online paise kase kamvayche,How to make money online....

 Online paise kase kamvayche याकडे सर्वांचा कल दिसून येत आहे. online paise kase kamvaych याचा सर्वजण विचार करत असतात.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणसाकडे मोबाईल,संगणक,लॅपटॉप, टॅब आले आणि त्यातूनच ऑनलाईन पैसे कमावण्याच्या कामाला सुरुवात झाली.प्रत्यक्ष कष्टाची कामे न करता डिजिटल माध्यमात काम करून पैसे मिळवणे म्हणजेच ऑनलाईन पैसे कमावणे होय.


Online money earningऑनलाईन पैसे कमावणे का महत्वाचे आहे

आजच्या आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली,जुन्या पद्धतीचे कामे कमी होऊन नवीन कामे,यांत्रिक कामे सुरू झाली,अगदी पैसे कमावण्याच्या पद्धती सुद्धा बदलत गेल्या,पूर्वी कष्टाची कामे करून लोक पैसे कमावत असतं,पण आजच्या काळात माणूस ऑनलाईन पद्धतीने कमी श्रमात जास्त पैसा कमावत आहे,या सर्व कारणांमुळे आज ऑनलाईन पैसे कमावण्याच्या पद्धतीला खूप मोठ्या प्रमाणात महत्व आले आहे.

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

1. यूट्यूब (yooutube)

पैसे कमावण्याचे यूट्यूब हे सर्वात मोठे साधन बनत चालले आहे.यूट्यूब वर आपण आपले खाते उघडून आपण आपल्या आवडतीचे व्हिडिओ बनवून अपलोड करून ते व्हिडिओ आपण जगातील इतर लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देतो आणि त्याबदल्यात आपल्याला पैसे मिळतात,ज्या लोकांना अभिनय क्षेत्रातच ज्ञान आहे ते त्यांचे छान व्हिडिओ बनवून अपलोड करून खूप मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतात.तंत्रज्ञान, महिती,बातम्या,मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवून त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर पैसे कमावू शकतो.

2. ब्लॉग (blog)

 पैसे कमावण्याचे दुसरे महत्वाचे साधन म्हणजे ब्लॉग होय.आपल्याला ज्या क्षेत्राची आवड असेल त्या विषयीचे लिखाण करून ते लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे पैसे कमावण्याच्या पद्धतीला ब्लॉगिंग असे म्हटले जातात. ब्लॉग मधून महिन्याला लाखो रुपये कमावणारे ब्लॉगर आपल्याकडे आहेत.आपल्याला हवा त्या विषयावर लेख लिहून तो ब्लॉगवर आपडेट करून लोकांनी तो लेक वाचला की आपल्याला पैसे मिळतात.लोकांना ज्या विषयात रस आहे त्या विषयावर लेख लिहून आपल्याला त्यातून भरपूर पैसे कमावता येतात.....

3. फ्रीलान्सर ( freelancer)

पैसे कमावण्याचा तिसरा पर्याय आहे तो freelancer ही एक वेबसाईट आहे त्यावर रजिस्ट्रेशन करून आपल्याला ज्या क्षेत्राची आवड असेल त्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करणे.यामध्ये आपण आपल्या क्लास ची फी किती घ्यायची ती ठरवू शकतो,आपल्याला असणाऱ्या ज्ञानाप्रमाने freelancer मध्ये आपल्याला पैसे मिळतात.

4. शेअर मार्केट (shair market)

आपल्या जवळील पैशाची चांगल्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे हे प्रत्येकाचे ध्येय असते आणि या साठी सर्वात चांगली,सुरक्षित गुंतवणूक म्हणून शेअर बाजारकडे पाहिले जाते.यामध्ये आपण आपल्या आवडतीचे शेअर विकत घेऊन त्यांचे बाजार मूल्य वाढल्यानंतर ते विकून त्यातून भरपूर पैसे कमावू शकतो.शेअर बाजारातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते फक्त शेअर बाजारातील चढ उताराचा चांगला अभ्यास हवा. पैसे कमावण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.....


5. मॅच्युअल फंड (matual fund)

मॅच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून त्यामधून हवे ते प्लॅन निवडून त्यामधून आपण आपली गुंतवणूक वाढवू शकतो.मॅच्युअल फंड मध्ये विविध प्लॅन असतात त्यामधून आपण आपल्याला हवा असलेला प्लॅन निवडून त्याचे हप्ते भरल्यास आपल्याला त्यातून भरपूर पैसे मिळतात. पैसे कमावण्याचा हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

6. एफीलिएट मार्केटिंग (affilate marketing)

 पैसे कमावण्याचे अजुन एक साधन म्हणजे एफीलिएट मार्केटिंग होय.यामध्ये आपण आपल्या ब्लॉग,यूट्यूब,फेसबुक,ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर चांगल्या नावाजलेल्या कंपन्यांच्या उदा. अमेझॉन,फ्लिपकार्ट,myantra, मेशो ई. उत्पादनांची जाहिरात करून त्यातून 10 ते 15 टक्के कमिशन मिळवू शकतो.हा ऑनलाईन पैसे कमावण्याचा सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणता येईल.यासाठी फक्त आपण त्या कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन त्यांच्या विभागाशी संपर्क साधून त्यांच्या उत्पादनाची लिंक घेऊन ती आपल्या सोशल मीडिया साईट वर टाकून द्यायची.तुमच्या सोशल मीडिया साईट वरून विक्री झालेल्या वस्तूचे तुम्हाला कमिशन मिळते.फक्त यासाठी आपला संपर्क जास्त हवा.

7. ऑनलाईन क्लास (online class)

 पैसे कमावण्याचा अजुन एक चांगला पर्याय म्हणजे ऑनलाईन क्लास घेणे व त्यामधून आपण पैसे कमावणे होय.आजकाल ऑनलाईन शिक्षण पद्धतीला खूप मोठ्या प्रमाणावर महत्व आले आहे,याचा आपण फायदा घेऊन गूगल मीट,झूम कॉलिंग ॲप्लिकेशन वापरून आपण ऑनलाईन क्लास घेऊन पैसे कमावू शकतो....

8. पीडीएफ बुक (pdf book dawnload)

 पैसे कमावण्याचा अजुन एक चांगला पर्याय म्हणजे पीडीएफ बुक लिहणे व त्यातून भरपूर पैसे कमावणे.पीडीएफ बुक म्हणजे ऑनलाईन पुस्तक होय.मोबाईल मध्ये आपण लिखाण केले की ते पीडीएफ बुक मध्ये रुपांतर करण्याची सोय असते.त्या पद्धतीने आपण लोकांच्या आवडीच्या विषयावर लिखाण करून पीडीएफ बुक तयार करून त्यातून पैसे कमावू शकतो.

9. फेसबुक (facebook)

पैसे कमावण्याचा अजुन एक सोपा पर्याय म्हणजे फेसबुक होय.फेसबुक वर आपण आपले आवडीचे पेज बनवून त्यातून लोकांच्या जाहिराती,कंपनीची उत्पादने यांची विक्री करून आपण पैसे कमावू शकतो.

10. इंस्टाग्राम (instagram) 
 पैसे कमावण्याचा अजुन एक चांगला पर्याय म्हणजे इंस्टाग्राम होय.यामधून आपण व्हिडिओ,जाहिराती,विक्री करून पैसे कमावू शकतो.फक्त यासाठी फॉलोवर जास्त हवे असतात.म्हणजे तुमची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन तुम्हाला जास्तीत जास्त पैसा मिळेल.

पैसे कमावण्याचे विविध मार्ग आपण पाहिले.पण यातील कोणताही मार्ग निवडा तुम्हाला त्यात मेहनत करावीच लागेल, ऑनलाईन, झटपट पैसा कमवा अशा आपण खूप जाहिराती पाहतो पण तो जाहिरातदारांचा फंडा असतो,म्हणून सांगतो ऑनलाईन पैसे कमावण्याचे हे वरील मार्ग खूप चांगले,सोपे आहे पण मेहनतीला पर्याय नाही.तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग मोकळे होतील.ऑनलाईन पैसे कमावण्याचा आजच्या काळात एक महत्वाचा स्रोत बनला आहे.....
        प्रत्येक व्यक्तीला online paise kase kamvayche आकर्षण असते आणि त्या विषयावर लोकांना सखोल माहिती मिळावी त्यासाठी हा लेख लिहला आहे.online paise kase kamvayche विषयी माहिती हवी असल्यास नक्की सांगा.

हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.आमची माहित आवडल्यास ती लाईक करा, शेअर करा,फॉलो करा, आणि आमचा Computerguru हा ब्लॉग अवश्य बघा.....


Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने