शारदीय नवरात्रौत्सव


नवरात्री कलर्स 2021,नवरात्रीचे नऊ रंग 2021,नवरात्रीचे महत्व,नवरात्री देवीची आरती,नवरात्रीचे नऊ रंग दरवर्षी नवरात्रीत देवीची पूजा केली जाते,देवीचे पूजन करून देवीचे नऊ दिवस उपवास केले जातात.या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रंगांची महिमा सांगितली जाते,नऊ रंगांच्या साड्या सुवासिनी परिधान करतात.देवीच्या रोजच्या पूजेला पण नऊ रंगांच्या साड्या देवीला परिधान करून देवीची पूजा अर्चा केली जाते.

या वर्षीची नवरात्र हिंदू चंद्र महिन्याच्या आश्विन शुक्ल पक्षात साजरी केली जाणार आहे.या वर्षी नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान साजरा होत आहे.देवीचा हा नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव असतो.या नऊ दिवसांत नऊ रंगांना विशेष महत्व असते.हे नऊ रंग देवीला समर्पित असतात.तर या नऊ दिवसांत नऊ रंगांचे महत्व जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आपण व्रत पाळा.

ComputerGuru वरील लेखात आज आपण नवरात्रीचे नऊ रंग आणि नवरात्रीचे महत्व या विषयांवर माहिती जाणून घेऊयात.नवरात्री हा हिंदू धर्मात खूप महत्व असलेला उत्सव या उत्सवात देवीच्या पूजनाला खूप महत्व असते.शारदीय नवरात्रौत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.या दिवसांत देवीच्या पूजनाला खूप महत्व असते.शारदीय नवरात्रौत्सव हा स्री शक्तीचा महिमा मनाला जाणारा उत्सव आहे.

नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व

नवरात्री 2021 दिवस 1 : पिवळा

नवरात्र उत्सव पाहिला दिवस गुरुवारी येतो.या दिवसाचा रंग पिवळा आहे.नवरात्र उत्सव आनंद,उत्साहात साजरा करण्यासाठी या दिवशी पिवळा रंग परिधान करून नवरात्रीचा आनंद घ्यावा.

नवरात्री 2021 दिवस 2 : हिरवा

नवरात्रीचा दुसरा दिवस द्वितीया चा आहे.या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाची पूजा करतात.या दिवशी रंग हिरवा आहे.हा रंग निसर्गाचा रंग असून समृध्दी आणि हिरवळीचे हे प्रतीक आहे.या दिवशी हिरवा रंग परिधान करावा.

नवरात्री 2021 दिवस 3 : राखाडी

नवरात्रीचा तिसरा दिवस हा तृतीयेचा आहे.या दिवसाचा रंग राखाडी आहे.सूक्ष्म दृष्टीकोनातून या रंगाचे खूप महत्व आहे.या दिवशी राखाडी रंग परिधान करून नवरात्रीचा आनंद घ्यावा.

नवरात्री 2021 दिवस 4 : नारंगी

नवरात्रीचा चौथा दिवस नारंगी रंग आहे.हा रंग उन्हाळ्याच प्रतिनिधीत्व करतो.या दिवशी नारंगी रंग परिधान करून नवरात्रीचा उत्सव साजरा करावा.या रंगाचे खूप महत्व आहे.

नवरात्री 2021 दिवस 5 : पांढरा

नवरात्रीचा पाचवा दिवस पंचमी या दिवशी पंधरा रंग परिधान करून देवीची पूजा करावी. पांढरा रंग शुभ्रता आणि निरागसपणा याचे प्रतीक आहे.

नवरात्री 2021 दिवस 6 : लाल

नवरात्रीचा दिवस सहावा म्हणजे षस्टी या दिवशी लाल रंग परिधान करावा.या दिवशी लाल रंग आहे.लाल रंग हा आरोग्य,जीवन,अनंत धैर्य आणि तीव्र उत्कटतेचे प्रतीक आहे.

नवरात्री 2021 दिवस 7 : रॉयल ब्लू

नवरात्रीचा सातवा दिवस सप्तमी या दिवशीचा रंग रॉयल ब्लू आहे.या दिवशी निळा रंग परिधान करा.निळा रंग उत्तम आरोग्य आणि समृद्धी याचे प्रतीक आहे.

नवरात्री 2021 दिवस 8 : गुलाबी

नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी या दिवशी भक्तांनी गुलाबी रंग परिधान करावा.गुलाबी रंग हे सार्वत्रिक प्रेम,आपुलकी आणि स्री आकर्षणाचे प्रतीक आहे.सुसंवाद आणि दयाळूपणाचा हा रंग आहे.

नवरात्री 2021 दिवस 9 : जांभळा

नवरात्रीचा नववा दिवस नवमीचा आणि शेवटचा दिवस आहे.या दिवशी जांभळा रंग परिधान करावा.हा रंग लाल रंगाची ऊर्जा देतो आणि निळ्या रंगाची स्थिरता आणतो.या दिवशी जांभळा रंग परिधान करून नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाचा आनंद घ्यावा.

या प्रकारे या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रंगाचे खूप महत्व आहे.हे सर्व रंग देवीला समर्पित असतात.त्या रंगांचे विशेष महत्व असते.केवळ या नऊ दिवसांत नऊ रंग परिधान करून चालत नाही तर त्या रंग त्यांचे महत्व त्या प्रमाणे वागावे.ComputerGuru वरील आजचा नवरात्री कलर्स 2021,नवरात्रीचे नऊ रंग 2021 हा लेख तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि ब्लॉगला अवश्य फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने