सन 2021 मधील पाहिले सूर्यग्रहण दिनांक 10 जून रोजी होत आहे.या सालातील हे पहिलेच सूर्यग्रहण असल्यामुळे खगोलप्रेमिंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सूर्यग्रहण असल्यामुळे त्याचे काही नियम व व्रत पालन पण केले जाते.का घडून येते सूर्यग्रहण?

अमावस्येच्या दिवशी चंद्र हा सूर्य व पृथ्वी यांच्या मधोमध येतो तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हटले जाते.

सूर्यग्रहण प्रकार:-

1.खग्रास सूर्यग्रहण

2.खंडग्रास सूर्यग्रहण

3.कंकणाकृती सूर्यग्रहण


या वेळी पूर्ण सूर्यग्रहण होणार असून सूर्यग्रहणाच्या दिवशी रिंग ऑफ फायर दिसून येणार आहे.परंतु भारतात हे सूर्यग्रहण आंशिक स्वरूपात दिसून येणार आहे.

किती वेळ असेल सूर्यग्रहण?

दहा जून रोजी दुपारी 1वाजून 42 मिनिटांनी हे सूर्यग्रहण लागणार आहे.संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी हे सूर्यग्रहण संपेल.

सुतक कालावधी:-

सुतक कालावधी सूर्यग्रहण पूर्वी 12 तास अगोदर सुरू होईल.

हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका,युरोप,उत्तर कॅनडा, रशिया आणि आशिया खंडात अंशत दिसेल.

सूर्यग्रहण पाहताना काय काळजी घ्यावी?

1.ग्रहण पाहताना दुर्बीण वापरावी.

2.ग्रहण पाहताना काळा जाड काचेचा चष्मा वापरावा.

3.ग्रहण थेट डोळ्यांनी पाहू नये.

4.ग्रहण जास्तवेळ पाहू नये एक टक पाहू नये.

5.ग्रहण पाहताना वेल्डिंग हेल्मेट वापरावे.

ज्योतिष दृष्टीकोनातून सूर्यग्रहण:-

भारतात या ग्रहणाचा परिणाम जाणवणार नाही त्यामुळे सुतक कालावधी पाळू नये.तरीही गर्भवती स्त्रियांनी नियम पाळावे.

1.ग्रहण होण्यापूर्वी अंघोळ करा.

2.सूर्यमंत्राचा जप करा.

3.ग्रहण काळात कुणाशी भांडू नका.

4.ग्रहण काळात वाणीवर नियंत्रण ठेवावे.

5.ग्रहण काळात काही खाऊ नये.

6.ग्रहण काळात कोणतीही पूजा करू नये.

7.गर्भवती स्त्रियांनी संपूर्ण नियम पाळावे.

सूर्यग्रहनाचा राशिंवरील परिणाम:-

ग्रहण काळात सर्व राशिंवर मिळते जुळते परिणाम होत असतात.परंतु ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते हे सूर्यग्रहण पाच राशिंसाठी प्रतिकूल ठरणार आहे. त्या राशी आहे.वृषभ राशी,मिथुन राशी, तूळ राशी,सिंह राशी,मकर राशी या राशीच्या लोकांनी जरा जपून राहावे.

एकंदरीत हे सूर्यग्रहण भारतात आंशिक स्वरूपात दिसून येणार असून जास्त प्रमाणात त्याचा आनंद घेता येणार नाही.त्यातून भारतात सध्या पावसाळा सुरू असून हवामानही ढगाळ असून सूर्यग्रहणात त्याचा अडथळा येऊ शकतो.

टेक्नॉलॉजी न्यूज आणि संगणक बेसिक कोर्स विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या.


Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने