Net banking information in marathi,hdfc netbanking, netbanking


नेट बँकिंग म्हणजे काय?

Net banking information in marathi बँकेत न जाता घरबसल्या मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केलेल्या बँकेच्या व्यवहाराला नेट बँकिंग असे म्हणतात.बँकेत न जाता आपण दररोज नेट बँकिंग चा वापर करून पैशांची देवाण घेवाण करत असतो.अशा प्रकारच्या बँकिंग व्यवहाराला नेट बँकिंग असे म्हणतात.


Online bankingनेट बँकिंग चे फायदे काय आहेत?

 • नेट बँकिंग सुविधा दिवसभर म्हणजेच 24 तास उपलब्ध असते.
 • आपल्या बहुमूल्य वेळेची बचत होते.
 • व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही,घरबसल्या आपण व्यवहार करू शकतो.
 •  नेट बँकिंग वापरण्यास सुलभ आहे.
 • नेट बँकिंग द्वारे आपल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद आपोआप होते.
 • आपण घरबसल्या आपले खाते नोंद पाहू शकतो.
 • आजच्या आधुनिक धावपळीच्या युगात नेट बँकिंग द्वारे माणूस आपले काम सोपे करू शकतो.

 नेट बँकिंग चे खाते कसे खोलावे?

 • आपल्याला ज्या बँकेत खाते खोलायचे आहे त्या बँकेचे ॲप्लिकेशन आपल्या स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल करा.
 • ॲप उघडून त्यातील न्यू रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक करा.
 • त्यानंतर बँकेची माहिती भरा.
 • आपले अकाउंट माहिती भरा.
 • त्यानंतर ATM कार्ड माहिती भरा.
 • आपला बँकेत रजिस्टर मोबाईल नंबर टाकून OTP मागवा.
 • त्यानंतर OTP टाका,तुमचे नेट बँकिंग चालू होईल.
दुसरी पद्धत

 • आपल्या ज्या बँकेची नेट बँकिंग सेवा सुरू करायची आहे त्या बँकेचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा.
 • ॲप्लिकेशन वरील सर्व माहिती भरा आणि ते ॲप्लिकेशन बँकेत जमा करा.
 • बँक सर्व माहिती पाहून आपले नेट बँकिंग अकाउंट सुरू करते,त्याचा कस्टमर आयडी आणि पासवर्ड आपल्याला देण्यात येतो.
 • कस्टमर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण नेट बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतो.

नेट बँकिंग व्यवहार प्रकार

NEFT - नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर

हे व्यवहार मर्यादित रकमेत केले जातात.व्यवहार रकमेला मर्यादा असतात.व्यवहार पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो.हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी बॅच लागतो,त्याचा नंबर आल्यावर व्यवहार पूर्ण होतो.

RTGS - रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट

या प्रकारात व्यवहार स्वतंत्र हाताळला जातो.एखादा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण केला जातो.व्यवहार पूर्ण झाल्यास लगेच कळवले जाते.Real वेळेत केला जाणारा हा व्यवहार आहे.

नेट बँकिंग वापरताना काय काळजी घ्यावी

 • आपला कस्टमर आयडी आणि पासवर्ड कोणालाही सांगू नका.
 • आपल्याला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास त्याने आपल्या नेट बँकिंग चे पासवर्ड मागितल्यास देऊ नका.
 • आपल्या मोबाईलवर बँकेचा OTP आल्यास कुणालाही सांगू नका.
 • ज्या स्मार्टफोन मध्ये आपण नेट बँकिंग वापरतो त्यास अँटीव्हायरस टाकून घ्या.
 • नेट बँकिंग ची माहिती कुणालाही सांगू नका.
 • फसव्या कॉल पासून सावध रहा.
आमच्या याही पोस्ट नक्की बघा.

ComputerGuru वरील आजचा Net banking information in marathi हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने