जागतिक पर्यटन दिन,World tourism day,जागतिक पर्यटन दिन...


हिरवा निसर्ग,हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, खोल वाहणाऱ्या दऱ्या, खळ खळत वाहणारी नदी,निळाशार समुद्र,गजबजणारे सागर किनारे आणि अशा ठिकाणी भटकंती साठी मिळणारी संधी कोण सोडेल? एक पर्यटन प्रेमी अशा मिळणाऱ्या सुवर्ण संधीचा नक्कीच सदुपयोग करून घेतो.आज 27 सप्टेंबर World tourism day, जागतिक पर्यटन दिन या निमित्ताने आपण पर्यटन या विषयावर माहिती बघणार आहोत.

Tourism place


का साजरा केला जातो जागतिक पर्यटन दिन

(Why celebrate world tourism day)


संपूर्ण जगात आजच्या दिवशी World tourism day, जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.पर्यटन विषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.मानवी जीवनात पर्यटनास किती महत्व आहे हे सर्वांना पटवून दिले पाहिजे.मानवाचा थकवा,दुःख,आजार घालवण्याचे सर्वात स्वस्त आणि सुलभ माध्यम म्हणजे पर्यटन होय.मग तुम्ही कोठेही फिरायला जा अगदी स्वतःच्या घराशेजारी असणारे डोंगर,दऱ्या या ठिकाणीं निसर्गरम्य परिसरात गेले तरी अगदी मन ताजे तावाने होऊन सर्व दुःख माणूस विसरून जातो.

संयुक्त राष्ट्राची जागतिक पर्यटन संस्था UNWTO याच दिवशी १९७० रोजी स्थापना झाली होती.म्हणून याच दिवशी सन १९८० पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.१९८० रोजी पाहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले जातात.पर्यटनविषयक संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्न केले जातात.


कसा साजरा केला जातो जागतिक पर्यटन दिन

(How celebrate is world tourism day)


 • जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी पर्यटन हौशी लोक विविध नैसर्गिक ठिकाणी भेटी देतात,तेथील सर्व गोष्टी जाणून घेतात.काही मदत करता येत असल्यास ती करण्याचा प्रयत्न करतात.
 • शासन स्थरावर सरकार विविध पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर केला जातो.पर्यटन स्थळांना विकास करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाते.
 • शासन पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर करते.पर्यटन स्थळांचा जागतिक वारसा स्थळांत समावेश व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करत असते.
 • पर्यटनविषयक लोकांमध्ये जागृती निर्माण करणे,पर्यटनास प्रोत्साहन देणे.
 • पर्यटनातून आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न करणे.स्थानिक जनतेला रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
 • पर्यटनातून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.
 • नवनवीन पर्यटन स्थळांना भेटी,त्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जातात.

का करावे पर्यटन?
(Why tourism)

 • मन शांतीसाठी पर्यटन केले पाहिजे 
 • दुःख,आळस,थकवा घालवण्यासाठी पर्यटन केले पाहिजे.
 • मनाला विरंगुळा म्हणून फिरले पाहिजे.
 • देशाची,जगाची नैसर्गिक साधन संपत्ती पाहण्यासाठी पर्यटन केले पाहिजे.
 • देशाचा भौगोलिक वारसा जाणून घेण्यासाठी फिरले पाहिजे.
 • प्रत्येक कोसावर भाषा,पाणी,माणसे बदलतात या सर्वांचा अनुभव जीवनात फिरून एकदा घेतलाच पाहिजे.
 • आपले देश बांधव,जगातील बांधव त्यांचे जीवनमान जाणून घेण्यासाठी पर्यटन स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत.
 • नैसर्गिक अधिवास,परिसंस्था यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन करावेच लागते.

पर्यटन विकासासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?
(What should be done from tourism development)

 • पर्यटन स्थळांना त्यांच्या दर्जानुसार दरवर्षी मदत मिळाली पाहिजे.
 • पर्यटन स्थळांवर स्वच्छ्ता असावी.पर्यटकांना स्वच्छ्ता ठेवण्यासाठी प्रवृत्त करावे.
 • रस्ते,पाणी, वीज या मूलभूत गरजा पूर्ण असाव्यात.
 • पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या योजना सुरू कराव्यात.उदा. पासमध्ये सूट ई.
 • पर्यटन स्थळांची सर्वत्र जाहिरात केली पाहिजे कारण आजचा काळ जाहिरातीचा काळ आहे.
 • भोजन,राहणे,पाणी,इतर सुखसुविधा परिपूर्ण असाव्यात.
 • जागतिक स्थरावर अत्यावश्यक असणारे निकष पूर्ण करावेत.
 • पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुख सुविधा उपलब्ध करव्यात.
 • पर्यटन विकासासाठी अधून मधून पर्यटन मेळावे आयोजित करण्यात यावेत.
 • पर्यटन विकासासाठी हुशार,कार्यतत्पर अधिकारी असावेत.


पर्यटन एक सेवा...

आजच्या काळात पर्यटनास खूप महत्व आहे,पर्यटन व्यवसायात लाखो,करोडो लोक काम करतात,पर्यटन व्यवसायाची उलाढाल पण अब्जावधी रुपयांत गेली आहे.प्रत्येक देशाला परकी गंगाजळी उपलब्ध करून देणारा व्यवसाय म्हणून पर्यटन व्यवसायाकडे आजच्या काळात पाहिले जाते.पर्यटन व्यवसायात लाखो लोक काम करतात,स्थानिक पातळीवर जनतेला रोजगार संधी पर्यटनामुळे उपलब्ध होत आहे.पर्यटन व्यवसाय आजच्या काळात सोन्याचा भाव मिळवून देणारा व्यवसाय झाला आहे.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जो देश स्वतःच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करील,लोकांना आकर्षित करील त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनामुळे खूप मदत होणार आहे.


World tourism day, जागतिक पर्यटन दिन,या निमित्ताने सर्व देशांना स्वतःच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्याची संधी मिळते.पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या नवीन कल्पना,संधी तसेच पर्यटन विकासासाठी येणाऱ्या अडचणी,समस्या यावर विचार,इतर देशांची मदत घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. ईतर सर्व देशांना एकत्र घेऊन पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आजच्या काळात आहे.

आमच्या याही पोस्ट नक्की वाचा.ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे काय...

Computerguru वरील आजचा World tourism day, जागतिक पर्यटन दिन हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने