Teachers day information in marathi,जागतिक शिक्षक दिन,how to celebrate teachers day, teachers day speech in marathi


प्रस्तावना - Teachers day information in marathi,शिक्षक दिन भारतामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.शिक्षक दिवस हा गुरूंचा एक प्रकारे सन्मानच आहे.शिक्षक दिन प्रत्येक शिक्षकाला एक प्रकारे आनंदाचा क्षण असतो.आईनंतर सर्वात जास्त महत्व असलेली व्यक्ती म्हणजे गुरू,शिक्षक होय.गुरूचे स्थान भारतीय संस्कृतीत खूप वरचे आहे.प्रेमाचे,मायेचे, ममतेचे,आदराचे असे गुरूचे स्थान आहे.गुरू आयुष्यभर आपल्या शिष्याच्या भल्याचा विचार करणारा असतो,तो सतत शिष्याचा विचार करतो.त्याच्या भल्यासाठी काबाडकष्ट करतो.अशा या थोर गुरूंचे वर्षातून एकदा स्मरण करण्यासाठी प्रत्येक शिष्य तयार असतो.गुरू शिष्याच्या नात्याची महती जपणारा दुवा म्हणजेच शिक्षक दिन होय.

शिक्षक दिनकधी साजरा करण्यात येतो शिक्षक दिन

 भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसाचे निमित्ताने आपण दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. गुरुंप्रती असणारे प्रेम, निष्ठा,आदर या सर्वांचे मिलन या दिवशी दिसून येते. सर्वपल्ली राधाकृष्णन हे केवळ भारताचे राष्ट्रपतीच नव्हते तर ते एक आदर्श शिक्षक होते.एका सर्वगुणसंपन्न शिक्षकात असणारे सर्व गुण त्यांच्यामध्ये होते. अन्नदानाहूनही श्रेष्ठ असणारे दान म्हणजे ज्ञानदान होय.म्हणूनच असे श्रेष्ठ ज्ञानदान करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना भारत सरकार व राज्य सरकारच्या वतीने या दिवशी विविध पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येते....जीवनात शिक्षकाची महती

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईनंतर येणारी दुसरी व्यक्ती म्हणजेच शिक्षक,गुरू होय.लहान मूल जीवनाची सर्व निती,मूल्ये ही गुरूकडून शिकत असते.आई मुलाला जगात आणते व मुलाला जगात कसे जगावे हे शिक्षक शिकवतात.देशाचे भविष्य असणारे डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ,शिक्षक,उद्योजक हे सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमाने घडत असतात.जीवनात खऱ्या अर्थाने देव मानला जातो शिक्षकाला जो देवाच्या रूपाने शिष्याच्या सर्व ईच्छा पुर्ण करत असतो.शिष्याला जीवनात योग्य मार्गावर चालण्याचे शिक्षण शिक्षक देत असतो.

शिक्षक म्हणजे तरी काय

शि - म्हणजे शिलवान

क्ष - म्हणजे क्षमा करणारा

क - कला युक्त
     
शिक्षक या नावातच त्याची सारी माहिती दडलेली आहे. शिलवान असणारा,शिष्याच्या सर्व चुका पोटात घालून त्याला माफी करणारा,शिष्याला जीवन जगण्याची कला शिकवणारा असा जो आहे तो म्हणजेच शिक्षक होय.शिक्षक असा व्यक्ती आहे जो आपल्या मुलाबाळांच्या सोबत शिष्यांचाही विचार करतो. समाजाल जीवन जगण्याची कला शिकवणारा गुरू म्हणजे शिक्षक होय. समाजाला मार्ग दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक होय.अशा प्रकारे कितीही महती सांगितली तरी ती कमी पडेल असा मनुष्य म्हणजे शिक्षक होय.

कसा साजरा करण्यात येतो शिक्षक दिन

या दिवशी सर्व विद्यार्थी आपल्या गुरूंना एक दिवस आराम मिळावा म्हणून शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवतात.शिक्षक सर्वतोपरी सहकार्य करतात.विद्यार्थी व शिक्षक दोघांच्याही आनंदाचा हा दिवस असतो.विद्यार्थी या दिवशी आपल्या शिक्षकांना काहीतरी भेटवस्तू देतात.शिक्षकांप्रती असणारी कृतज्ञेची भावना विद्यार्थी या दिवशी व्यक्त करतात.विद्यार्थ्यांनाही या दिवशी अध्यापन कसे करावे याचा अनुभव येत असतो.शिक्षकांनाही आपले विद्यार्थी किती गुणवंत आहेत याची पारख या दिवशी येत असते.या दिवशी सर्व शाळा चालवण्याचे कार्य विद्यार्थी करत असतात.

याही पोस्ट वाचा.

गुरू - शिष्य नात्याला उजाळा

गुरू व शिष्याच्या पवित्र नात्याला उजाळा देण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.आजच्या आधुनिक काळात आपण पाहतो की जग कस धकाधकीचं बनलं आहे.कुणालाही कुणाला वेळ देण्यास फुरसत नाही त्यामुळे नात्यांमधील गोडवा,प्रेम,आपुलकी कमी होत चालली आहे.जो तो आपापल्या कामात व्यस्त आहे.गुरूच्या जीवनातून शिष्य एकदा जगात जगण्याची कला शिकण्यासाठी गेला की त्याला आपल्या धकाधकीच्या जीवनात गुरूचे विस्मरण होते ते होऊ नये म्हणून 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.या दिवशी गुरूचे सर्व आजी - माजी शिष्य गुरूची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतात.त्यांच्याबरोबर रमतात, गमतात आनंदात दिवस घालवतात.गुरू शिष्याच्या पवित्र नात्याला उजाळा देतात.

जागतिक शिक्षक दिन

ज्या प्रमाणे भारतामध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो त्याच प्रमाणे संपूर्ण जगात 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांना एक प्रकारे या दिवशी दिलेला मान,त्यांच्या कष्टाची केलेली उत्तराई या दिवशी केली जाते.युनेस्को मार्फत 1994 पासून जागतिक शिक्षक दिन पाळला जातो.1967 साली याच दिवशी युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी शिक्षकांचा दर्जा या विषयावरील शिफारशींवर सह्या केल्या होत्या.म्हणून हा दिवस जागतिक पातळीवर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.भारतात जसे शिक्षकांना मान,सन्मान,आदर केला जातो तसाच जगात सुद्धा केला जातो त्याचीच जाणीव म्हणून 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

समारोप

पूर्वीपासून भारतीय समाजात गुरूला मानाचे स्थान आहे.अगदी देवांना पण गुरू होते.म्हणून भारतीय संस्कृतीत गुरूला देवाचे स्थान आहे.गुरू विषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण गुरूपौर्णिमा साजरी करतो.गुरू म्हणजे सत्याचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक असतो.शिक्षक दिन साजरा करण्यामागे खूप उदात्त असा हेतू आहे.आपल्याला मार्ग दाखवणाऱ्या शिक्षकाला वर्षातून एकदा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण शिक्षक दिन साजरा करतो.भारतीय संस्कृतीत गुरूची असणारी महती टिकून राहावी म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करतो.भारतीय परंपरा टिकून राहावी म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करतो.गुरूचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करतो.समाजात असणारे गुरूचे स्थान टिकून राहावे म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो... Teachers day information in marathi ,शिक्षक दिन भाषण, जागतिक शिक्षक दिन    हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.अशीच नवनवीन माहिती,लेख पाहण्यासाठी आमच्या Computerguru या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.पोस्ट आवडली तर लाईक करा.

1 Comments

Have any doubt please let me know.

Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post