Guru Purnima Essay/Speech in Marathi/गुरू पौर्णिमा माहिती 2021


“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll”


दरवर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते.गुरू विषयी असणारा आदर,प्रेम या भावना जपण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो.गुरू विषयी काय बोलावे? वरील ओळींमध्ये गुरुविषयीची महती सांगितली जाते.माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत कुणाचातरी गुरू,कुणाचातरी शिष्य असतो.गुरू व शिष्याचे हे नाते अनंतकाळापासून चालत आलेलं आहे.या नात्याला एक प्रेमाची,त्यागाची,किनार लाभली आहे.गुरू साठी शिष्य जीवाची बाजी लावत असतो.गुरूही आपल्या शिष्याला सर्वोतोपरी श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न करत असतो.असे हे गुरू शिष्याचे पवित्र असे नाते आहे.या नात्याला जगात कितीही किंमत मोजली तरी त्यापुढे ती शून्य आहे.

          मग प्रश्न पडतो नेमका गुरू तरी कसा शोधावा? सोपे आहे बालकाचा पहिला गुरू त्याचे आई वडील असतात.कारण या जगात त्याला त्यांनी आणलेले असते.मग जगाची रीत त्याला प्रथम आई वडील च शिकवतात व इथूनच सुरू होतो गुरू शिष्याच्या नात्याचा प्रवास व तो असाच सुरू राहतो.बालकाला बोलणे,चालणे सर्व त्याचे आई वडील शिकवतात म्हणून खऱ्याअर्थाने ते त्याच्या आयुष्यातील पाहिले गुरू होय.आई असते बालकाची माय त्याला दाखवते प्रेमाची छाया.वडील दाखवतात त्याला जगण्याची रीत म्हणूनच बालकाचे ते पाहिले गुरू असतात.
          बालक जसा मोठा होतो तसा मग शाळेत प्रवेश करतो.मग त्याचे गुरू होतात शिक्षक खऱ्याअर्थाने मग त्याच्या जीवनाचा पाया घालण्याचे काम शिक्षक करतात.कारण हे वय खूप वेगळे असते.संगतीचा परिणाम मुलांवर होत असतो.म्हणून या वयात शिक्षक मुलांचे मित्र म्हणून त्यांना वाईट वळण लागणार नाही त्याची दखल घेत असतात. एकाही शिक्षकाला वाटत नाही की त्यांचे विद्यार्थी वाईट वागावे.म्हणून आयुष्यात या गुरूंना खूप महती आहे.शिक्षक जरी रागावत,शिक्षा करत असले तरी त्यांचा हेतू हाच असतो की आपला विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा.
                          "गुरू असतो जीवनाचा शिल्पकार"
          जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर जीवनात गुरू असणे खूप महत्वाचे आहे.कारण यशाच्या पायऱ्या गाठण्यासाठी आधार देण्याचे काम गुरूच करत असतो.या दिवशी गुरूची उपासना केली असता सर्व कष्टाचे सार्थक होते असे मानले जाते.या दिवशी गुरूंच्या नावाने दानही केले जाते.मनुष्याच्या जीवनात कोणतेही क्षेत्र असूद्या त्यात गुरू हे असतातच.सचिन तेंडुलकर यांचेही गुरू रमाकांत आचरेकर हे होते.त्यांनी सचिनला यशाच्या पायऱ्या गाठण्यासाठी खूप मदत केली.
गुरू म्हणजे काय?सत्याचा मार्ग दाखवणारा,यशाची पायरी गाठण्यास मदत करणारा, ध्येयपूर्तीसाठी मदत करणारा,आयुष्याच्या प्रवासात दीपस्तंभ,सदा सर्वदा शिष्याच्या भल्याचा विचार करणारा हा गुरू म्हणजे एक प्रकारे देवच असतो.देवाला सर्व ठिकाणी लक्ष देणे शक्य नसल्याने त्यानेच तर नसेल ना प्रत्येकाच्या जीवनात गुरू निर्माण केले असतील.देवांना सुद्धा गुरू होते.अगदी देवांच्या काळापासून ही गुरू शिष्याची परंपरा चालत आलेली आहे.आपल्या शिवाजी महाराजांचे गुरू त्यांची आई जिजाबाई, एकलव्याचे गुरू द्रोणाचार्य, होते.
          अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात.या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.
गुरू म्हणजे काय असतो?
1.ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा दिवा असतो.
2.शिष्याला आधार देणारा दुवा असतो.
3.शिष्याची माय असतो.
4.गुरू म्हणजे सत्याचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक.
5.गुरू असतो जीवनाचा शिल्पकार.
6.गुरू असतो जीवनाचा आधार.
7.गुरू हा धेय्याचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक असतो.
8.गुरू देतो शिष्याला जगण्याची कला.
9.गुरू असतो शिष्याचा जीव की प्राण.
10.गुरू देत असतो यशाची गुरुकिल्ली.
अशा या गुरूंना माझे शतश: प्रणाम.
संगणक बेसिक माहिती, करंट अफेअर्स, टेक्नॉलॉजी न्यूज विषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या computerguru या ब्लॉग ला नक्की फॉलो करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने