गांधी जयंती,gandhi jayanti


 गांधी जयंती,gandhi jayanti संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती याच दिवशी या महात्म्याचा जन्म झाला.महात्मा म्हणजे काय? महात्मा म्हणज महान असा आत्मा होय.या महात्म्याने त्याचे संपूर्ण आयुष्य हे जगातील,भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घालवले अशा या थोर पुरुषाचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.त्यांच्या सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांचा प्रभाव भारतीयांवर पडतो.भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.त्यांची जयंती भारत राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो.त्यांच्या जयंतीला भारतामध्ये सर्वत्र सार्वजनिक सुट्टी असते.


महात्मा गांधी


सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांवर चालणारे महात्मा गांधी अल्पावधीतच भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनले.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसक मार्गाने आंदोलन केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.ब्रिटिशांना वठणीवर आणण्यासाठी अहिंसक मार्गाने आंदोलन करून त्यांना भारतातून हाकलून लावता येईल यावर त्यांचा विश्वास होता.म्हणूनच सत्य,अहिंसा या दोन काटेरी मार्गाने चालून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोलाचे प्रयत्न केले.भारत देश त्यांचे हे बलिदान कधीही विसरणार नाही.भारतीय नागरिकांना ब्रिटिशांनी केलेल्या लुटीमुळे अंगावर पुरेसे कपडे परिधान करता येत नाही म्हणून त्यांनीही फक्त धोतर आणि पंचा घालण्यास सुरुवात केली.असे हे भारतीयांचे आवडते महात्मा गांधी होय.


महात्मा का?

सत्य आणि अहिंसा या दोन काटेरी मार्गाने चालणारे एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी होय.त्यांची प्रत्येक कृती ही अहिंसक मार्गाने असतं.त्यांचे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे.त्यांनी अहिंसात्मक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले,म्हणून लोक प्रेमाने त्यांना बापू असे म्हणत.रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना सर्वप्रथम महात्मा अशी उपाधी दिली.तर सुभाष चंद्र बोस यांनी त्याचा राष्ट्रपिता म्हणून गौरव केला.महात्मा म्हणजे महान आत्मा असा अर्थ होतो.या महात्म्याने त्याचे संपूर्ण आयुष्य भारतीय जनतेसाठी खर्च केले म्हणूनच ते महात्मा झाले.


सत्याग्रह आणि अहिंसा


असहकार आणि अहिंसेच्या तत्वाचा गांधीजींनी प्रथम वापर दक्षिण आफ्रिका येथील भारतीयांना त्यांचे अधिकार मिळावा म्हणून केला.त्यांचा हा लढा यशस्वी झाला. ई. स.१९५० मध्ये भारतात आल्यावर त्यांनी चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. ई. स.१९३० मध्ये इंग्रजांनी लाधलेल्या अन्यायकारक कराविरुद्ध त्यांनी ४०० किमी दूरवर दांडी येथे जाऊन मिठाची मूठ उचलून मिठावरील कर मिळणार नाही असे इंग्रज सरकारला निक्षून सांगितले.आणि दांडी येथील मिठाचा सत्याग्रह यशस्वी केला.या प्रकारे सत्याग्रह करून केवळ हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने आपल्या सर्व मागण्या पूर्ण करता येतात हे भारतीयांना त्यांनी दाखवून दिले.भारताला त्यांनी सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांची देणगी भारतास दिली.

जेंव्हा जेंव्हा अहिंसा हे नाव आपण एकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर बापू हे नाव येते,तेव्हा आपल्याला गांधी हे नाव तोंडासमोर येते.केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधी म्हणजे बापू यांनी अहिंसा म्हणजे ही व्यक्तिगत सवय असून अहिंसा ही संपूर्ण जगाच्या भल्यासाठी आहे.अहिंसा म्हणजे हिंसा न करता शांततेने आपल्या सर्व मागण्या पूर्ण करता येतात.


आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन


2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.गांधी जयंतीच्या दिवशी त्यांच्या तत्त्वांचा पुरस्कार करणे हे त्यांच्यातील महात्म्याचे दर्शन घडवते.१५ जून २००७ ला संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीने २ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिना च्या रुपात साजरा व्हावा म्हणून ठराव केला होता.जगातील कोणतीही गोष्ट हिंसा करून मिळवता येत नाही त्याउलट अहिंसेच्या मार्गाने चालल्यास जगातील कोणतीही गोष्ट मिळवता येते.शिवाय अहिंसेच्या मार्गाने चालल्यास जागतिक शांतता,सहकार्य या भावना नागरिकांमध्ये वाढीस लागतात.

अशा या महात्म्याने त्याचे संपूर्ण आयुष्य भारत आणि जगाच्या शांततेसाठी वाहिले.जगाला सत्य आणि अहिंसा या दोन मोलाच्या तत्वांची देणगी त्यांनी संपूर्ण जगाला दिली.या दोन मार्गाने चालल्यास जगात शांतता, आनंद,सहकार्य या भावना वाढीस लागून जगाला उच्च विचासरणी प्राप्त करून देता येईल.या सर्व कारणांमुळे आज संपूर्ण जगात गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.


आमच्या याही पोस्ट नक्की बघा.


LIC चा स्वस्त आणि मस्त पेन्शन प्लॅन नक्की बघा.

क्रेडिट रिपोर्ट विषयी माहिती नक्की बघा.


Computerguru वरील आजचा लेख गांधी जयंती,gandhi jayanti कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.लेख आवडल्यास शेअर करा, लाईक करा,फॉलो करा.
Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने