15 ऑगस्ट भाषण,स्वांतत्र्य दिन भाषण,स्वांतत्र्य दिन 2021 माहिती, indipendance day speech, indipendance day 2021 information in marathi.


          आदरणीय व्यासपीठ,सर्व गुरुजन व माझ्या सर्व बाल मित्रांनो आज आपण भारताचा राष्ट्रीय सण अर्थात 15 ऑगस्ट साजरा करीत आहोत.मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त एक छोटेसे भाषण तुमाच्यापुढे करणार आहे तरी आपण सर्वांनी ते शांतपणे एकावे ही विनंती. तुम्हाला माहित आहे का हे स्वांतत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही,त्यामागे खूप भारतीयांनी प्राण बलिदान दिले आहेत.भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भारतमातेचे विरसुपुत्र हसत मुखाने फासावर गेले आहेत.या सर्वांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून आज आपण भारताचा राष्ट्रीय सण आनंदाने साजरा करतो.

भारतीय राष्ट्रध्वज
                                              भारतीय राष्ट्रध्वज


भारतावर जवळ जवळ 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केले.या काळात त्यांनी भारताची मोठ्या प्रमाणात लूट केली.असे म्हणतात की,इंग्रज यायच्या अगोदर भारतात सोन्याचा धूर निघत असे,लोक काठीला सोन्याचे घुंगरू बांधून फिरत असे,पण इंग्रजांनी भारतात आल्यावर भारताची खूप प्रमाणात लूट केली.समृद्ध भारत अगदी कंगाल करून टाकला या सर्व लुटीमुळे,अन्याय,अत्याचार यामुळे लोक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले.सर्व लोकांनी एकत्र येऊन क्रांती केली व आपला भारत देश स्वतंत्र झाला.

          इंग्रजांनी भारताची अगणित लूट केली.लोकांचा असंतोष निर्माण झाला,लोकांवर अन्याय केले,अत्याचार केले.भारताची मोठ्या प्रमाणात लूट केली.म्हणून दादाभाई नौरोजी यांनी भारताच्या आर्थिक निसारण हा सिद्धांत मांडला आणि लोकांना इंग्रजांविरुद्ध भडकावून दिले.त्यांनी इंग्रजांनी भारताची कशी लूट केली यावर विस्तृत प्रमाणात लेख लिहला.

महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस,जवाहरलाल नेहरू,सरदार पटेल, लोकमान्य टिळक यासारख्या नेत्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले,सर्व लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तयार केले. मोठ्याप्रमाणावर लोक आंदोलन सुरू केले या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन भारताला स्वातंत्र्य देण्याचे इंग्रजांनी मान्य केले.

भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय सण

(Great festival in india)


भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय सण म्हणून 15 ऑगस्ट साजरा केला जातो.या दिवशी शाळा,सरकारी कार्यालये,या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज लावण्यात येतो.तो सन्मानाने फडकावला जातो.विजयी विश्व तिरंगा प्यारा हे ध्वज गीत गायले जाते.नंतर आपले जन गण मन हे राष्ट्रगीत होते,भारत माझा देश आहे,ही प्रतिज्ञा होते.मुलांसाठी हा एक खूप आनंदाचा क्षण असतो.या दिवशी शाळेत विविध स्पर्धा,गायन,कवायत घेतली जाते,सर्वात शेवटी मुलांना खाऊचे वाटप केले जाते.पूर्ण भारतात या दिवशी आनंदाचे वातावरण असते.सर्वत्र देशभक्तीपर गीते गायली जातात. टिव्ही,रेडिओ यावर भाषणे,देशभक्तीपर गीते,सिनेमे लावले जातात.


भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे महापुरुष


लोकमान्य टिळक, भगत सिंग,राजगुरू, सुखदेव, सुभाष चंद्र बोस,विविध क्रांतिकारक यामध्ये महिला पण होत्या या सर्व भारतमातेच्या लेकांनी भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी दिली.भारतमातेच्या या पुत्रांनी भारत देशासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे.


कसा साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन

( How to celebrate indipendance day in marathi)


या दिवशी सर्व भारतभर उत्साहाचे वातावरण असते.सर्व भारतीयांच्या रक्तात देशभक्तीची उधाण आलेलं असते. भारताची राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर खूप मोठा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.या दिवशी पंतप्रधान,मंत्री,सरकारी अधिकारी,भारतीय नागरिक या ठिकाणी उपस्थित असतात.या ठिकाणी भारतीय सैन्य परेड ग्राऊंडवर परेड करतात.विविध राज्यांचे रथ विविध विषयांवर लोकांचे प्रबोधन करतात,या ठिकाणावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात.शाळेतील स्वांतत्र्य दिन

( indipendance day in school in marathi)


या दिवशी शाळेतील वातावरण खूप आनंदाचे असते.सर्व विद्यार्थी,शिक्षक या दिवशी भल्या पहाटे शाळेत येतात.स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण तयारी करतात.झेंडा उभारणे,ग्राउंड तयार करणे,सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करणे ही कामे केली जातात.सकाळी प्रभातफेरी काढण्यात येते.विविध घोषणा मुले देतात.यानंतर गावातील ग्रामपंचायत,सरकारी कार्यालये येथील ध्वजारोहण करण्यात येते.नंतर शाळेतील ध्वजारोहण होते.त्यानंतर भाषणे, देशभक्तीपर गीते,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.शेवटी मुलांना खाऊचे वाटप करण्यात येते.


15 ऑगस्ट का महत्वाचा आहे

( Importance of indipendance day)


जवळ जवळ दीडशे वर्षानी भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले,या मागे भारतीय जनतेचे अपार कष्ट,त्याग,बलिदान,स्वांतत्र्य लढा, चळवळी या मार्गाने आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे ते सहजासहजी मिळालेले नाही म्हणूनच थोर पुरुष,क्रांतिकारक या सर्वांचे स्मरण या दिवशी केले जाते.त्यांच्या या बलिदानामुळे आज आपण आरामात जीवन जगत आहोत.स्वातंत्र्यासाठी भारतमातेला खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत म्हणून आपण या सर्वांच्या उपकाराची परतफेड त्यांचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करतो.या दिवसाचे महत्त्व भारतीय माणसाला कोणत्याही अन्य दिवसापेक्षा जास्त आहे.

          अशा प्रकारे भारतमातेच्या चरणी वंदन करून आपण माझे छोटेसे भाषण एकले त्याबद्दल सर्वांचे आभार. 

जय महाराष्ट्र,

जय हिंद!


याही पोस्ट नक्की वाचा खूप छान आहेत.

रक्षाबंधन २०२१

नवीन 5G स्मार्टफोन          हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व नवनवीन तंत्रज्ञान,संगणक,नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा https://www.computerguru.online/ या ब्लॉगला नक्की सबस्क्राईब व फॉलो करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post