कोरोना लस नोंदणी व काय दक्षता घ्यावी?

 1.  कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान 18 वर्षांवरील सर्व लोकांना 1 मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी 28 एप्रिल म्हणजेच  आजपासून सुरू होत आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेय. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. ज्या लसीचा प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे. 
 2. स्पॉट रजिस्ट्रेशनचे काय होईल?
 3. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वॉक इन रजिस्ट्रेशनमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. परंतु जे 18 अधिक आहेत, त्यांच्यासाठी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांची श्रेणी मोठी आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नोंदणीचा ​​आदेश देण्यात आला आहे.
 4. नोंदणी कशी करावी?
 5. पीआयबीने सरकारच्यावतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिलीय. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.
 6. ✓https://selfregmission.cowin.gov.in 
 7. ✓आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
 8. ✓तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो तीन  मिनिट मध्येे टाईप करावा लागेल.
 9. ✓नंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.
 10. ✓आधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी यांचा पर्याय आहे.
 11. ✓या पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या
 12. ✓नंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल.
 13. ✓यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल.
 14. केंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.


 15. "लस टोचून घेऊ आणि सुरक्षित राहू"


Post a Comment

Have any doubt please let me know.

Previous Post Next Post