Lic,lic pension plan...

 

Lic,lic pension plan मनुष्याच्या जीवनात पैसा असणे खूप महत्वाचे आहे.आणि आपल्या जवळ आलेला पैसा जपून ठेवणे हे त्याहूनही खूप महत्वाचे आहे.या सर्व गोष्टींचा विचार केल्यास पैसा माणसाकडे येतो जातोच पण तो जपून ठेऊन त्याचे दुप्पट करून देण्यास LIC india तुमची खूप मदत करते.आपला पैसा सुरक्षित राहण्या सोबतच तुम्हाला त्याचा मोबदला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मिळत असतो...

LIC
सरल पेन्शन योजना

आज आम्ही तुम्हाला अशाच एका छानशा प्लॅन बद्दल माहिती देणार आहोत.तो म्हणजे LIC चा पेन्शन प्लॅन आहे.या प्लॅन मध्ये एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि तुम्हाला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळेल.या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना आहे.आणि हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे.1 जुलै पासून हा प्लॅन सुरू करण्यात आला आहे.


कशी आहे सरल पेन्शन योजना...

ही पेन्शन योजना दोन प्रकारचे प्लॅन मध्ये उपलब्ध आहे.

1. Life annuity with 100% return of purchase price 

2. संयुक्त जीवन 

पहिल्या योजनेत एकाच व्यक्तीच्या नावावर पॉलिसी राहील आणि ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याला पेन्शन चा लाभ घेता येईल.

दुसऱ्या योजनेत पतिपत्नी दोघांच्या नावावर पॉलिसी राहील.दोघांपैकी जो शेवटपर्यंत जिवंत असेपर्यंत त्याला पेन्शन मिळेल.नंतर वारसदाराला बेस प्राइस ची रक्कम मिळेल.


सरल पेन्शन योजना वैशिष्ट्ये...

  • पॉलिसी घेतल्या घेतल्या पेन्शन सुरू होईल.
  • दरमहा,तीन महा,सहा महिने किंवा वर्ष अशा हप्त्यात पेन्शन मिळेल हप्ता आपण निवडायचा आहे.
  • सरल पेन्शन योजना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे.
  • किमान 12000 रुपये तर कमाल रकमेची मर्यादा नाही.अशा पद्धतीने गुंतवणूक करावी लागेल.
  • ही पॉलिसी 40 ते 80 वयाच्या लोकांसाठी उपलब्ध आहे.

आमच्या याही पोस्ट नक्की बघा.Computerguru वरील आजचा Lic,lic pension plan हा लेख तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉग फॉलो करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने