योगा करा आणि आजाराला पाळावा,योगा करा आरोग्यसंपन्न बना.या प्रकारच्या गोष्टी सतत आपल्या कानावर येतात.पण आपण या धकाधकीच्या जीवनात त्याकडे फार काही लक्ष देत नाही.अन त्यातूनच पुढे विविध आजार जडतात व आपल्या आयुष्याची व पैशांची बरबादी सुरू होते.का तर योगा,व्यायाम याकडे केलेले दुर्लक्ष.या सर्व बाबींची आठवण का झाली तर दरवर्षी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे.दरवर्षी 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या या दिनाचे सर्व मानवजातीच्या आयुष्यात खूप महत्व आहे.रोज जरी काही योगासने केली तरी कित्येक व्याधींना आपण कायमचे दूर ठेवू शकतो.कधी पासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला?

संयुक्त राष्ट्र महासभेच्या सप्टेंबर 2014 रोजी झालेल्या महासभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता.संयुक्त राष्ट्राच्या 193 पैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावास मान्यता दिली होती.यावर विस्तृत चर्चा होऊन जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

योग दिनाचे सांस्कृतिक महत्त्व

फार पूर्वीपासून भारतात ऋषी मुनी यांनी योगाची निर्मिती केली असून योग म्हणजे मन,शरीर व आत्मा यांना जोडणारी क्रिया आहे.या तिन्ही गोष्टींना एकत्र आणण्याची ताकद योगामध्ये आहे.भारतीय परंपरेत फार पूर्वीपासून योग प्रकार चालत आलेला आहे.

श्रीमद्भगवद्गीता या भारतीय ग्रंथात योग या संकल्पनेची मांडणी करण्यात आली आहे.

पतंजली मुनी यांनी सुद्धा योगाद्वारे शारीरिक,मानसिक,बौद्धिक विकासाची संकल्पना मांडली.


याप्रकारे योग ही एक प्राचीन भारतीय परंपरा असून तिचा आता सर्व जगाने स्वीकार केला आहे.हे एक प्रकारचे भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्वच म्हणता येईल.आज कोरोनाच्या काळात सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोना बरा करण्यासाठी योग हा एक चांगला पर्याय आहे.

21 जून हाच का आंतरराष्ट्रीय योग दिन ?

जगात बऱ्याच देशांत 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो.त्यामुळे या दिवसाला एक वेगळे महत्व आहे.म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.भारतातील सर्वात जुनी ही परंपरा आता पूर्ण जगात या दिवशी साजरी केली जाते.

शाळांमध्ये योग दिवस साजरा केला जातो.

सरकारी कार्यालये, अस्थापने येथे देखील योग दिवस साजरा केला जातो.

योग करण्यासाठी काय तयारी करावी?

1.आपण कोणत्याही जागी योग करू शकतो.शक्यतो शांततेची जागा निवडावी.

2.बसण्यासाठी एक छोटी चटई असावी.

3.लवचिक हालचाल होण्यासाठी सैल कपडे घालावे.

बस तुम्ही योग करण्यासाठी तयार झालात.

प्रमुख योगासने

ताडासन,भुजंगासन,प्राणायाम, धनुरासन, नौकासन, वक्रासन,वज्रासन,शवासन,विरासन या प्रकारे अजुन खूप प्रकारची आसने आहेत.प्रत्येक आसनांचे फायदे वेगवेगळे आहेत.जो माणूस रोज आसने करतो तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक रीतीने उत्तम जीवन जगतो 

योगासनांचे फायदे

1. योगासने केल्याने शरीर सदृढ राहते.रोग दूर पळतात.

2.शारीरिक, मानसिक,बौद्धिक विकास उत्तम होतो.

3.शरीर,मन,आत्मा यांना जोडणारी क्रिया म्हणजे योग आहे.

4.योगासने केल्याने मन प्रसन्न रहाते.

5.योगासने हा प्रकार बिनखर्चिक आहे.

6.योगासने केल्याने आरोग्य उत्तम राहते.

7.योगाला प्राचीन भारतीय परंपरा आहे.

8.योग केल्यामुळे आपली संस्कृतीचे रक्षण होईल.

9.योग केल्याने माणसाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक गोष्टींचा विकास होतो.

10.मन व आत्मा यांचे मिलन योगाद्वारे होते.

अशा प्रकारे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे महत्त्व आहे.आज या बदलत्या जीवशैलीत योगाचे खूप महत्व आहे.योगामुळे आज संपूर्ण जगात सर्व व्याधी,आजार यांना दूर करण्याची क्षमता आहे.रोजचे जरी 10 ते 20 मिनिट योगासाठी दिल्यास माणसाच्या जीवनात खूप चांगला बदल घडून येईल.माणसाचे आयुष्य वाढेल.त्याची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलता येईल.हे केवळ आणि केवळ योगामुळे घडून येईल.

घोषवाक्ये

1. योगासने करा आजार पळवा.

2.योग करा स्वस्थ रहा.

3.योग करी भारतास समृद्ध.
Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने