How to rank blog post on google, ब्लॉग पोस्ट रँक कशी करावी,ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग कसा लिहावा? Why blog post not ranking? Image SEO,Blog SEO,SEO for blog, ब्लॉग चा SEO कसा करावा?कीवर्ड चे महत्व.

How to rank blog post

ब्लॉग सुरु केल्यानंतर सर्वांना खालील प्रश्न पडतात?

How to rank blog post on google, ब्लॉग पोस्ट रँक कशी करावी,ब्लॉग म्हणजे काय? ब्लॉग कसा लिहावा? Why blog post not ranking? Image SEO,Blog SEO,SEO for blog, ब्लॉग चा SEO कसा करावा?कीवर्ड चे महत्व.

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज Computerguru या आपल्या आवडत्या ब्लॉगवर पाहणार आहोत.कोणताही नवीन ब्लॉगर जेव्हा ब्लॉग सुरू करतो तेंव्हा त्याला या सर्व गोष्टींची फारशी कल्पना नसते.पण नवीन ब्लॉगर जेव्हा भरपूर पोस्ट लिहत असतो आणि त्यातील एक ही पोस्ट गूगल रँक होत नसते तेव्हा त्याला काळजी वाटू लागते आणि ब्लॉगिंग मधील उत्साह कमी होऊन जातो. तेंव्हा माझ्या नवीन ब्लॉगर मित्रांसाठी मी आज पोस्ट रँक कशी करावी? या विषयी सांगणार आहे.

कीवर्ड  - Keyword

नवशिक्या ब्लॉगर ला keyword म्हणजे काय? हे बऱ्याच वेळा माहित नसते.मलाही प्रथम माहित नव्हते.आपण मग कोणतेही शीर्षक घेऊन ब्लॉग पोस्ट लिहत असतो.शीर्षक हाच keyword असतो. पण तुमचा keyword किती आकर्षक आहे,लोक किती प्रमाणात तो शोधतात हे पण महत्वाचे आहे.यासाठी आपण कीवर्ड रिसर्च टूल वापरले पाहिजे.ज्यातून तुम्हाला आकर्षक कीवर्ड,त्याची महिन्याची शोध क्षमता,त्याची काठीन्यता, सीपीसी याची माहिती मिळते.नवीन ब्लॉगर्सना प्रथम फ्री कीवर्ड टूल वापरावे.याने नवीन शिकायला मिळते शिवाय पैसेही वाचतात.

कीवर्ड टूल - Keyword tool

Goggle keyword planner हे ॲप सर्वात स्वस्त आणि मस्त ॲप आहे. गूगल कीवर्ड प्लॅनर या द्वारे आपण कीवर्ड रिसर्च करू शकतो अगदी सहज सोपे आहे.

Semrush  हे कीवर्ड टूल खूप छान आहे.पण हे पेड आहे.यामध्ये प्रथम सात दिवस फ्री ट्रायल घेऊ शकतो.ब्लॉग seo पासून ते ब्लॉग पोस्ट रँक पर्यंत सर्व रिपोर्ट यात मिळतात.

Ubersuggest नील पटेल यांचे अतिशय लोकप्रिय ॲप,हे ॲप पण पेड आहे.पण दिवसातील तीन ट्रायल यावर फ्री मिळतात.या तीन संधींचा आपण रोज लाभ घेऊ शकतो.

Seobility  हे पण पेड व फ्री या प्रकारातील ॲप आहे.यावरून आपण फ्री मध्ये कीवर्ड रिसर्च करू शकतो.

keywordtool या टूल वर आपणास प्रत्येक कीवर्ड चे प्रथम तीन रिझल्ट दिसतात.कोणता कीवर्ड लोक शोधतात ते प्रथम या ॲप मध्ये दाखवले जाते.

या प्रकारे तुम्ही कीवर्ड म्हणजे काय? कीवर्ड रिसर्च कसा करावा? कीवर्ड रिसर्च टूल यांची माहिती पाहिली.कोणतीही पोस्ट लीहाताना प्रथम या सर्व गोष्टींचा विचार नक्कीच करावा.

शॉर्ट टेल कीवर्ड की लाँग टेल कीवर्ड निवडावा - Short tail keyword and long tail keyword how to chose?


आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शॉर्ट टेल आणि लाँग टेल काय नवीनच,पण याच्यात सुद्धा एक लॉजिक आहे.शॉर्ट टेल कीवर्ड म्हणजे कमीत कमी शब्दात असणारा कीवर्ड उदा. Free domains register हा झाला कमीत कमी शब्दात असणारा कीवर्ड आणि लाँग टेल कीवर्ड म्हणजे Register free domains in marathi हा झाला लाँग टेल कीवर्ड आत्ता हा फरक तुम्हाला नक्कीच लक्षात आला असेल.

आत्ता प्रश्न पुढचा असा आहे की,कोणता कीवर्ड निवडावा,शॉर्ट टेल की लाँग टेल?

कीवर्ड निवडताना नेहमी तो लाँग टेल कीवर्ड निवडावा असे सांगितले जाते.कारण असे की लाँग टेल कीवर्ड हा मोठा असतो आणि गूगल वर त्याचे सर्च रिझल्ट कमी असतात म्हणूनच लाँग टेल कीवर्ड निवडावा जेणेकरून तुमच्या कीवर्ड मधील स्पर्धा कमी होऊन तुमचा कीवर्ड रँक होईल.

कीवर्ड चे महत्व - Importance of keyword

पूर्वी कीवर्ड लिहाताना त्याचा उल्लेख मेटा टॅग मध्ये करावा लागे पण आत्ता त्याची गरज नाही.कारण गूगल सर्च इंजिन खूप स्मार्ट झाले आहे. गूगल अल्गोरिदंम खूप स्मार्ट झाला आहे.कीवर्ड तुमच्या पोस्ट मध्ये योग्य त्या जागी वापरले असल्यास तुमची पोस्ट हमखास रँक होईल. गूगल सर्च इंजिन कीवर्ड बरोबर सर्च करून लोकांना त्याचा रिझल्ट दाखवते.

ब्लॉग पोस्ट कशी लिहावी? How to write blog post?

 • लोकांना आकर्षित करेल असा कीवर्ड निवडावा जेणेकरून लोक त्यावर क्लिक करतील.
 • H1 टॅग मध्ये व्यवस्थित माहिती भरावी.ब्लॉगचे शीर्षक,महत्वाचे शब्द त्यात टाकावेत.
 • मेजर हेडिंग यामध्ये कीवर्ड वापरावा,हे बोल्ड असावे.
 • हेडिंग व्यवस्थित लिहावे,हेडिंग मध्ये आपल्या पोस्ट विषयी थोडक्यात माहिती लिहावी.
 • तुमच्या ब्लॉग पोस्टच्या पहिल्या शंभर शब्दांत कीवर्ड आला पाहिजे अशी पोस्ट लिहून काढा.
 • शिर्षकामध्ये कीवर्ड ठेवत जा.तुमचा जो कीवर्ड असेल तो पोस्ट च्या टायटल मध्ये ठेवत जा.
 • ब्लॉग साधारण किती शब्दात असावा असा प्रश्न सर्वांना पडतो तर त्याचे उत्तर असे आहे की,500 ते 600 शब्द साधारण,600 ते 1000 शब्द चांगला,1000 ते 2500 शब्द खूप छान यावरून तुमच्या लक्षात येईल की,तुमची पोस्ट कमीत कमी 2000 शब्दांत असावी.जास्त शब्दांत असणारी पोस्ट रँक लवकर होते.वाचक पण जास्त माहिती असलेल्या पोस्ट वर खिळून राहतात,जेणेकरून ब्लॉग चा वाचन वेळ वाढत जातो.जास्त शब्द असलेल्या पोस्ट बॅकलिंक मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात.
 • ब्लॉग पोस्ट मध्ये इमेज टाकून फायदा नाही. गूगल मेटा टॅग असलेल्या इमेज शोधते.म्हणून इमेज वापरताना alt टॅग वापरून इमेज optimise करत जा.इमेज ला alt टॅग टाकत जा.
 • ब्लॉग पोस्ट लिहत असताना त्यात लेबल जोडा. लेबल जोडणे पोस्ट रँक साठी खूप फायदेशीर असते.
 • त्याचप्रमाणे पोस्ट चे सर्च रिझल्ट व्यवस्थित भारत जा.ज्यावरून गूगल ला तुमच्या पोस्ट विषयी लक्षात येईल.
पोस्ट लिहीत असताना वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करून पोस्ट लिहावी.कारण पोस्ट स्वतःच्या शब्दात,गुणवत्तापूर्ण असावी. गूगल च्या सर्व नियमांनुसार पोस्ट लिहावी.कारण गूगल आपल्याला सर्व माहिती पुरवतच असते,फक्त गूगल च्या मतानुसार पोस्ट लिहा ती नक्कीच रँक होईल.

URL छोटा व सुटसुटीत असावा- Optimise URL

ब्लॉग पोस्ट लिहून झाल्यानंतर तिचा URL तयार करताना तो छोटा असावा.मोठा URL असल्यास गूगल ला शोधण्यास मर्यादा येतात.छोटा URL मोठ्या URL च्या तुलनेत लवकर सर्च होतो.त्यामुळे ब्लॉगचे ट्रॅफिक वाढण्यास मदत होते.
उदा. Computerguru. online/blog/seo/tips
Computerguru.online/seo
 
या मध्ये दोन नंबरचा URL adress छोटा आहे म्हणून तो गूगल सर्च इंजिन वर लवकर सर्च होऊ शकतो.त्यामुळे URL छोटासा ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Visitor पेज वर थांबण्याचा वेळ वाढवा - Increase visitor reading time

तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहून झाल्यानंतर ती पब्लिश केल्यानंतर,वाचकांना ती वाचण्यास उपलब्ध होते.पण वाचक तुमची पोस्ट किती वेळ वाचतो यालाही महत्त्व आहे.जर वाचक तुमची पोस्ट वाचून लगेच  बाहेर पडत असेल तर तुमची पोस्ट रँक होण्यास प्रतिबंध होतो. युजर ने तुमच्या URL वर क्लिक केल्यापासून युजर परत मागे गूगल सर्च इंजिन वर येण्याचा हा वेळ म्हणजेच visitor engagement टाईम असतो तो जितका जास्त वेळ असेल तितकी तुमची पोस्ट मनोरंजक,वाचनीय,महत्वाची आहे असे गूगल ला वाटते व तो पोस्ट रँक करत असतो.
ब्लॉग पोस्ट मध्ये व्हिडिओ,फोटो वापरून पोस्ट अधिक मनोरंजक करावी.
पोस्ट मध्ये विविध क्लृप्त्या वापराव्यात. फोटोंचा कलात्मक वापर करून पोस्ट लिहावी.

बाऊन्स रेट कमी करा - Bounce rate

Bounce rate


तुमच्या ब्लॉग वरील बाऊन्स रेट कमी ठेवा.जास्त बाऊन्स रेट झाल्यास पोस्ट रँकिंग ला ते अडचणीचे ठरते.बाऊन्स रेट चेक करण्यासाठी गूगल anyalitics या टूल चा वापर करावा.बाऊन्स रेट नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावा.

पेज लोडींग स्पीड वाढवा - Increase page loading speedगूगल सर्च रिझल्ट दाखवताना गूगल सर्च इंजिन कमी वेळात लोडिंग होणारे पेज दाखवतात. लोडिंग जास्त असणारे पेज आपोआप मागे पडतात किंवा सर्च रिझल्ट मधून बाद होतात.म्हणून आपल्या ब्लॉगचा लोडिंग स्पीड वाढवा.

ब्लॉगचे लोडिंग स्पीड कसे वाढवावे - how to increase blog loading speed

Page loading speed

 • ब्लॉग च्या थीम मधील अनावश्यक पेज काढून टाका.
 • थीम मधील अनावश्यक फाईल काढून टाका.
 • थीम मधील अनावश्यक HTML फाईल काढून टाका.
 • ब्लॉगची डिझाइन व्यवस्थित करा.जास्त भडक कलर टाळावेत.
 • ब्लॉग सुटसुटीत ठेवावा.

SEO म्हणजे काय? What is SEO?

SEOब्लॉग पोस्ट लिहून झाल्यानंतर आपण त्या पब्लिश करतो,पण काही कारणास्तव त्या पोस्ट गूगल सर्च इंजिन वर आपल्या पोस्ट दिसत नाही.मग आपण निराश होतो.ब्लॉग बंद करण्याचा विचार आपल्या मनात येतो.पण या मागचे नेमके कारण काय आहे हे आपण पाहत नाही,तर त्या मागचे कारण आहे SEO आपला ब्लॉग  SEO करून घेणे होय.

Search engine optimization हा साधा आणि सोपा अर्थ होतो  SEO चा.आपला ब्लॉग गूगल सर्च इंजिन वर रँक होण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया म्हणजेच  SEO होय.

 SEO किती प्रकारचे असतात? Type of  SEO

On page SEO - आपल्या ब्लॉग च्या प्रदर्शनासाठी काही ऑनलाईन प्रक्रिया कराव्या लागतात.त्यांना on page SEO म्हणून ओळखले जाते.On page SEO मध्ये सर्व तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात.

1.शीर्षक - Tital

तुमच्या ब्लॉग पोस्ट चे टायटल हे आकर्षक,युजर फ्रेंडली असावे.युजर शीर्षक पाहून त्यावर क्लिक करतील असे शीर्षक लिहा.

2. मेटा वर्णन - Meta description

Meta descriptionतुमचे मेटा वर्णन आकर्षक असावे.युजर ची नजर त्यावर लगेच गेली पाहिजे.मेटा वर्णन खूप महत्वाचे आहे.

3. हेड टॅग - heading tag

H1 हे पोस्टचे टायटल असते.H1 ते H6 पर्यंत आपण हेड टॅग वापरून आपली पोस्ट आकर्षक बनवू शकतो.युजर अशा पोस्ट नक्की बघतात.

4. नवीन माहिती - Unic contain

युजर नेहमी नवीन काय आहे ते पाहत असतात.लोकांना पण मार्केट मध्ये नवीन काय आहे त्याची आवड निर्माण होते.म्हणून नेहमी नवीन माहिती लिहण्याचा प्रयत्न करावा.नवनवीन माहितीला ब्लॉगवर तसेच गूगल वर खूप मोठ्या प्रमाणावर महत्व आहे.


ऑफ पेज SEO - Off page SEO 

गूगल सर्च इंजिन वर आपली पोस्ट किंवा ब्लॉग दिसण्यासाठी जे ब्लॉग किंवा पोस्ट ची जाहिरात करावी लागते त्यालाच ऑफ पेज SEO असे म्हटले तरी चालेल.अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या साईट ची लिंक दुसऱ्या high अथॉरिटी साईट वर टाकून आपल्या ब्लॉग वर ट्रॅफिक मिळवणे म्हणजेच ऑफ पेज SEO असे म्हणतात.

लिंक बिल्डिंग - Link building

दुसऱ्या high अथॉरिटी साईट वर आपल्या ब्लॉगची लिंक देऊन आपल्या ब्लॉगची अथॉरिटी तसेच ट्रॅफिक वाढवणे म्हणजेच लिंक बिल्डिंग करणे होय.
लिंक बिल्डिंग
1.Guest post
2.Video marketing
3. Interview
4.Topic writting
5. Answer- Questions
6. Quora
 
या प्रकारे आपण वरील पर्याय वापरून आपल्या साईटची अथॉरिटी वाढवू शकतो,शिवाय आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक ही वाढू शकते.ब्लॉगची जाहिरात करण्याच्या या प्रकारे खूप प्रयत्न केला जातो.

Do follow Backlink

आपल्या ब्लॉग किंवा पोस्ट ची लिंक दुसऱ्या एखाद्या ब्लॉगवर देऊन ट्रॅफिक मिळवणे म्हणजेच do follow Backlink होय.या backlink ने ब्लॉगची रँक वाढण्यास खूप मदत होते म्हणून या backlink ला juicy असे संबोधले जाते.

No follow Backlink

या backlink ने आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक येते.पण ब्लॉग ची authority वाढत नाही,म्हणून तिला no follow Backlink असे म्हटले जाते.ट्रॅफिक वाढण्यासाठी ही backlink खूप मोठ्या प्रमाणावर महत्वाची असते.

सोशल मीडिया साईट - Social media sites

Social media


ब्लॉग पोस्ट ची फ्री आणि महत्वाची जाहिरात म्हणजे ती ब्लॉग पोस्ट सोशल मीडिया नेटवर्क वर जाहिरात करणे.ब्लॉग पोस्ट जेवढी लोक पाहतील तेवढे गूगल ती पोस्ट रँक करत असतो.म्हणून सोशल मीडिया नेटवर्क वर जाहिरात करणे फायदेशीर आहे.

सोशल मीडिया नेटवर्क - Social media sites

 • Facebook
 • Instagram
 • Quora
 • YouTube
 • Medium.com
 • Lined in
 • Shair chat
 • Koi
 • Twitter

निष्कर्ष

एकूणच काय तर,आपण आपल्या ब्लॉग वर कोणतीही पोस्ट लिहा.ती SEO अनुकूल असावी,तिचे प्रमोशन करावे, गूगल च्या नियमानुसार पोस्ट लिहावी. सर्च इंजिन optimaision करावे.म्हणजे तुमची पोस्ट नक्की रँक होईल.Computerguru वरील आजचा How to rank blog post on google, ब्लॉग पोस्ट रँक कशी करावी,ब्लॉग म्हणजे काय? हा लेख तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि follow करा.

1 Comments

Have any doubt please let me know.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post