रक्षाबंधन निबंध ,भावा बहिणींचा सण रक्षाबंधन,Rakshabandhan 2021 in marathi,How to Celebrate Rakshabandhan.        

       आजच्या युगात भावा बहिणीच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा सण म्हणून रक्षाबंधन साजरा केला जातो.भावा बहिणीच्या आयुष्यात सर्वात पवित्र असा हा सण समजला जातो.भारतात या सणाचे खूप महत्व आहे.अगदी पौराणिक काळापासून हा सण साजरा केला जातो.

रक्षाबंधन सणाचा ईतिहास,कसा साजरा केला जातो?

(History of Rakshabandhan,how to celebrate Rakshabandhan in marathi)


रक्षाबंधन


रक्षाबंधन सणाविषयी खूप पौराणिक,प्राचीन कथा सांगितल्या जातात.महाभारत काळात द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला होता. तेंव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानली होती.तिला कोणत्याही संकटात साथ देण्याची श्रीकृष्णाने वचन दिले होते.तेव्हापासून भावाने बहिणीच्या कोणत्याही संकटात धाऊन जाण्याची प्रथा ,परंपरा निर्माण झाली.

खरतर प्राचीन काळापासून ही पवित्र अशी परंपरा चालत आलेली आहे.आजही भारतामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. देवादिकांपासून ही परंपरा निर्माण झाली आहे.


रक्षाबंधन म्हणजे काय?

(What is Rakshabandhan in marathi)


         आपल्या भारतामध्ये खूप सण साजरे केले जातात.प्रत्येक सणाची वेगवेगळी परंपरा,संस्कृती आहे.गुढीपाडवा,दिवाळी या प्रत्येक सणाची एक परंपरा,संस्कृती आहे.भारतीय सण व परंपरा यांना जगात खूप आदराचे स्थान आहे.

रक्षाबंधन या सणात त्याचा अर्थ दडला आहे.बहीण जेव्हा संकटात असेल तेव्हा भाऊ तिच्या रक्षणाला जातो.तिचे संरक्षण करतो.रक्षाबंधन म्हणजे सुरक्षेचे बंधन असा अर्थ होतो.या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. व या बदल्यात भावाने बहिणीच्या प्रत्येक संकटात साथ द्यावी अशी तिची माफक अपेक्षा असते.

या दिवशी बहीण पण आपल्या भावाची सर्व संकटे,वाईट काळ यामधून सुटका होऊन त्याचे आयुष्य सुखात जगावे अशी प्रार्थना देवाजवळ करत असते.दरवर्षी हा सण ऑगस्ट महिन्याच्या श्रावण पौर्णिमा या दिवशी येतो.या दिवसाचे खूप महत्त्व आहे.


भारतातील सर्वात मोठा सण रक्षाबंधन  का आहे?


Rakshabandhan      आपल्या भारत देशात फार पूर्वीपासून सण व परंपरा चालत आलेल्या आहेत.भारतीय लोकांचे मन खूप मोठे आहे.भारतामधील लोक सर्व सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतात.या सणांचे खूप महत्व आहे.प्रत्येक सणाची वेगवेगळी परंपरा, संस्कृती आहे आणि भारतीय लोक ती जपण्याची जबाबदारी पार पाडत असतात.

रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतामध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी भाऊ,बहीण यांच्या आनंदाला पारावार उरत नाही.एक प्रकारे त्यांचा हा दिवस म्हणजे जीव की प्राण च असतो.भारतात तसेच परदेशातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भारतामध्ये हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सर्व जाती धर्माचे बहीण भाऊ हा सण साजरा करतात.भारतामध्ये विविधतेत एकता आहे आणि सर्व भारतीय सर्व सण एकत्र येऊन उत्साहात साजरा करतात.सणांच्या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतात आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.या सर्व कारणांमुळे रक्षाबंधन हा भारतामधील सर्वात मोठा सण आहे.


कसे साजरे करतात आधुनिक रक्षाबंधन?

(How celebrate Rakshabandhan in modern world in marathi)


रक्षाबंधन ब्रेसलेट

(Rakshabandhan Bresalet)


आधुनिक काळात प्रत्येक सण आधुनिक बनत चालला आहे.प्रत्येक सणात आज वेगळी,आधुनिक परंपरा निर्माण होत चालली आहे.पूर्वीच्या काळात अगदी रेशमी,सोन्याची राखी बांधली जात असे.इथून मागच्या काळात पण वेगवेगळ्या रंगीबेरंगी राख्या बांधल्या जात होत्या.आजच्या आधुनिक काळात राखीच्या तंत्रात बदल झाला आहे.राख्या ह्या डिजिटल व ब्रेसलेट स्वरूपात बांधल्या जातात.राख्या काळानुरूप बदलत चालल्या आहेत.पण त्या मागची भावना अजुन प्रेमाची,रक्षणाची अशीच आहे.


रक्षाबंधन केक,चॉकलेट

(Rakshabandhan Cake, Chocolate)


जसे की आपण आधी पाहिलेच आहे की,काळानुरूप सर्व सण बदलत चालले आहेत मग रक्षाबंधन त्याला कशी अपवाद राहील.या दिवशी बहीण भाऊ एकमेकांना केक, चॉकलेट देऊन तोंड गोड करतात.या प्रकारे पाश्चिमात्य संस्कृती सुद्धा जोपासली जाते आणि भारतातील व्यावसायिक बांधवांचे पण व्यवसाय चालले जातात.एक प्रकारे सण भारतीय परंपरेत एकमेकांना जवळ आणण्याचे महत्वाचे काम करत असतात.


रक्षाबंधन कसे साजरे करावे?

(How to celebrate Rakshabandhan?)


रक्षाबंधन या पवित्र दिवशी बहीण व भाऊ यांनी सकाळी लवकर उठून स्नानादि उरकून घ्यावे.या दिवशी छान नवीन कपडे घालावे.भावाला बसण्यासाठी पाट किंवा काहीतरी वस्त्र टाकावे.बहिणीने ओवाळण्यासाठी ताट तयार करावे त्यात दीप,अक्षदा,हळद,कुंकू,पैसे,सोने ई.असावे.मग विधीप्रमाने भावाला ओवाळावे व राखी बांधावी.बहिणीने भावाच्या सुखासाठी देवाजवळ प्रार्थना करावी.भावाने बहिणीला छान असे गिफ्ट द्यावे व बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.मग अजुन काय हवे दोघांना.

राष्ट्रीय एकात्मता जपणारा सण

रक्षाबंधन हा राष्ट्रीय एकात्मता जपणारा सण आहे.या दिवशी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन रक्षाबंधन साजरा करतात.या दिवशी सर्व बहिणी भावांना राख्या बांधतात.या दिवशी लष्करी जवानांना शाळेतील मुली राख्या बांधतात.या दिवशी सर्व देशात आनंदाचे वातावरण असते.म्हणून हा सण भारतामध्ये सर्वात मोठा सण म्हटला जातो.


रक्षाबंधन २०२१ प्रश्नोत्तरे

(Rakshabandhan 2021 Questions and Answers in Marathi)


1. 2021 या वर्षी रक्षाबंधन कधी आहे?

Ans. 22 ऑगस्ट,रविवार 

2. रक्षाबंधन तिथी?

Ans. श्रावण शु.१५, धनिष्ठा

3. रक्षाबंधन कोणत्या पौर्णिमेला येते?

Ans. रक्षाबंधन नारळी पौर्णिमा या दिवशी येते.

4. रक्षाबंधन म्हणजे काय?

Ans. भावाने जन्मोजन्मी बहिणीची रक्षा करणे होय.

5. रक्षाबंधन सण कधीपासून साजरा केला जातो?

Ans. सुमारे सहा हजार वर्षांपासून हा सण साजरा केला जातो.

      

        या प्रकारे रक्षाबंधन हा भावाबहिनीच्या आयुष्यातील सर्वात विस्मरणीय व आनंदाचा क्षण आहे.या दिवसाची वाट प्रत्येक भाऊ व बहीण आतुरतेने पाहत असते.या वर्षीचे रक्षाबंधन सर्व भाऊ व बहीण यांना सुखात,आनंदात जावे अशी प्रार्थना करूयात.

रक्षाबंधन हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगत जा मित्रांनो व माझ्या Computerguru या ब्लॉगला नक्की फॉलो करा.धन्यवाद!याही पोस्ट पहा तुम्हाला नक्की आवडतील.


भारतातील सर्वात स्वस्त कार

नवीन मोबाईल घ्यायचाय

संगणक ऑपरेटिंग सिस्टम

4 टिप्पण्या

Have any doubt please let me know.

टिप्पणी पोस्ट करा

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने