भारत कॉलर ॲप, ट्रूकॉलर चा बाप भारत कॉलर ॲप,Bharat Caller App information in marathi

सध्या भारत कॉलर ॲप ची खूप चर्चा आहे.भारत कॉलर ॲप खूप ट्रेंडिंग मध्ये आहे त्याचे कारणही तसेच आहे कारण  भारत कॉलर ॲप हे ट्रूकॉलर या विदेशी ॲपला पर्यायी म्हणून मेक इन इंडिया या अंतर्गत भारत कॉलर ॲप ची निर्मिती करण्यात आली आहे.भारत कॉलर ॲप हे ट्रूकॉलर या ॲपला मोठ्या प्रमाणात टक्कर देईल अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.

App


का डाऊनलोड करावे भारत कॉलर ॲप


हे ॲप भारतात तयार करण्यात आले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत त्याची भारतातच निर्मिती झाली आहे.भारत कॉलर ॲप तयार करणाऱ्या कंपनीचे असे म्हणणे आहे की हे ॲप ट्रूकॉलर पेक्षा चांगलेच नाही तर त्यापेक्षा खूप छान अनुभव भारत कॉलर ॲप सर्व ग्राहकांना देईल.हे ॲप गुगल स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि ग्राहकांना ते मोफत डाउनलोड करता येईल.


भारत कॉलर ॲप चे निर्माते कोण आहेत


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) बंगळूर चे विद्यार्थी प्रज्वल सिन्हा यांनी हे ॲप बनवले असून,कुणाल पसरिचा हे या ॲप चे सहसंस्थापक आहेत.या दोघांनाही २०२० चा राष्ट्रीय स्टार्ट अप हा पुरस्कार देण्यात आला होता.एक अर्थाने भारतात तयार झालेले हे ॲप असून भारतीयांना या ॲपचा खूप अभिमान असला पाहिजे.


भारत कॉलर ॲपचे वैशिष्ट्ये


  • हे ॲप ट्रूकॉलर पेक्षा वापरण्यास सोपे आहे,अनुभवही छान मिळेल.
  • भारतात तयार झालेले हे ॲप आहे.
  • यावर कॉलर आयडी पण दाखवण्याची सोय आहे.
  • फसवणुकीचे,नको असलेले कॉल बंद करता येतात.
डेटा लीक होणार नाही


सर्वात महत्वाचे म्हणजे हे ॲप भारतात तयार करण्यात आले आहे म्हणून या भारत कॉलर ॲप मधून कोणत्याही भारतीयाचा ऑनलाईन डेटा लीक होणार नाही अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.या ॲपच्या लॉग वर ग्राहकाचा मोबाईल नंबर अथवा कॉल लॉग सेव्ह केला जात नाही.कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे माहिती जाणार नाही,ग्राहकांचा डेटा हा एनक्रिप्टेड स्वरूपात सेव्ह केला जातो आणि तो डाटा भारताबाहेर जाणार नाही याची काळजी घेण्यात येईल.


कॉलर आयडी 


कॉलर आयडी हे तंत्रज्ञान आजच्या काळात खूप महत्वाचे आहे.या मुळे तुम्हाला कोण कॉल करते ते कळते.या द्वारे तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव कळते अगदी तो नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह नसला तरीही.या तंत्रज्ञानाचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.भारत कॉलर ॲप मध्ये सुधा हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.


भारत कॉलर ॲप का डाऊनलोड करावे


  • भारत कॉलर ॲप भारतात तयार झालेले आहे.
  • भारत कॉलर ॲप वापरण्यास सोपे आहे.
  • भारत कॉलर ॲप डेटा लीक होऊ देत नाही.
  • भारताला सबळ बनवण्यासाठी.
  • भारतातील तंत्रज्ञानाला वाव मिळण्यासाठी.

भारत कॉलर ॲप हे खरोखरच भारतातील विद्यार्थ्यांचे टेक्निक असून भारतीयांना त्यांचा अभिमान वाटावा असेच हे काम आहे.आपल्या स्वदेशी ॲपला सर्वांनी डाउनलोड करून त्याचा आनंद नक्की घ्यावा.


खालील पोस्ट नक्की बघा

शिक्षक दिन माहिती.


जिओ स्मार्टफोन


अशीच नवनवीन माहिती, लेख पाहण्यासाठी आमच्या ComputerGuru या ब्लॉगला नक्की फॉलो करा. लाईक करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने