श्रीकृष्ण जन्माष्टमी 2021,जन्माष्टमी 2021,Shree Krishna Janmastami 2021 information in marathi.

दर वर्षी येणारा अत्यंत महत्वाचा हिंदू धर्माचा सण म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमी होय.श्री कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.खासकरून मध्यप्रदेश आणि उत्तर भारतामध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

Lord Krishna
श्री कृष्ण जन्माष्टमी मुहूर्त

शास्त्रानुसार श्री कृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यात,कृष्ण पक्ष,तिथी अष्टमी,नक्षत्र रोहिणी या मुहूर्तावर झाला होता.म्हणून या तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी,श्री कृष्ण जन्म दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या वर्षी 29 ऑगस्ट रविवार रात्री 11 वाजून 25 मिनिटं ते 30 ऑगस्ट सोमवार रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी मुहूर्त आहे.श्री कृष्ण यांचा जन्म रात्री झाला होता म्हणून 30 ऑगस्ट रोजी मुहूर्त आहे.उत्तर भारत,मध्यप्रदेश येथे पौर्णिमात महिना वापरात असल्याने तेथे ही तिथी भाद्रपद महिना येते.
           महाराष्ट्रात मात्र हा फरक श्रावण महिना दिसून येतो.मराठी दिनदर्शिकेचे पचांग नुसार महाराष्ट्रात श्री कृष्ण जन्माष्टमी 29 ऑगस्ट रात्री 11 वाजून 25 मिनिटे ते 30 ऑगस्ट रात्री 1 वाजून 59 मिनिटं पर्यंत आहे....

कशी करावी बाळ कृष्णाची पूजा

  • शुभ मुहूर्तावर बाळ कृष्णाची दूध अभिषेक करावा.
  • पंचामृत स्नान घालावे नंतर गंगा जलाने अंघोळ घालावी.
  • स्नान आटोपल्यावर बाळ कृष्णाचा शृंगार करावा.
  • वस्त्रे परिधान करून आभूषणे घालावीत.
  • बाळ कृष्णाला गंध लावावा.
  • नैवद्य दाखवावा त्यात तुळशीपत्र असावे.
  • बाळ कृष्णाला पाळण्यात बसवून पाळणा,भजन,कीर्तन करावे.

कसा साजरा करण्यात येतो श्री कृष्ण जन्मोत्सव

श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.खासकरून,द्वारका,मथुरा,गोकुळ,वृंदावन, जग्गनाथ पुरी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.ओरिसा मध्ये या दिवशी दहीहंडी किंवा दहिभंगा जत्रा साजरी केली जाते.संपूर्ण उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो.महाराष्ट्रात या दिवशी गोपाळकाला,दहीहंडी,कीर्तन,पाळणा या प्रकारे हा सण साजरा केला जातो....

श्री कृष्ण जन्माष्टमी या सणाचे महत्त्व काय आहे

वाईट गोष्टीचा बंदोबस्त,वाईट गोष्टीचा काळ,अन्यायाचा काळ म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. मथुरेचा राजा कंस हा जनतेचे खूप छळ,हाल करीत.त्याच्या प्रजेत कुणीही सुखी नव्हते,सर्वत्र अन्याय,अत्याचार,जुलूम,जबरदस्ती माजली होती.या सर्वांचा नाश करण्यासाठी मथुरेत तुरुंगवासात असणाऱ्या देवकीच्या पोटी श्री कृष्ण यांनी जन्म घेऊन कंसाचा वध करून जनतेला मोठ्या संकटातून वाचवले.म्हणून हा दिवस अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून खूप महत्वाचा आहे.

याही पोस्ट नक्की बघा.श्री कृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे

या दिवशी स्री असो व पुरुष सर्वांनी उपवास करावा.दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडावा.मनोभावे श्री कृष्णाची पूजा करावी,भजन करावे,पाळणा बांधावा,यथासांग जन्म वेळेस पाळणा गाऊन व्रत करावं.असे केल्याने
  • श्री कृष्ण तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासून देणार नाही.
  • गर्भवती स्त्रियांनी व्रत केल्यास त्यांचे सर्व ईच्छा पुर्ण होतात.
  • जो हे व्रत मनोभावे करील त्याच्या सर्व ईच्छा बाळ कृष्ण नक्कीच पूर्ण करतील.

श्री कृष्ण जन्माष्टमी साठी लागणारे साहित्य

दिवा,धूप,दीप,अगरबत्ती,पूजेचेताट,घंटी,नारळ,तुळस,सुपारी, बाळ कृष्णाची मूर्ती,फोटो,सजवलेला पाळणा ई......

श्री कृष्ण जन्माष्टमी पूजा विधी

श्री कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला म्हणून भारतात सर्वत्र रात्री 12 वाजताच हा उत्सव साजरा करण्यात येतो.महाराष्ट्रात कीर्तन असतात.

रात्री श्री कृष्ण मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन असते नंतर 12 वाजता देवाला पाळण्यात बसवून पाळणा गातात.

देवाचे सर्व विधी पार पाडले जातात.

रात्रभर लोक भजन, कीर्तन करतात.खूप उत्साहात हा दिवस साजरा करतात.

     अशा प्रकारे वाईटावर सत्याचा विजय हा या दिवसाचा खरा आनंद आहे.श्री कृष्ण यांनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी जन्म घेऊन त्यांचे सर्व दुःख,संकटे दूर केली हीच या दिवसाची खरी महती आहे.
        आजची पोस्ट कशी वाटली नक्की कळवा,कॉमेंट करा,लाईक करा, आणि अशीच नवनवीन माहिती, लेख पाहण्यासाठी आमच्या Computerguru या ब्लॉगला नक्की फॉलो करा.Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने