भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन
   आजच्या मोबाइलच्या युगात रोज शेकडो मोबाईल फोन लाँच होतात.पण खरे आपल्याला खरी गरज असणारे फोन मिळणे जरा कठीणच असते.कारण खूप प्रकारचे मोबाईल फोन उपलब्ध असल्यामुळे खूप गोंधळ होऊन बसतो.आजच्या घडीला 5G फोन उपलब्ध झाले आहेत.पण त्यांची किंमत सर्वसामान्यांच्या
आवाक्याबाहेर आहे.पण ओप्पो या मोबाईल कंपनीने 5G नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे.तेही अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे.
OPPO A53s असे या स्मार्टफोनचे नाव ठेवण्यात आले आहे.हा स्मार्टफोन दोन व्हेरियन्ट उपलब्ध करण्यात आला आहे.शिवाय बँकांतर्फे सुद्धा चांगल्या ऑफर देण्यात आले आहेत.HDFC बँकेकडून 5% कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे.शिवाय इतर ही अनेक बँकांकडून विविध ऑफर देण्यात आल्या आहेत.ज्या मध्ये बँकांकडून ई एम आय ऑफर देण्यात आल्या आहेत.
पहा कसा दिसतो हा स्मार्टफोन✓ जाणून घेऊयात स्मार्टफोनचे फीचर:
डिस्प्ले- 6.52 इंच HD डिस्प्ले त्यातच एल सी डी सोबतच टियरड्रॉप नॉच असणार आहे.ज्याने तुमचा स्मार्टफोनला एकदम नवीन फिल येईल.
या स्मार्टफोन ची बॉडी सुद्धा एकदम स्लिम आहे
त्याची जाडी 8.4 mm पातळ आहे ज्याद्वारे तुमचा स्मार्टफोन एकदम हलका व मस्त दिसतो.
कॅमेरा- स्मार्टफोनला पाठीमागून ट्रिपल कॅमेरा देण्यात आलाय ज्याचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल देण्यात आलाय. व बॅक कॅमेरा 13+2+2असे देण्यात आले आहेत.
रॅम-6GB व 8 GB व ती मेमरी कार्ड च्या मदतीने 128GB पर्यंत वाढवता येते.
बॅटरी-5000mah ची बॅटरी देण्यात आली आहे.
प्रोसेसर - मीडिया टेक dimensity 700हा प्रोसेसर देण्यात आला आहे.
              त्याच प्रमाणे dual mode 5G, अल्ट्रा केअर आय केअर डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याने डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी मदत होईल.साईड फिंगरप्रिंट अनलॉक ही या स्मार्टफोन मध्ये देण्यात आले आहे.
          हा स्मार्ट फोन घ्यायचाय असे वाटत असेल तर तो फ्लिपकार्ट व इतर मोबाईल दुकानांत सुद्धा उपलब्ध होणार आहे.आत्ता तुम्ही म्हणाल तर याची किंमत काय असेल तर पहा.
6GB रॅम असलेला स्मार्टफोन 14990 रुपये
8GB रॅम असलेला स्मार्टफोन 16990 रुपये
       या दोन्ही variants ची ही किंमत आहे.तर मला वाटते की नक्कीच 5G स्मार्टफोन खूप कमी किंमतीत मिळतो आहे.तर सर्वांनी एकदा नक्की वापरून पहा.
          टेक्नॉलॉजी विषयी नव्या नव्या पोस्ट साठी माझ्या ब्लॉगला भेट द्या आणि अवश्य फॉलो व शेअर करा.Computerguru या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने