व्हॉट्सअँप वर आले नवीन फीचर, WhatsApp new feature...

 व्हॉट्सॲप या लोकप्रिय सोशल मीडिया साईट वर या 2021 वर्षात नवीन फीचर येणार आहेत.कंपनीकडून ग्राहकांना वापरण्यास सोपे,आनंददायी,मनोरंजक अशी वेगवेगळी फीचर वेळोवेळी येत आसतात.या वर्षी पण व्हॉट्सॲप तुमच्यासाठी अशीच काहीशी आश्चर्यकारक फीचर घेऊन आली आहे.कोणती आहेत ती फीचर आपण आमच्या ComputerGuru या ब्लॉगवर पाहुयात.


व्हॉट्सॲप फीचर्स1. व्हॉईस मेसेज पाहता येणार

Click here....

व्हॉट्सॲप कंपनी या फीचर वर काम करत असून लवकरच तुम्हाला व्हॉट्सॲप वर कुणाचाही व्हॉईस मेसेज आला तर तो डाउनलोड करून ऐकण्यापेक्षा तुम्ही तो टेक्स्ट स्वरूपात वाचू शकता.हो हे खर आहे व्हॉट्सॲप कंपनीचे म्हणणे आहे की आम्ही या वर काम करत असून लवकरच तुम्हाला हे फीचर तुमच्या व्हॉट्सॲप वर पाहायला मिळेल.व्हॉट्सॲप तुमच्या व्हॉईस मेसेज वर प्रक्रिया करून तो मेसेज तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे वाचायला मिळेल.तसेच ग्राहकाचा पर्सनल डाटा कोठेही शेअर करणार नाही,अस म्हटल आहे.

2. लास्ट सीन मध्ये बदल होणार

व्हॉट्सॲप लास्ट सीन मध्ये आत्तापर्यंत तीन पर्याय होते.

Click here...

1. कॉन्टॅक्ट/my contact

2.सर्वजण/everyone

3.कुणीही नाही /nobody

म्हणजे आपण व्हॉट्सॲप वर कधी उपलब्ध होतो हे कुणाकुणाला दाखवायचे यासाठी हे पर्याय देण्यात आले होते.यामध्ये आपले कॉन्टॅक्ट,सर्वजण,कुणीही नाही अशा पद्धतीने सेटिंग करता येत होती.कंपनीने आत्ता त्याच्यात सुधारणा करून त्यामध्ये my contact expert हा नवीन पर्याय देण्यात येईल.म्हणजे तुम्हाला तुमच्या संपर्कातील कोणत्या व्यक्तीला आपण व्हॉट्सॲप वर केंव्हा ॲक्टिव होतो हे दिसेल,म्हणजेच तुम्ही तुमच्या जवळील व्यक्तीला सोडून कुणालाही तुमच्या लास्ट सीन बद्दल माहिती मिळणार नाही.

      तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हॉट्सॲप कंपनीचे हे येणारे फीचर्स, कंपनीने या लोकप्रिय फिचरसाठी खूप वेगाने काम सुरू केले आहे.लवकरात लवकर ही फीचर आपल्या व्हॉट्सॲप वर पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूयात.

याही पोस्ट नक्की बघा तुम्हाला आवडतील


Click here...


Click here...


तुम्हाला आमचा आजचा लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या Computerguru या ब्लॉगला अवश्य फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने