ऑनलाईन शिक्षण फायदे - तोटे,ऑनलाईन शिक्षण पद्धती,ऑनलाईन शिक्षण ,what is online education.. .


ऑनलाईन शिक्षण ,ऑनलाईन शिक्षण फायदे - तोटे,ऑनलाईन शिक्षण पद्धती,what is online education, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दुरीमध्ये त्यांना एकत्रित आणणारा दुवा म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन होय. कोरोना महामारीनंतर शिक्षणाची दिशाच एकदम बदलून गेली.प्रथम रोज भरणारे वर्ग,शाळा,कॉलेज,विद्यालये , महाविद्यालये बंद झाली आणि मग शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधील अंतर वाढले,शिक्षण बंद झाले,परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ लागली,कोरोनाच्या तर लाटा चालूच होत्या मग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय असेल?एक प्रकारची भीती निर्माण होऊ लागली,विद्यार्थ्यांचे काय करायचे? त्यांचे शिक्षण बंद होता कामा नये.या सर्वावर एक एक ,ज्ञानाचा प्रकाश दिसू लागला तो म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन होय. ऑनलाईन एज्युकेशन हे कधी काळी माहित नसलेल्या खेड्या पाड्यातील लोकांना पण ऑनलाईन एज्युकेशन हा शब्द माहीत झाला.


Educationऑनलाईन एज्युकेशन म्हणजे काय?...
(What is online education?)

कोरोना महामारीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन क्लास, ऑनलाईन परीक्षा हे शब्द माहीत झाले.पण ऑनलाईन एज्युकेशन या शब्दाचा अर्थ कुणाला कळला का? तर नाही.अशिक्षित, मुले, विदयार्थी यांना अजूनही या शब्दाचा अर्थ माहित नाही. ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे दूरवर असलेल्या दोन माध्यमात परस्पर संवाद घडवून आणणे होय.जगातील कानाकोपऱ्यातील जनतेला एकमेकांशी संवाद घडवून आणणारी यंत्रणा म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन होय.


ऑनलाईन एज्युकेशन ची माध्यमे
(Online education model)

ऑनलाईन एज्युकेशन याचा अर्थ तर माहित झाला,मग ऑनलाईन एज्युकेशन कोणकोणत्या साधनांद्वारे घेता येते ते पाहू.

1. मोबाईल 

संपूर्ण जगात ऑनलाईन एज्युकेशन घेण्याचा सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे स्मार्टफोन होय.पूर्वी शाळा, कॉलेज , विद्यालये, महाविद्यालये या सर्वांमध्ये मोबाईल आणण्यास परवानगी नव्हती.पण तोच मोबाईल आज सर्व प्रकारचे एज्युकेशन देत आहे.
व्हॉट्सॲप  - स्मार्टफोन मध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप या एप्लिकेशन्स द्वारे शिक्षक मुलांना अभ्यास देतात.अभ्यासाचे फोटो,व्हिडिओ,ऑडियो देण्याचे सर्वात स्वस्त मध्यम म्हणजे व्हॉट्सॲप होय.

झूम ॲप - झूम नावाचे असणारे हे ॲप आहे.या ॲप वर आपण एकत्रित व्हिडिओ कॉलिंग द्वारा क्लास घेऊ शकतो.एक प्रकारे या ॲप वरून शिक्षक व विद्यार्थी घरच्याघरी बसून शिक्षण घेत असतात.

झूम ॲप कसे वापरावे?...
 • प्रथम गूगल प्ले स्टोअरवर जाऊन झूम ॲप डाऊनलोड करा.
 • त्यानंतर झूम ॲप ओपन करा ते मागेल त्या सर्व परमिशन त्याला द्या.
 • त्यानंतर गूगल मेल आयडी वापरून झूम ॲप वर रजिस्टर करा.
 • त्यानंतर मीटिंग सेडुल वर क्लिक करा.आपली मीटिंग निश्चित करा,मग तो लिंक बटणावर जाऊन लिंक तयार करा.
 • व्हॉट्सॲप वर सर्व विद्यार्थ्यांना लिंक पाठवा.
 • वेळेवर मीटिंग सुरू करा.
 • विद्यार्थी व्हॉट्सअँप वरील लिंक वर क्लिक करून आपोआप मीटिंग साठी जॉईन होतील.
गूगल मीट - झूम ॲप प्रमाणेच असणारे गूगल मीट ॲप आहे.झूम ॲप प्रमाणेच या ॲप वर वरील कृती करून या ॲप द्वारे ऑनलाईन क्लास घेता येतात.झूम ॲप पेक्षा वापरण्यास सोपे आणि सहज असणारे हे ॲप आहे.

2.लॅपटॉप

मोबाईल प्रमाणेच विद्यार्थी ऑनलाईन एज्युकेशन साठी लॅपटॉप चा वापर करतात.शिक्षक जास्त प्रमाणात लॅपटॉप चा वापर करत असतात.लॅपटॉप वर पण मोबाईल प्रमाणेच ॲप असतात.फक्त वापरण्यास, गुणवत्तेस,सुलभता या साठी लॅपटॉपचा वापर केला जातो.लॅपटॉप मध्ये मोबाईल प्रमाणे ॲप वापरण्यावर मर्यादा येत नाही.

3. टॅब

स्मार्टफोन प्रमाणेच असतो.फक्त आकार मोठा आणि वापरण्यास सुलभ, वरिष्ठ गटातील विद्यार्थी याचा वापर करतात.

4. रेडिओ

ऑनलाईन एज्युकेशनचे फक्त श्राव्य असणारे हे माध्यम आहे. या माध्यमाद्वारे आपण फक्त ऐकू शकतो.सरकार विविध वर्गांसाठी रेडिओ वर अभ्यासक्रम प्रसारित करत असते.गरीब,होतकरू विद्यार्थ्यांना सर्वात स्वस्त असणारे हे माध्यम आहे. रेडिओद्वारे शिक्षण घेता येते.सरकार रेडिओ वर विविध शैक्षणिक वाहिन्या सुरू करत आहे.

5. टेलिव्हिजन

कोरोना आधी फक्त मनोरंजन हाच उद्देश असणाऱ्या टेलिव्हिजन ने कोविड नंतर शाळा बंद पडल्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी टेलिव्हिजन वर खूप प्रकारच्या शैक्षणिक वाहिन्या सुरू केल्या.सरकारने टेलिव्हिजन चा या कामात खूप मोलाचा सहभाग करून घेतला.टेलिव्हिजन वर सर्व वर्गांचे दररोज क्लास होतात.

ऑनलाईन शिक्षणा चे फायदे...
(Online education benifits/advantages)

 • कोविडच्या काळात शिक्षक व विद्यार्थी यांना जोडून ठेवण्याचे महत्वाचे कार्य केले.
 • शैक्षणिक दरी कमी झाली.भारतातील तज्ञ अमेरिकेतील तज्ज्ञांशी संपर्क साधून चर्चा करू लागले.
 • ऑनलाईन एज्युकेशन मुले वेळेची बचत होते.उदा. ऑनलाईन कॉल करून आपण एक मिनिटात तज्ज्ञांशी चर्चा करू शकतो.
 • ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या,जगातील सर्व तज्ञ ऑनलाईन एज्युकेशन मुळे एकमेकांच्या संपर्कात असतात.
 • वेळ,पैसा बचत झाली,ऑनलाईन एज्युकेशन मुळे वेळ आणि पैसे,श्रम यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते.
 • ऑनलाईन एज्युकेशन सहज,सोपे,कोठेही घेता येते.
 • 24*7 तास ऑनलाईन एज्युकेशन उपलब्ध असते.
 • ऑनलाईन एज्युकेशन मुळे जगाची वाटचाल आधुनिकीकरणाकडे सुरू झाली.
 • एज्युकेशन मध्ये स्मार्टनेस आला.
 • ऑनलाईन एज्युकेशन मुळे विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्स उपलब्ध झाले,त्यामुळे पैसे,वेळ,श्रम यामध्ये बचत झाली.
ऑनलाईन शिक्षणा चे तोटे...
(Online education disadvantages)

 • ग्रामीण भागात नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ऑनलाईन एज्युकेशन अडचणीचे ठरते.
 • गरीब विद्यार्थी स्मार्टफोन विकत घेऊ शकत नाहीत.
 • ऑनाईन एज्युकेशन साधनांबाबत अजुन विद्यार्थ्यांना एवढी माहिती नाही.
 • ऑनलाईन एज्युकेशन मूर्त स्वरूपात अनुभव देऊ शकत नाही.
 •  विद्यार्थी शिस्त पाळत नाही,क्लास मिस करतात.शिक्षकांना ताबा मिळवता येत नाही.
 • ऑनलाईन एज्युकेशन ही एक तडजोड केली आहे.
 • ऑनलाईन एज्युकेशन देणारे सर्व तज्ञ असतील असे नाही.
 • ऑनलाईन एज्युकेशन चा आजच्या काळात बाजार भरला आहे.
 • मनोरंजन,खेळ,सहली यांचा आनंद मिळत नाही.
 • शिक्षणातील एकाग्रता कमी होत जाते.
 • शिक्षणातील दरी या शिक्षणामुळे अजुन वाढू शकते.
 • शिक्षक व विद्यार्थी असे पवित्र नाते नष्ट होऊ लागले आहे.
ऑनलाईन शिक्षण चे महत्व...
(Online education importance)

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन एज्युकेशन हे खूप महत्त्वाचे आहे,कारण तंत्रज्ञान वापरकरण्याचे कौशल्य सर्वांना अवगत झाले पाहिजे,हा मोठा हेतू या शिक्षणातून साध्य होत असतो.आजच्या धावपळीच्या युगात माणसाकडे वेळ खूप कमी असल्याकारणाने या शिक्षणामुळे मानवाच्या ज्ञानाची भूक लगेच भागवता येऊ शकते.माणूस कमी वेळात इंटरनेट वर एखादी माहिती पाहू शकतो.आजच्या आधुनिक काळात व्यावहारिक दृष्ट्या जर विचार करायचा झाल्यास ऑनलाईन एज्युकेशन शिवाय मानवास पर्याय नाही.जगामध्ये शिक्षण क्षेत्रात महासत्ता व्हायचे असेल तर ऑनलाईन एज्युकेशन वर कोणत्याही देशाची पकड किती आहे हे पहिले जाते.शिक्षण क्षेत्रात महासत्ता होण्याचा मार्ग ऑनलाईन एज्युकेशन मधून जातो.

आमच्या याही पोस्ट नक्की वाचा.Computerguu वरील आजचा ऑनलाईन शिक्षण फायदे - तोटे,ऑनलाईन शिक्षण पद्धती,ऑनलाईन शिक्षण ,what is online education हा लेख आवडल्यास शेअर करा, लाईक करा...

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने