संगणकाला मानवाशी जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे कीबोर्ड होय.उदा. जसे प्रजा व शासन यांना जोडणारा दुवा म्हणजे सरकारी कर्मचारी तसाच दुवा कीबोर्ड ला म्हणता येईल.


             
                    एखाद्या टाईप रायटर सारखे कीबोर्ड दिसते.या वर अनेक अक्षरे,अंक,चिन्ह छापलेली असतात.कीबोर्ड वरून सर्व मानवी अज्ञा संगणकाला पुरवली जाते.म्हणून कीबोर्ड हे एक इनपुट साधन आहे.
कीबोर्ड वरून आपण जे अंक, चिन्ह,अक्षरे टाईप करतो ती संगणकाच्या मॉनिटर वर एका विशिष्ठ ठिकाणी उमटतात त्या स्थानाला कर्सर असे म्हणतात.
                     कीबोर्ड वर किजचे मुख्य गट-
1) न्युमरिक किज - ० ते ९ अंक असतात.
2) अल्फाबेटिकल किजं - A ते Z ही अक्षरे असतात.
3) फंक्शन किज - F1 ते F12 या किज असतात त्या विशिष्ट काम करतात.
                या प्रकारे प्रामुख्याने कीबोर्ड चे तीन भाग पडतात.कीबोर्ड वरील प्रमुख किज चे कार्य आपण पुढील भागात पाहू.

Post a Comment

Have any doubt please let me know.

थोडे नवीन जरा जुने