शिष्यवृत्ती परीक्षा अखेर लांबणीवर

MSCE Pune Scholarship 2021 8th and 5th Class Exam will Postpone – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे २०२१ रोजी आयाेजित करण्यात आली होती.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देऊन परीक्षा ही पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. यासंदर्भातील माहितीपत्रक लवकरच जारी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

      खरतर कोरोनाची स्थिती बिकट होत आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे डॉक्टर वारंवार सांगत आहेत.किंबहुना कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी असेल असे म्हटले जाते आहे.त्यामुळे परिषदेच्या या निर्णयाचे खूप महत्त्व आहे.                    परीक्षा आकड्यांमध्ये:

शिष्यवृत्ती परीक्षेतून पाचवीच्या १६,६९३ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत तर आठवीच्या १६,५८८ विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात ही पहिलीच स्पर्धा परीक्षा असते त्यात त्यांना खूप गोष्टी शिकण्यास मिळतात.स्पर्धात्मक युगात वावरण्याची त्यांची वृत्ती वाढीस लागते.

दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होते ती यंदा एप्रिल नंतर मे तर अजुन पण पुढे ढकलण्यात आली.

या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे सहा लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

            अशा प्रकारे यंदाची शिष्यवृत्ती परीक्षा ही कोरोनाच्या लाटेमुळे नक्की काय होणार आहे हे आपणास पुढे पहावे लागेल.

https://www.computerguru.online/ या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा.


Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने