - 1024 tb

संगणकाची माहिती साठवणारी ही एकके आहेत.

या प्रकारे आपण या लेखात संगणक म्हणजे काय? संगणक कसा तयार होतो? याची माहिती पाहिली.आमची Computerguru वरील आजचा संगणक माहिती मराठी हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करा, लाईक करा, आणि फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने