फ्रेंडशिप डे 2021,Marathi Friendship day satus

Marathi friendship sms

Best friend day wishes in marathi

Happy best friend day in marathi

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी भारतामध्ये मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.या वर्षी हा मैत्री दिन 1 ऑगस्ट रोजी आला आहे.या लेखात आम्ही तुम्हाला मैत्री दिनाचे महत्व व शुभेच्छा पत्रे लिहनार आहोत.

          मैत्री म्हणजे काय असते,मैत्री म्हणजे दोघांच्या विश्वासावर चाललेलं सुंदर अस नात असते.मैत्रीत सर्व गोष्टी माफ असतात पण चुकीची जाणही करून दिली जाते.आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मैत्री असलेली माणसे मिळणे फारच कठीण होऊन बसले आहे.जो तो आपापल्या कामात व्यस्त आहे.मग मैत्री कशी होणार? अगदी लहान मुलाचे उदाहरण घ्या त्याची पहिली मैत्री आपल्या आई वडील यांच्याशी होत असते.सर्व गोष्टी ते मुल त्यांना सांगत असते.त्याचा एवढा विश्वास असतो की आई वडील आपले सर्व संकट,भीती घालवणार.अशी ही निखळ व आनंददायी असणारी मैत्री मुले मोठी होऊ लागल्यावर कमी होते. मुले एकाकी जीवन जगतात.म्हणून मानसिक,शारीरिक दृष्टीने मैत्री ही खूप महत्त्वाची आहे मग ती कोणाशी का असेना मैत्रीला नात्याची भिंत नसते.मैत्री आई व मुलगा यांची होऊ शकते,एखाद्या प्राण्याशी मैत्री होऊ शकते.मैत्रीला कसलेही बंधन नाही.

          मैत्री म्हणजे काय असते, मैत्री म्हणजे दोन नात्यांमधील सुखाचा धागा असते.मैत्री ही खोरोखर खूप सुंदर,प्रेमळ,अशी गोष्ट आहे.मैत्री मुळे आयुष्यात खूप मोठा बदल होत असतो.बरे वाईट क्षण वाटून घ्यायला मित्रच असतो.वाईट काळात  मदत करणारा पण मित्रच असतो.अगदी आजच्या काळात पण निखळ निस्वार्थी मैत्रीला खूप महत्व आहे.मैत्री ही केवळ माणसांमध्ये नसून अगदी प्राणी,पक्षी हे सुध्दा मैत्रीची भावना जपत असतात.असे हे मैत्रीचे नितांत सुंदर नाते आहे.जो माणूस आजच्या काळात  मैत्री भावना जपेल तो आयुष्यात खूप सफल झालेला व आनंद उपभोगनारा माणूस असेल.


मैत्रीचे होणारे फायदे -

1.मैत्रीमुळे माणसाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी बळ येते मित्र आधार देतात.संकटकाळी मित्र देवदूत बनून येतात.

2. मित्रांमुळे मनुष्याच्या जीवनात एक प्रकारचे चैतन्य, प्रेम,आनंद,उत्साह असतो.

3. प्रण्यांबरोबराच्या मैत्रीमुळे माणूस दया,प्रेम हे गुण शिकतो. 

4. मैत्रीमुळे समाजात भांडणे कमी होतात.लोकांमध्ये इतरांना मदत करण्याची भावना वाढीस लागते.

5.घरातील माणसांशी केलेल्या मैत्रीमुळे घरात एकोपा,शांतता,आनंद नांदतो.

6. मैत्रीमुळे माणसाला इतरांचे मन समजून घेण्याची सवय लागते.
7.मैत्री हे नाते खूप प्रेमळ,आनंददायी असे नाते आहे.
8.आयुष्यात पैशापेक्षा माणसे जोडा असे बोलतात ते याच कारणामुळे शेवटी माणसाबरोबर पैसा येत नाही.
9. मैत्री हा सुखाचा धागा आहे.जो कधीच संपत नाही.
10. मैत्री ही चांदण्यासारखी असते युगे युगे त्याच जागेवर.खरोखर श्र्वासातला श्वास असते मैत्री आणि ओठातला घास असते मैत्री.मैत्री असते ध्यास, मैत्री असते आस,मैत्री असते भास या जीवनात.मानवी जीवनात मैत्री हे नाते निस्वार्थी भावनेने जपले जाते.या नात्यात प्रेम,आनंद, उत्साह असतो.मैत्री म्हणजे निस्वार्थ अशी भावना होय.
  • मैत्रीतील नाते घट्ट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.
  • मैत्रीला कोणत्याही प्रकारचा नियम नसतो.
  • आपल्या आवडत्या आणि बेस्ट फ्रेंड्स साठी एक दिवस खास असतो.
  • जो मैत्री दिवस म्हणून आपण आनंदाने त्यांच्यासोबत साजरा करत असतो.
"मैत्री ही श्रीकृषण व सुदाम्यासारखी असावी,
एकाने गरिबितही स्वतःचा स्वाभिमान कधीच सोडला नाही,
तर दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही."

          आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी आयुष्यात एका तरी मित्राची आवश्यकता असते.बालपणापासून आत्तापर्यंत तुमचा एक तरी असा खास मित्र झाला असेल,त्या मित्राला मनापासून शुभेच्छा, त्याच्याबरोबर हा मैत्री दिवस साजरा करा आणि आयुष्य सुंदर बनवा.
Wish you Happy Friendship day my best friend!!

अशीच सुंदर माहिती वाचण्यासाठी आमच्या computerguru या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.


आमच्या अशाच सुंदर पोस्ट वाचा.
Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने