जागतिक व्याघ्र दिन 2021/International Tiger Day 2021


     जागतिक व्याघ्र दिन किंवा International Tiger Day हा दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो.संपूर्ण जगात हा जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जातो.त्याचे कारणही तसेच आहे.कारण हा प्राणी लुप्त होत चालला आहे.
वाघ कुळ - वाघ हा मार्जर किंवा मांजर कुळातील सर्वात मोठा मांस भक्षी प्राणी आहे.सर्वात तिसरा मोठा मांस खाणारा हा प्राणी आहे.असे असून पण त्याची संख्या झपाट्याने कमी होताना दिसते आहे.निवास - 

                       जगात सर्वात जास्त वाघ हे भारतात आढळतात.जगातील वाघांपैकी जवळ जवळ 70% पेक्षा अधिक वाघ भारतात आढळतात.आपल्या देशाने त्याच्या सरंक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचे ते फलित आहे.भारताप्रमाणे नेपाळ, भूतान,चीन, श्रीलंका, त्याबरोबर जगातील इतर काही देशांमध्येही वाघ आढळतात.जगातील सर्वात वाघ समृद्ध असणारा देश म्हणजे भारत हाच आहे.
                 कारण भारताने प्रोजेक्ट टायगर या योजनेखाली वाघ सवर्धनासाठी खूप प्रयत्न केले.ज्यामध्ये अभयारण्ये,राखीव कुरणे, त्याचबरोबर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे त्याच्या शिकारी वर बंधने आहेत.भारताने वाघांसाठी खूप सकारात्मक प्रयत्न केल्याने त्याचे फळ आपल्याला मिळाले आहे.

व्याघ्र दिनाचे महत्त्व - 

             दरवर्षी 29 जुलै रोजी "त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे." या घोषणेसह हा जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जातो.लोकांमध्ये वाघ या प्राण्यांविषयी प्रेम निर्माण करणे.वाघांची कमी होणारी संख्या त्याची जाण करून देणे.वाघांच्या शिकारी पासून लोकांना परावृत्त करणे.जागतिक वन्यजीव निधी या संघटनेच्या मते जगात आत्ताच्या घडीला केवळ 3900 वाघ शिल्लक आहेत.सर्वात जास्त वाघ कमी होण्याचे कारण हे शिकार आहे.या सर्व बाबींचा विचार करून व्याघ्र श्रेणीतील देशांनी 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे.जगातील इतर कोणत्याही प्रजातीपेक्षा ही प्रजाती शुर,चपळ, राजशी आहे म्हणून तिचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे.कारण वाघ हा प्राणी कोणताही देश असूद्या त्याचे भूषण असणारा प्राणी आहे.वाघ प्रजातिविषयी -

1.जगातील तिसरा मोठा मांस खाणारा प्राणी वाघ आहे.
2. सायबेरियन वाघ सर्वात जास्त वजनाचा आहे.
3. वाघ कळपात राहत नाही.एकटाच राहतो.त्याच्या हद्दीत कुणी प्रवेश केल्यास प्रचंड आक्रमक होतो.
4. वाघाचे पुढच्या पायांपेक्षा मागचे पाय लांब असतात त्यामुळे तो खूप लांब झेप घेऊ शकतो.
5. प्रत्येक वाघावर असणारे पट्टे वेगवेगळे असतात सारखे नसतात.
6. साधारणपणे वाघ 10 ते 15 वर्ष जगतो.

वाघ लुप्त होण्याची कारणे-

1. शिकार - वाघाच्या नखापासून ते केसापर्यंत सर्व अवयव उपयुक्त आहे. आंतरराषट्रीय बाजारात त्याला खूप मागणी आहे.म्हणून खूप प्रमाणात छुप्या पद्धतीने वाघांची शिकार केली जाते.
2. जंगलतोड - मानवाने त्याच्या फायद्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली.पर्यायाने वाघांची निवासस्थाने नष्ट झाली.
3. हवामानबदल - औद्योगिकीरणामुळे खूप कारखाने वाढले.सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले. वन्यजीवांच्या जीवावर हे प्रदूषण, हवामानबदल हे बेतले.
4. उपयोगिता - वाघांचा प्रत्येक अवयव खूप किमती आहे.त्याचे खूप उपयोग आहे.यासर्व कारणाने त्याची शिकार होते.

व्याघ्र संवर्धन उपाय -

1. वनांचे जतन करणे - वाघांचा नैसर्गिक अधिवास वने आहेत त्यांचे जतन करून आपण व्याघ्र संवर्धन करू शकतो.त्यामुळे वाघ वाढण्यास मदत होईल.
2. हवामान बदलावर नियंत्रण ठेवावे - हवामान बदलावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.हे जरी कठीण असले तरी त्यांच्या अधिवासाजवळ नियम करावेत.
3. प्राणिसंग्रहालये वाढविणे - वाघांचे सर्वात सुरक्षित निवास म्हणजे प्राणिसंग्रहालय हे आहे.यांची मोठ्यप्रमाणावर निर्मिती केली पाहिजे.
4. कायदे - व्याघ्र संवर्धन कायदे अजुन मोठ्यप्रमाणावर कडक करण्याची गरज आहे.

लुप्त झालेल्या प्रजाती -

बाली वाघ, जावण वाघ,संकरित वाघ या वाघांच्या प्रजाती जगातून नष्ट झाल्या आहेत.या प्रजाती परत आपल्याला दिसणार नाहीत.म्हणून इतर शिल्लक प्रजाती परत नष्ट होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.

भारतीय वाघ - 

               Panthris Tigris या शास्त्रीय नावाने भारतीय वाघ ओळखला जातो.वाघ हा भारताचा खरा रुबाबदार व ऐटबाज प्राणी आहे.भारताची शान व थाट वाढवण्याचा प्रयत्न हा प्राणी करतो.भारतीय वाघ जगात सर्वात मोठ्या प्रमाणात असणारी प्रजाती आहे.भारताचा तो एक वैभवशाली इतिहास आहे.भारताचा समृद्ध वारसा आहे.त्याला जपण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.वाघाच्या रक्षणाची आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूयात.


याही पोस्ट वाचा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने