बारा रुपयात मिळावा दोन लाखाचा विमा,जाणून घ्या योजना,प्रधानमंत्री विमा योजना

बारा रुपयात मिळावा दोन लाखाचा विमा,जाणून घ्या योजना...आजच्या धावपळीच्या युगात बरा रुपयात काय मिळते? एक चहा सुद्धा मिळत नाही,चहाला पण पंधरा रुपये लागतात.आणि केंद्र सरकारच्या वतीने बरा रुपयात तुम्हाला दोन लाखाचा आरोग्य विमा मिळतो. त्यातच कोरोना महामारीमुळे विमा संरक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे.काहीजण माहिती नसल्यामुळे खाजगी महागडे विमा पॉलिसी खरेदी करतात.सर्वांची या खाजगी विमा पॉलिसी खरेदी करण्याची कुवत नसते,म्हणून केंद्र सरकारने सर्वांसाठी हि बारा रुपयात विमा पॉलिसी योजना सुरू केली आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजनेअंतर्गत लाभार्थींना फक्त बारा रुपयात दोन लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळते. कोरोना काळात खूप गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.विमा योजना


जाणून घ्या या योजनेबद्दल


देशातील कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येतो.फक्त बारा रुपयात दोन लाख रुपयाचे विमा संरक्षण आपल्याला एक वर्षभर मिळते.दर मे महिन्यात विमा पॉलिसी अद्ययावत होते, व नागरिकांच्या बँक खात्यातून बारा रुपये सरकारकडे जमा होतात.मे महिन्यात तुमची विमा पॉलिसी परत अद्ययावत होते...


जाणून घ्या या योजनेचे फायदे

  • दुर्घटनेच्या काळात दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही.लगेच मदत मिळते.
  • ही पॉलिसी घेणारी व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या घराच्या व्यक्तींना दोन लाख रुपये मिळतात.
  • ही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीस अपंगत्व आल्यास त्याला दोन लाख रुपये मिळतात.
  • ही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीस तात्पुरते अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपये मिळतात.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो

  • १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • बँक खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेचे संकेतस्थळ माहिती...

PMSBY ही विमा योजना केंद्र सरकारने सर्वांसाठी सुरू केली असून जन सुरक्षा येथे आपल्याला या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

वेबसाइट - http://jansuraksha.gov.in/ ही आहे.

या योजनेचे अर्ज विविध भाषांत भरण्यासाठी उपलब्ध आहे.आपण आपल्या मातृ भाषेचा वापर करून हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.खरतर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी ही समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारी योजना आहे.

आमच्या याही पोस्ट नक्की बघा

जागतिक हृदय विकार दिवस...


खजूर झाडांचे मनोरंजक गोष्टी...

Computerguru वरील आजचा बारा रुपयात मिळावा दोन लाखाचा विमा,जाणून घ्या योजना हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ब्लॉगला अवश्य फॉलो करा, शेअर करा, लाईक करा...

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने