शाओमी कंपनीने आज भारतात त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 10 एस लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांकडे विक्री साठी उपलब्ध असेल. रेडमी नोट 10 एस हा स्मार्टफोन रेडमी नोट 10, रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो या स्मार्टफोन्सच्या नोट 10 फॅमिलीत दाखल होणार आहे. यामधील अधिकांश फीचर्स Redmi Note 10 सारखेच असण्याची शक्यता आहे. 

           शाओमीने लॉन्चपूर्वी रेडमी नोट 10 एसची (Redmi Note 10S) अनेक वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप, सुपर अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो G95 SoC, 5000mAh बॅटरी आणि वेगवान चार्जिंग सपोर्टचा समावेश आहे.✓ Redmi Note 10S चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन:-

Redmi Note 10S मध्ये फुल एचडी + रेजोल्यूशन, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह 6.43-इंचांचा अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.

यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल आणि हा फोन अँड्रॉयड 11 वर आधारित MIUI 12.5 चालेल.

फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.कॅमेऱ्याच्या बाबतीत हा फोन खूप छान अनुभव देऊ शकतो.

Redmi Note 10S MediaTek Helio G95 SoC वर चालेल आणि यामध्ये दोन वेगवेगळे रॅम कॉन्फिगरेशन मिळतील.ज्यामुळे तुमचा फोन अगदी फ्री व फास्ट लोड होईल कमीत कमी वेळात तुमचे काम उरकेल.

यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.ज्यामुळे बॅटरी चार्ज करण्यासाठी जो कंटाळा येतो तो टाळता येईल बॅटरी खूप कमी वेळात फुल्ल चार्ज होईल व वेळेतही बचत होईल.

फोनमध्ये IP53 सर्टिफिकेशन आणि डुअल स्टीरियो स्पीकर असू शकतात.जे आत्ताच्या काळात खूप स्मार्टफोन मध्ये पहावयास मिळतात.

                   अशा प्रकारे स्मार्टफोन मध्ये आघाडीवर असलेल्या शाओमी या कंपनीमार्फत नेहमीच वेगवेगळ्या व किमतीने कमी असलेल्या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात येते.या सर्व कारणाने ही कंपनी आजची जगातील आघाडीची स्मार्टफोन कंपनी बनली आहे.

Computerguru या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने